Agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यता

डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 15 मार्च 2019

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत. हळदीची मागणी अजून मर्यादित आहे, उत्पादन वाढलेले आहे. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतर शेतमालाचे भाव वाढतील.
 
गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत. हळदीची मागणी अजून मर्यादित आहे, उत्पादन वाढलेले आहे. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतर शेतमालाचे भाव वाढतील.
 
गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका
रब्बी मक्याच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या (रु. १४६२ ते रु. १५५०).
या सप्ताहात त्या ९.२ टक्क्यांनी वाढून रु. १६९२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २०३७ वर आल्या आहेत. हमीभाव रु. १७०० आहे (गेल्या वर्षी तो रु. १४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील.

साखर
साखरेच्या (मे २०१९) किमती फेब्रुवारीमध्ये वाढत होत्या (रु. ३००५ ते रु. ३११९). सध्या त्या रु. ३११९ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३१५२ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ३९१४ ते रु. ३६६१). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ३६५९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३७८० वर आल्या आहेत. हमीभाव रु. ३३९९ आहे (गेल्या वर्षी तो रु. ३०५० होता). १२ मार्च रोजी मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३७१७, ३७७१, ३८२५, ३८७९, ३९३३ व ३७८० भाव होते.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६३९८ ते रु. ६१४८). या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६२६२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६२७५ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६४८६). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल; पण साठा कमी झाला आहे व निर्यात मागणी स्थिर आहे.

गहू
गव्हाच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. २०८७ ते रु. १८०८). या सप्ताहात त्या रु. १८५६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २०२५ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.२ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १९१९). रब्बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमीभाव रु. १८४० आहे (गेल्या वर्षी तो रु. १७३५ होता). एप्रिल-मेमध्ये बाजारभाव हमीभावाच्या जवळ असतील.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४४२१ ते रु. ४१८४). या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४२९८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४३१० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४४०४). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १४ फेब्रुवारीनंतर घसरत होत्या. (रु. ४३२९ ते रु. ४११४). या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. ४२३४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४१२४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४३६०). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४६२० आहे (गेल्या वर्षी तो रु. ४४०० होता). रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १८ फेब्रुवारीपर्यंत घसरत होत्या. (रु. २१,४५० ते रु. २०,६२०). त्यानंतर त्या रु. २०,९२० पर्यंत चढल्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २१,३१० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,६६९ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २१,६७० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी वाढण्याचा संभव आहे. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठ).
 
arun.cqr@gmail.com 


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...
कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍...कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या...
हळद, कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढया सप्ताहात बहुतेक सर्वच पिकांच्या मागणीत वाढ...
खाद्यतेल आयात शुल्कात कपात करू नयेः एसईएनवी दिल्ली: आग्नेय आशियातील देशांबरोबर...
देशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७...पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख...
उत्तम शेतीसोबत पूरक उद्योगातून वाढवले...लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रगा गावातील रावसाहेब...
अन्न सुरक्षेत कृषी अर्थशास्त्रज्ञांची...परभणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
केंद्र सरकार कडधान्याचा पुरवठा करणार;...नवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन...
कापूस, मक्याला वाढती मागणी या सप्ताहात सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली,...
परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
साखर निर्यात अनुदान सहा महिन्यांपासून...कोल्हापूर : साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी...
साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच राहणार...कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात...