हळद, कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढ

शेतीमालाचा वायदेबाजार
शेतीमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात बहुतेक सर्वच पिकांच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे गेल्या सप्ताहाच्या तुलनेने हळदीखेरीज इतर सर्व पिकांच्या किमतींत वाढ दिसून आली. हरभरा, मका, गवार बी व सोयाबीन यांच्यात ही वाढ लक्षणीय होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सर्व पिकांच्या मार्च/ एप्रिल फ्युचर्स किमतींतसुद्धा वाढ दिसून येत आहे. कापूस, हळद व गवार बी यांच्यात ही वाढ जास्त आहे.   खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी रब्बी उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. २३ डिसेंबरपर्यंत गहू, तांदूळ, हरभरा व ज्वारीसाठी २०१८-१९ च्या तुलनेने २०१९-२० मध्ये अधिक क्षेत्र लागवडीखाली आले आहे. तेलबिया व मका यांच्यात काही प्रमाणात घट दिसत आहे. १८ डिसेंबर रोजी २०१९ एनसीडीएक्समध्ये बाजरीचे पुनरागमन झाले. बरोबर याच दिवशी २०१५ मध्ये या पिकांचे फ्युचर्स व्यवहार बंद करण्यात आले होते. बाजरीचे डिलिवरी केंद्र जयपूर आहे. सोयाबीनमधील तेजी लक्षात घेऊन त्यावरचे मार्जिन २६ डिसेंबर पासून १ टक्क्याने व ३१ डिसेंबर पासून २ टक्क्यांनी वाढवले आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीएक्स व एमसीएक्समधील किमतींतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्यामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबर महिन्यात उतरत होत्या (रु. २,०७० ते रु. १,८५८). गेल्या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी वाढून रु २,०७४ वर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या २.६ टक्क्यांनी वाढून रु. २,१२८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) २.७ टक्क्यांनी वाढून रु. २,११९ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे. मक्याची मागणी वाढती आहे. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १८ नोव्हेंबरपासून वाढत आहेत. (रु. ३,९७४ ते रु. ४,१००). गेल्या सप्ताहातसुद्धा त्या २.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,२९६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३ टक्क्यांनी वाढून रु. ४,४२६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,४४१ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. मार्च डिलिवरीसाठी रु. ४,४७८ भाव आहे. सोयाबीनमधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती नोव्हेंबरमध्ये उतरत होत्या (रु. ६,५६८ ते रु. ६,०६८). गेल्या सप्ताहात त्या ४.४ टक्क्यांनी वाढून रु. ६,२०६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ६,११८ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ०.५ टक्क्यांनी घसरून रु. ६,००० वर आल्या आहेत. मे च्या फ्युचर्स किंमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,१३८). गहू गव्हाच्या (जानेवारी २०२०) किमती ८ नोव्हेंबरपासून उतरत आहेत. (रु. २,२१४ ते रु. २,१४५). गेल्या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. २,१५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. २,२०४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१७५ वर आल्या आहेत. मेच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,२०४). गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती १५ नोव्हेंबरपासून उतरत आहेत (रु. ४,४३५ ते रु. ४,१३०). गेल्या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ४,०७६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २ टक्क्यांनी वाढून रु. ४,१५८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,०८३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा मार्च मधील फ्युचर्स किमती ४.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२५६). हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०२०) किमती १४ नोव्हेंबरनंतर घसरत आहेत. (रु. ४,५५४ ते रु. ४,३७३). गेल्या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी वाढून रु. ४,४२९ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ३ टक्क्यांनी वाढून रु. ४,५६३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,४५० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा एप्रिल मधील फ्युचर्स किमती ०.४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४,४३०). कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जानेवारी २०२०) किमती ११ नोव्हेंबर नंतर वाढत आहेत. (रु. १८,९८० ते रु. १९,४८०). गेल्या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. १९,३७० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी घसरून रु. १९,२६० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,८६५ वर आल्या आहेत. मार्चच्या फ्युचर्स किमती रु. १९,८२० वर आलेल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत. मूग मुगात अजून व्यवहार होत नाहीत. मात्र, भावात तेजी आहे. स्पॉट (मेरता) किमती १.७ टक्क्यांनी वाढून रु. ६,९६९ वर आल्या आहेत. मार्च फ्युचर्स किमती रु. ७,०६२ वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत. बासमती तांदूळ बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,२०० वर स्थिर आहेत. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).   arun.cqr@gmail.co 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com