कापूस, मक्याला वाढती मागणी

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली, त्यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्व पिकांच्या किमतींत वाढ दिसून आली. हळद, गवार बी व सोयाबीन यांच्यात ही वाढ लक्षणीय होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सर्व पिकांच्या मार्च/ एप्रिल फ्युचर्स किमतींतसुद्धा वाढ दिसून येत आहे. कापूस, मका व गवार बी यांच्यात ही वाढ जास्त आहे.   खरीप पिकांची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली, तरी रब्बी उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतींतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका (खरीप) खरीप मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबर महिन्यात उतरत होत्या (रु. २,०७० ते रु. १,८५८). गेल्या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. २,०३६ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.९ टक्क्यांनी वाढून रु. २,०७४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) २ टक्क्यांनी वाढून रु. २,०६३ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. मक्याची मागणी वाढती आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १८ नोव्हेंबरपासून वाढत आहेत. (रु. ३,९७४ ते रु. ४,१००). गेल्या सप्ताहातसुद्धा त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,२९६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,३२८ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. मार्च डिलिवरीसाठी रु. ४,३६६ भाव आहे. सोयाबीनमधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबरमध्ये उतरत होत्या (रु. ६,५६८ ते रु. ६,०६८). गेल्या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,९४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,२०६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. २.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,०२९ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,१७४). गहू गव्हाच्या (जानेवारी २०२०) किमती ८ नोव्हेंबरपासून उतरत आहेत (रु. २,२१४ ते रु. २,१४५). गेल्या सप्ताहातसुद्धा त्या ०.३ टक्क्यांनी उतरून रु. २,१४१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. २,१५० वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१३८ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१६९). गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १५ नोव्हेंबरपासून उतरत आहेत (रु. ४,४३५ ते रु. ४,१३०). गेल्या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,९५० वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,०७६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,०२५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्चमधील फ्युचर्स किमती ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१५२). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती १४ नोव्हेंबरनंतर घसरत आहेत. (रु. ४,५५४ ते रु. ४,३७३). गेल्या सप्ताहातसुद्धा त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ४,४०० वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,४२९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३२६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिलमधील फ्युचर्स किमती ०.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३५९). कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती ११ नोव्हेंबरनंतर वाढत आहेत. (रु. १८,९८० ते रु. १९,४८०). गेल्या सप्ताहात त्या रु. १९,२२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. १९,३७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,७०२ वर आल्या आहेत. मार्चच्या फ्युचर्स किमती रु. १९,७०० वर आलेल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत. मूग मुगात अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (मेरता) किमती ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ६,८५२ वर आल्या आहेत. मार्च फ्युचर्स किमती रु. ६,९५१ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत. बासमती तांदूळ बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,२०० वर आल्या आहेत. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १७० किलोची गाठी).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com