वायदे बाजार : मका, हळद यांच्या भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात मका व हळद यांचे भाव वाढले. इतरांचे भाव घसरले किंवा स्थिर राहिले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत गहू, गवार बी व हरभरा यांचे भाव वाढतील.   या सप्ताहात मान्सूनचे प्रमाण वाढले. त्यामुळे १ जूनपासून २६ सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी झाला. आत्तापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, झारखंड, हरयाणा, प. राजस्थान, उ. मध्य कर्नाटक, गुजरात, सौराष्ट्र व रायलसीमा येथे झालेला आहे. पुढील सप्ताहात आसाम, रायलसीमा, उ. मध्य कर्नाटक व दक्षिण भारतात पाऊस चांगला होईल असा अंदाज आहे. प. राजस्थानमधून मान्सूनचे प्रयाण सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी उत्पादन व मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजार भाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगला देशमधील निर्यातीत सुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. गुजरात व सौराष्ट्र येथे कापसाखालील क्षेत्र कमी होईल असा अंदाज आहे. राजस्थान व गुजरातमध्ये गवार बी च्या उत्पादनात घट अपेक्षित आहे. रबी पिकांचे हमी भाव अजून प्रकाशित झाले नाहीत. पण ते वाढीव असतील अशी अपेक्षा आहे. अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापार संघर्ष वाढत आहे. भारत त्याचा फायदा कसा घेईल यावर सुद्धा पुढील महिन्यातील किमती अवलंबून आहेत. चांगल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यात कापूस, साखर, सोयाबीन, हळद व हरभरा यांच्या किमतींमध्ये घसरता कल दिसून आला. मक्याच्या किमती वाढत होत्या. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रबी मक्याच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा वाढत होत्या (रु. १,३३० ते रु. १,३९३). आता त्या नवीन पिकाच्या अपेक्षेने घसरू लागल्या आहेत. गेल्या दोन सप्ताहात त्या घसरत होत्या. या सप्ताहात त्या ०३ टक्क्यांनी वाढून रु. १,३५७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,३५६ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३७५ वर आहेत. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,४११ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरी साठी फारसे व्यवहार होत नाहीत. साखर साखरेच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ३,२२१ ते रु. ३,१३३). या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,१२९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,११४ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१२९ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ३,४२९ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या रु. ३,२९४ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,३८६ वर आल्या आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). या वर्षी उत्पादन जरी वाढणार असले तरी निर्यात मागणी अनुकूल राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑक्टोबर नंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबर रोजी डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,३५६, ३,४२२ व ३,५१९ भाव होते. हळद हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर)च्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ७,४४४ ते रु. ६,८३६). या सप्ताहात त्या १.० टक्क्याने घसरून रु. ६,६२२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,८८९ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.७ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,८४०). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. गहू गव्हाच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. १९९० ते २०११ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०३७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. २,०२३ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.६ टक्क्याने अधिक आहेत (रु. २,०५५). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. ४,१५० ते रु. ४,६२४ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने घसरून रु. ४,२८२ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२५७ वर स्थिर आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३८५). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात १६ तारखेपासून घसरत होत्या (रु. ४,४५२ ते रु. ३,९६९). या सप्ताहात त्या पुन्हा ०.३ टक्क्याने घसरून रु. ३,९६२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,०१२ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १ टक्क्याने अधिक आहेत. (रु. ४,०५४). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही घट होत आहे. कडधान्याचे उत्पादनसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. (रु. २४,१८० ते रु. २२,८६०). या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. २२,२९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,४७६ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २२,३५० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र चीनने भारताकडून होणारी आयात रद्द केली आहे. त्याचप्रमाणे या वर्षी जागतिक उत्पादन आणि वर्ष-अखेर साठा वाढणारा असेल असा अंदाज सप्टेंबर महिन्याच्या यूएसडीए अहवालात व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे सध्याची घसरण होत आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com