कापसाच्या किमतीत आणखी सुधारणा

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

निवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने हळद वगळता इतर वस्तूंचे भाव वाढले. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी कमी होत आहे; उत्पादन (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) वाढलेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमतीसुद्धा नरम आहेत.   हळदीची मागणी अजून मर्यादित आहे. उत्पादन वाढलेले आहे. मक्याची मागणी वाढती आहे. कापसाची निर्यात मागणी वाढती आहे. चीन सध्या आपल्या देशातून आयात करीत आहे. त्यामुळे कापसाच्या किमतींत तेजी आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत रब्‍बी आवकेमुळे गहू व मका यांचे भाव घसरतील. इतरांचे मात्र वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रब्‍बी मक्याच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. १,४६२ ते रु. १,५५०) या सप्ताहात त्या ३ टक्क्यांनी वाढून रु. १,७४२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,०९२ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्‍बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील. साखर साखरेच्या (मे २०१९) किमती फेब्रुवारीमध्ये वाढत होत्या (रु. ३,००५ ते रु. ३,११९). सध्या त्या रु. ३,११९ वर स्थिर आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१४४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ३,९१४ ते रु. ३,६६१). या सप्ताहात त्या ०.५ टक्क्यांनी वाढून रु. ३,६७६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,७६१ वर आल्या आहेत. हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). १९ मार्च रोजी मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,७३४, ३,७८१, ३,७७८, ३,८७८, ३,८९७ व ३,६६७ भाव होते. हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,३९८ ते रु. ६,१४८). गेल्या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,२६२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या परत २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,१८० वर घसरल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,३४८). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण साठा कमी झाला आहे व निर्यात मागणी स्थिर आहे. गहू गव्हाच्या (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. २,०८७ ते रु. १,८०८). या सप्ताहात त्या २ टक्क्यांनी वाढून रु. १,८९४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,००६ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १,९१९). रब्‍बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजार भाव हमी भावाच्या जवळ असतील. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ४,४२१ ते रु. ४,१८४). गेल्या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,२९८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,३१५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४३४). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १४ फेब्रुवारीनंतर घसरत होत्या. (रु. ४,३२९ ते रु. ४,११४). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,२३४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,२४७ वर आल्या आहेत स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,११४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ४.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३०३). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). रब्‍बीची आवक सुरू झाल्यावर बाजार भाव हमी भावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती १८ फेब्रुवारीपर्यंत घसरत होत्या. (रु. २१,४५० ते रु. २०,६२०). त्या नंतर त्या रु. २०,९२० पर्यंत चढल्या. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. २१,३१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. २१,४८० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,२२२ वर आल्या आहेत. जून २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,०४० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी वाढत आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.com 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com