सोयाबीन, हळदीच्या फ्यूचर्स भावात वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

गेल्या सप्ताहात हळद वगळता सर्वच पिकांचे भाव उतरले किंवा स्थिर राहिले. हळदीत १.२ टक्क्यांची वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, हळद व गवार बीचे भाव वाढतील. साखर व कापसाचे भाव अधिक आवकेच्या अपेक्षेने कमी होतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मिरची मिरचीच्या (नोव्हेंबर २०१७) किमती या सप्ताहात त्या रु. ८,२२२  वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुंटूर) रु. ८,१५४ वर स्थिर आहेत. सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर २०१७ मधील फ्यूचर्स किमती १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ८,२६४).किमतींत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

सोयाबीन सोयाबीनच्या फ्यूचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती या सप्ताहात उत्पादन क्षेत्रातील पर्जन्यमान सुधारल्यामुळे २.६ टक्क्यांनी घसरून रु. २,९८९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २,९३४ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्यूचर्स किमती रु. ३,१५३ वर आल्या आहेत.  हमीभाव (बोनससहित) गेल्या वर्षी रु. २,७७५ होता. या वर्षी तो रु. ३,०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनावर येणार आहे.

मका खरीप मक्याच्या किमती या सप्ताहात त्या रु. १,३८९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १,४०८ वर आल्या आहेत. जानेवारीमधील फ्यूचर्स किमती रु. १,५५४ वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १,३६५ होता. या वर्षी तो रु. १,४२५ वर नेला आहे.  

हळद हळदीच्या फ्यूचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती सप्टेंबर महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ७,३५८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३९४ वर  आल्या आहेत. एप्रिल २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.७ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ७,५१८).  

गहू सप्टेंबर महिन्यात गव्हाच्या (नोव्हेंबर २०१७) किमती घसरत होत्या. (रु. १,६८२ ते  रु. १,६४३). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १,६४१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १,७६५ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.५  टक्क्यांनी कमी आहेत.

गवार बी गवार बीच्या फ्यूचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती या सप्ताहात रु. ३,६८९  वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३,७१४ वर आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जानेवारी २०१८ मधील फ्यूचर्स किमती २.६ टक्क्यांनी अधिक आहेत.

हरभरा हरभऱ्याच्या फ्यूचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती या सप्ताहात आणखी घसरून रु. ५,४४९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ५,४६४ वर आल्या आहेत. जानेवारी २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ४.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु.५,१९८).  रबीचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. मार्च एप्रिलमध्ये किमतींत आणखी उतरण्याची अपेक्षा आहे. रबी उत्पादन घेताना हेजिंगचा विचार करावा.

कापूस कापसाच्या फ्यूचर्स (नोव्हेंबर २०१७) किमती या सप्ताहात ०.५ टक्क्यांनी वाढून रु. १८,३६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती  रु. १८,८०५ वर आलेल्या आहेत. जानेवारी २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १८,३६०). (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).

साखर साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात रु. ३,३५१ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,६५८ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  जुलै (२०१८) च्या फ्यूचर्स किमती रु. ३,३५१ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे.  सणामुळे मागणी वाढती आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते  ३३७.३ दशलक्ष टनावर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३०६.७ दशलक्ष  टन). संपर्क ः डॉ. अरुण कुलकर्णी, arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com