Agriculture story in marathi, Forward market for agriculture commodities | Agrowon

सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा किमतीत वाढ

डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व पिकांच्या किमतीत घट झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या किमतीत फेब्रुवारी/मार्चमध्ये फ्युचर्स किमतीत वाढ दिसून येत आहे.

सध्या सर्व पिकांच्या आवकेत वाढ होत आहे. यापुढे खरिपाच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा आहे. मात्र खरीप पिकाच्या नुकसानीचा अजून अंदाज येत नाही. रब्बी पिकाचे उत्पादन या वर्षी वाढण्याचा संभव आहे. गेल्या सप्ताहातील व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व पिकांच्या किमतीत घट झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या किमतीत फेब्रुवारी/मार्चमध्ये फ्युचर्स किमतीत वाढ दिसून येत आहे.

सध्या सर्व पिकांच्या आवकेत वाढ होत आहे. यापुढे खरिपाच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा आहे. मात्र खरीप पिकाच्या नुकसानीचा अजून अंदाज येत नाही. रब्बी पिकाचे उत्पादन या वर्षी वाढण्याचा संभव आहे. गेल्या सप्ताहातील व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका (खरीप)
खरीप मक्यामध्ये अजून फारसे व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात रु. २,००० ते रु. २,०६० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ३.९ टक्क्यांनी घसरून रु १,९७० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) ६.४ टक्क्यांनी घसरून रु. १,९०६ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे.

सोयाबीन
सोयाबीनच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,६६२ ते रु. ३,८२२). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,९७२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १ टक्क्यांनी वाढून रु. ४,०४० वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमीभाव रु. ३,७१० आहे. फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी रु. ४,०३४ भाव आहे. सोयाबीनमधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती १८ ऑक्टोबरपर्यंत उतरत होत्या. (रु. ६,१२० ते रु. ५,७२०). नंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या ५.५ टक्क्यांनी उतरून रु. ५,९९० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,१२६ वर आल्या आहेत. एप्रिलच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,४१६).

गहू
गव्हाच्या (डिसेंबर २०१९) किमती १६ ऑक्टोबरपासून उतरत होत्या. (रु. २,१८० ते रु. २,१३६). या सप्ताहात त्या रु. २,१४५ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१३२ वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२०१).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,९३८ ते रु. ४,११८). गेल्या सप्ताहात त्या ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,२४४ वर आल्या होत्या. याही सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,३११ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२७५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३६२).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२४७ ते रु. ४,५२०). या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,४८४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४१५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मार्चमधील फ्युचर्स किमती १.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४११).

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबरमध्ये वाढत होत्या. (रु. १८,९०० ते रु. १९,४१०). या सप्ताहात त्या २.३ टक्क्यांनी घसरून रु. १८,९४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,७४० वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती रु. १९,२३० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत.

मूग
मुगाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ६,२९१ ते ६,५८९). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,८३० वर आल्या आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,७०० वर आल्या आहेत. नवीन मूग अजून पुरेसा येत नाही. फेब्रुवारी च्या फ्युचर्स किमती रु. ७,२२२ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत.

बासमती तांदूळ
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,१२५ वर आल्या आहेत.

टीप ः (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्ति १७० किलोची गाठ).
 
arun.cqr@gmail.com 


इतर अॅग्रोमनी
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...
खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...
हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...