Agriculture story in marathi forward market for agril commodities | Agrowon

वायदा बाजारात सोयाबीन, कापसाच्या किंमतीत वाढीचा कल

डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट झाली इतर पिकांमध्ये वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सर्व पिकांच्या किमतींत फेब्रुवारी/मार्च फ्युचर्स किमतींत वाढ दिसून येत आहे.

आता खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकांच्या विक्रीचे व रब्बीच्या उत्पादनाचे नियोजन करण्याची ही वेळ आहे. या अंकापासून त्याची सुरुवात सोयाबीनपासून करू या.

या सप्ताहात खरीप मका, हळद, गवार बी यांच्यात घट झाली इतर पिकांमध्ये वाढ झाली. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने सर्व पिकांच्या किमतींत फेब्रुवारी/मार्च फ्युचर्स किमतींत वाढ दिसून येत आहे.

आता खरीप पिकाची आवक सुरू झाली आहे. खरीप पिकांच्या विक्रीचे व रब्बीच्या उत्पादनाचे नियोजन करण्याची ही वेळ आहे. या अंकापासून त्याची सुरुवात सोयाबीनपासून करू या.

सोयाबीनचा हमी भाव रु. ३,७१० आहे. अमेरिकन शेती खात्याच्या या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार या वर्षी सोयाबीनचा जागतिक पुरवठा (वर्षाच्या सुरुवातीचा साठा अधिक चालू वर्षातील उत्पादन) गेल्या वर्षापेक्षा सहा टक्क्यांनी कमी असेल. वर्षअखेर साठासुद्धा १३ टक्क्यांनी कमी होईल. एकूण तेल-बियांचा पुरवठा व साठासुद्धा कमी राहील. त्यामुळे जागतिक भाव चढते राहतील.

सोयाबीन विक्रीचे नियोजन ः
भारतातील सध्या सोयाबीनची स्पॉट किमत रु. ३,९५६ आहे. डिसेंबर फ्युचर्स किमत ३,९८९ आहे. ती एप्रिलपर्यंत रु. ४,१३० असेल. भारतात अति-वृष्टीचा फटका मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील सोयाबीनच्या क्षेत्राला बसला आहे. सोयाबीनच्या भारतातील भावांवर आंतरराष्ट्रीय भावांचासुद्धा परिणाम होतो. ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनच्या भावात वाढीचा कल होता. अजून तो कायम आहे. या सर्वांचा विचार करून विक्रीचे नियोजन करावे. नियोजन करताना खालील पर्याय लक्षात घ्यावेत.

  • सध्याच्या स्पॉट मार्केटमध्ये सोयाबीन विकणे.
  • भाव वाढण्याची वाट पाहणे व विक्री लांबणीवर टाकणे.
  • फ्युचर्स भावाने भविष्यात डिलिवरी देण्याचा करार करणे व तोपर्यंत मालाची साठवणूक करणे.
  • फ्युचर्स मार्केटमध्ये माल विकणे व डिलिवरी तारखेपर्यंत मालाची साठवणूक करणे ( व शक्य असल्यास त्यावर तारण कर्ज घेणे).

गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्स मधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका (खरीप)
खरीप मक्यामध्ये अजून फारसे व्यवहार होत नाहीत. मक्याच्या (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात रु. २,००० ते रु. २,०६० च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ३.१ टक्क्यांनी घसरून रु १,८५७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) ३.१ टक्क्यांनी घसरून रु. १,८४८ वर आल्या आहेत. या वर्षीचा हमी भाव रु. १,७६० आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,६६२ ते रु. ३,८२२). या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,९८९ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,९५६ वर आल्या आहेत. नवीन वर्षासाठी हमी भाव रु. ३,७१० आहे. फेब्रुवारी डिलिवरीसाठी रु. ४,०३८ भाव आहे. सोयाबीनमधील तेजी अजून कायम राहण्याची शक्यता आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती १८ ऑक्टोबरपर्यंत उतरत होत्या. (रु. ६,१२० ते रु. ५,७२०). नंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या २.८ टक्क्यांनी उतरून रु. ५,८२० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,००५ वर आल्या आहेत. एप्रिलच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ४.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,२५४).

गहू
गव्हाच्या (डिसेंबर २०१९) किमती १६ ऑक्टोबरपासून उतरत होत्या. (रु. २,१८० ते रु. २,१३६). या सप्ताहात त्या रु. २,१६६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोटा) किमती रु. २,१५५ वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,१८६).

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ३,९३८ ते रु. ४,११८). गेल्या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,३११ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,२९४ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,२३१ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती २.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३५०).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२४७ ते रु. ४,५२०). या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,४८९ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३८८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा मार्चमधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४७५).

कापूस
एमसीएक्स मधील कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर मध्ये वाढत होत्या. (रु. १८,९०० ते रु. १९,४१०). या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी वाढून रु. १९,१३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,४२५ वर आल्या आहेत. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती रु. १९,३२० वर आलेल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४.९ टक्क्यांनी अधिक आहेत.

मूग
मुगाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१९) किमती ऑक्टोबर महिन्यात वाढत होत्या (रु. ६,२९१ ते ६,५८९). या सप्ताहात त्या रु. ६,८३० वर स्थिर आहेत. स्पॉट (मेरता) किमती रु. ६,६१७ वर आल्या आहेत. नवीन मूग अजून पुरेसा येत नाही. फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमती रु. ७,०९० वर आल्या आहेत. मुगाचे हमी भाव रु. ७,०५० आहेत.

बासमती तांदूळ
बासमती तांदळामध्ये अजून व्यवहार होत नाहीत. स्पॉट (कर्नाल) किमती रु. ३,१५० वर आल्या आहेत.

टीप ः (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किमत प्रती १७० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com 


इतर अॅग्रोमनी
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...