Agriculture story in marathi forward market for agriculture commodities | Agrowon

कापूस, मक्याला वाढती मागणी

डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

या सप्ताहात सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली, त्यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्व पिकांच्या किमतींत वाढ दिसून आली. हळद, गवार बी व सोयाबीन यांच्यात ही वाढ लक्षणीय होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सर्व पिकांच्या मार्च/ एप्रिल फ्युचर्स किमतींतसुद्धा वाढ दिसून येत आहे. कापूस, मका व गवार बी यांच्यात ही वाढ जास्त आहे.
 

खरीप पिकांची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली, तरी रब्बी उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतींतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

या सप्ताहात सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली, त्यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्व पिकांच्या किमतींत वाढ दिसून आली. हळद, गवार बी व सोयाबीन यांच्यात ही वाढ लक्षणीय होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सर्व पिकांच्या मार्च/ एप्रिल फ्युचर्स किमतींतसुद्धा वाढ दिसून येत आहे. कापूस, मका व गवार बी यांच्यात ही वाढ जास्त आहे.
 

खरीप पिकांची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली, तरी रब्बी उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतींतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका (खरीप)
खरीप मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबर महिन्यात उतरत होत्या (रु. २,०७० ते रु. १,८५८). गेल्या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी वाढून रु. २,०३६ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.९ टक्क्यांनी वाढून रु. २,०७४ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) २ टक्क्यांनी वाढून रु. २,०६३ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमीभाव रु. १,७६० आहे. मक्याची मागणी वाढती आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १८ नोव्हेंबरपासून वाढत आहेत. (रु. ३,९७४ ते रु. ४,१००). गेल्या सप्ताहातसुद्धा त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,२९६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती ३.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,३२८ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. मार्च डिलिवरीसाठी रु. ४,३६६ भाव आहे. सोयाबीनमधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबरमध्ये उतरत होत्या (रु. ६,५६८ ते रु. ६,०६८). गेल्या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ५,९४२ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ४.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,२०६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. २.८ टक्क्यांनी वाढून रु. ६,०२९ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,१७४).

गहू
गव्हाच्या (जानेवारी २०२०) किमती ८ नोव्हेंबरपासून उतरत आहेत (रु. २,२१४ ते रु. २,१४५).
गेल्या सप्ताहातसुद्धा त्या ०.३ टक्क्यांनी उतरून रु. २,१४१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. २,१५० वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१३८ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१६९).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १५ नोव्हेंबरपासून उतरत आहेत (रु. ४,४३५ ते रु. ४,१३०). गेल्या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,९५० वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,०७६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,०२५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्चमधील फ्युचर्स किमती ३.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,१५२).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती १४ नोव्हेंबरनंतर घसरत आहेत. (रु. ४,५५४ ते रु. ४,३७३). गेल्या सप्ताहातसुद्धा त्या १.८ टक्क्यांनी घसरून रु. ४,४०० वर आल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,४२९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३२६ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिलमधील फ्युचर्स किमती ०.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३५९).

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती ११ नोव्हेंबरनंतर वाढत आहेत. (रु. १८,९८० ते रु. १९,४८०). गेल्या सप्ताहात त्या रु. १९,२२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. १९,३७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,७०२ वर आल्या आहेत. मार्चच्या फ्युचर्स किमती रु. १९,७०० वर आलेल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.३ टक्क्यांनी अधिक आहेत.

मूग
मुगात अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (मेरता) किमती ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ६,८५२ वर आल्या आहेत. मार्च फ्युचर्स किमती रु. ६,९५१ वर आल्या आहेत. मुगाचे हमीभाव रु. ७,०५० आहेत.

बासमती तांदूळ
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,२०० वर आल्या आहेत.
(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १७० किलोची गाठी).  


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...
कोल्हापुरात गुळाच्या आवकेत तीस टक्क्‍...कोल्हापूर: येथील बाजार समितीत गेल्या हंगामाच्या...
हळद, कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढया सप्ताहात बहुतेक सर्वच पिकांच्या मागणीत वाढ...
खाद्यतेल आयात शुल्कात कपात करू नयेः एसईएनवी दिल्ली: आग्नेय आशियातील देशांबरोबर...
देशात आगाप रब्बी कांदा लागणीत १७...पुणे : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रमुख...
उत्तम शेतीसोबत पूरक उद्योगातून वाढवले...लातूर जिल्ह्यातील भोईसमुद्रगा गावातील रावसाहेब...
अन्न सुरक्षेत कृषी अर्थशास्त्रज्ञांची...परभणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
केंद्र सरकार कडधान्याचा पुरवठा करणार;...नवी दिल्ली: खरिप हंगामात कडधान्याचे उत्पादन...
कापूस, मक्याला वाढती मागणी या सप्ताहात सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली,...
परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
साखर निर्यात अनुदान सहा महिन्यांपासून...कोल्हापूर : साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी...
साखर उत्पादनात उत्तरप्रदेशच राहणार...कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात साखर उत्पादनात...