Agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

कापसाच्या भावात घसरण

डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. गेले अनेक दिवस सोयाबीनचे भाव वाढत होते. ही घट तात्पुरती असेल. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर, गहू व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.
 

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. गेले अनेक दिवस सोयाबीनचे भाव वाढत होते. ही घट तात्पुरती असेल. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर, गहू व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.
 
यापुढे खरीप पिकाची आवक कमी होत राहील. रब्बीचे उत्पादन समाधानकारक असेल, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर बहुतेक सर्व पिकांची मागणी वाढती असल्यामुळे भाव चढे राहतील. गेल्या महिन्यात साखर, गवार बी, हरभरा व कापसाचे भाव उतरत होते. खनिज तेलाच्या किमतीत घट होत होती. त्यामुळे गवार गम च्या निर्यातीवर विपरीत परिणाम होईल, या भीतीने गवार बीच्या किमती गेल्या महिन्यात कमी होत होत्या. या महिन्यात सोयाबीन पेंडीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये उन्हाळा वाढल्यामुळे तेथील पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीने व अमेरिका-चीन वादात अजून फारशी प्रगती नसल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढत आहेत. हरभ-याचा व्यापा-यांकडील साठा कमी होत आहे. निर्यात व स्थानिक मागणी वाढती असल्याने व या वर्षाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने या पिकाचे भाव नवीन पिकाची आवक सुरू होईपर्यंत वाढते राहतील. शासनाकडील साठा मात्र या भाववाढीवर नियंत्रण करेल. सोयाबीन भाववाढीचा परिणाम मक्याच्या वाढीवरपण होत आहे; कारण दोन्ही पिकांचा वापर पशु-खाद्य निर्मितीसाठी केला जातो. पशुखाद्याची मागणी वाढती आहे.

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.
मका

खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबर नंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ वर स्थिर आहेत. स्पॉट किमती (सांगली) ०.७ टक्क्यांनी वाढून रु. २,०२० वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बीचे उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील.

साखर
साखरेच्या (मार्च २०१९) किमती डिसेंबरमध्ये प्रथम घसरत होत्या; त्यानंतर त्या वाढून महिन्याअखेर रु. ३०२७ वर आल्या आहेत. सध्या रु. ३,०१९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९९० वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ३,३७२ व रु. ३,४४४ या दरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ४.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,८६५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने घसरून रु. ३,८२६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती मात्र २.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,९१७ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). निर्यात मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात किमती वाढण्याची शक्यता आहे. २९ जानेवारी रोजी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,८२६, ३,८७१, ३,९०६, ३,९४६ व ३,९८६ भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती डिसेंबर महिन्यात रु. ६,५५६ व रु. ६,९१४ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने २.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,३९८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,७०० वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.६ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,५९६). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे.

गहू
गव्हाच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २४ डिसेंबर नंतर रु. २,१६४ च्या आसपास होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. २,०२० वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ०.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. २,०८७). रब्बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक असतील.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४९९ ते रु. ४,२२६). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,३३६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती १.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४२०). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभ-याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,७०४ ते रु. ४,४६५). या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,२२९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१३१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मे २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३१२). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). मागणी वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (फेब्रुवारी २०१९) किमती डिसेंबर महिन्यात घसरत होत्या. (रु. २२,७१० ते रु. २१,११०). ही घसरण या महिन्यातसुद्धा कायम आहे. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी घसरून रु. २०,९६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,६५० वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,४९० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. मात्र, निर्यात मागणी वाढली, तर ही घसरण थांबू शकेल. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com 


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...
कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍...कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या...
हळद, कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढया सप्ताहात बहुतेक सर्वच पिकांच्या मागणीत वाढ...
खाद्यतेल आयात शुल्कात कपात करू नयेः एसईएनवी दिल्ली: आग्नेय आशियातील देशांबरोबर...
देशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७...पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख...
उत्तम शेतीसोबत पूरक उद्योगातून वाढवले...लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रगा गावातील रावसाहेब...
अन्न सुरक्षेत कृषी अर्थशास्त्रज्ञांची...परभणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
केंद्र सरकार कडधान्याचा पुरवठा करणार;...नवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन...
कापूस, मक्याला वाढती मागणी या सप्ताहात सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली,...
परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
साखर निर्यात अनुदान सहा महिन्यांपासून...कोल्हापूर : साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी...
साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच राहणार...कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात...