सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा किमतीत वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व पिकांच्या किमतीत घट झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या किमतीत फेब्रुवारी/मार्चमध्ये फ्युचर्स किमतीत वाढ दिसून येत आहे. सध्या सर्व पिकांच्या आवकेत वाढ होत आहे. यापुढे खरिपाच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा आहे. मात्र खरीप पिकाच्या नुकसानीचा अजून अंदाज येत नाही. रब्बी पिकाचे उत्पादन या वर्षी वाढण्याचा संभव आहे. गेल्या सप्ताहातील व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका (खरीप) खरीप मक्यामध्ये अजून फारसे व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात रु. २,००० ते रु. २,०६० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ३.९ टक्क्यांनी घसरून रु १,९७० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) ६.४ टक्क्यांनी घसरून रु. १,९०६ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. सोयाबीन सोयाबीनच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,६६२ ते रु. ३,८२२). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,९७२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १ टक्क्यांनी वाढून रु. ४,०४० वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी रु. ४,०३४ भाव आहे. सोयाबीनमधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती १८ ऑक्टोबरपर्यंत उतरत होत्या. (रु. ६,१२० ते रु. ५,७२०). नंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या ५.५ टक्क्यांनी उतरून रु. ५,९९० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,१२६ वर आल्या आहेत. एप्रिलच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,४१६). गहू गव्हाच्या (डिसेंबर २०१९) किमती १६ ऑक्टोबरपासून उतरत होत्या. (रु. २,१८० ते रु. २,१३६). या सप्ताहात त्या रु. २,१४५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१३२ वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२०१). गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,९३८ ते रु. ४,११८). गेल्या सप्ताहात त्या ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,२४४ वर आल्या होत्या. याही सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,३११ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२७५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३६२). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२४७ ते रु. ४,५२०). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,४८४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४१५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मार्चमधील फ्युचर्स किमती १.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४११). कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबरमध्ये वाढत होत्या. (रु. १८,९०० ते रु. १९,४१०). या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी घसरून रु. १८,९४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,७४० वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती रु. १९,२३० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. मूग मुगाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ६,२९१ ते ६,५८९). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,८३० वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,७०० वर आल्या आहेत. नवीन मूग अजून पुरेसा येत नाही. फेब्रुवारी च्या फ्युचर्स किमती रु. ७,२२२ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. बासमती तांदूळ बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,१२५ वर आल्या आहेत. टीप ः (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्ति १७० किलोची गाठ).   arun.cqr@gmail.com 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com