agriculture story in marathi, four relatives with altogether has set up potato chips making business. | Page 2 ||| Agrowon

बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्ड

संदीप नवले
शनिवार, 4 सप्टेंबर 2021

पुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर व त्यांचे तीन भाचे अशा चौघांनी एकत्र येत ‘बटाटा चिप्स’ व मसालेदार उत्पादने उद्योग सुरू केला आहे. ‘नेचर टॉप’ या ब्रॅण्डद्वारे उत्पादनांना बाजारपेठही मिळवून देत त्यातून रोजगारनिर्मिती केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर व त्यांचे तीन भाचे अशा चौघांनी एकत्र येत ‘बटाटा चिप्स’ व मसालेदार उत्पादने उद्योग सुरू केला आहे. ‘नेचर टॉप’ या ब्रॅण्डद्वारे उत्पादनांना बाजारपेठही मिळवून देत त्यातून रोजगारनिर्मिती केली आहे. 

ताज्या शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने काही शेतकरी प्रक्रिया उद्योगामध्ये संधी शोधत आहेत. पुणे जिल्ह्यात चाकण-शिक्रापूर महामार्गालगत सुमारे वीस गुंठे जागेत त्यापैकीच डिलाइट स्नॅक्स फूड्स ही कंपनी सुरू झाली आहे. शिरूर तालुक्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर यांची शेती आहे. ते व त्यांचे तीन भाचे श्रीराम बजरंग भगत, संकेत युवराज मोहिते, बापू कैलास साबळे अशा चौघांनी त्या ठिकाणी बटाट्यावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.

कोरोना संकटातून संधी
आदेश सांगतात, की कोरोना संकट काळात नोकऱ्या धोक्यात आल्या. त्यामुळे सक्षम आर्थिक पर्याय शोधण्याच्या दृष्टीने माझे भाचे एकत्र आले. बाजारपेठांतील मागणी, संधी यांचा अभ्यास करून आपण उद्योग सुरू करावा व स्वतःसाठीच रोजगार तयार करावा असे त्यांनी ठरवले. कोणता पर्याय निवडावा यासाठी विचारमंथन केले. विविध उद्योगांची माहिती घेतली. भाचे श्रीराम यांना एका आघाडीच्या अन्न प्रक्रिया उद्योगातील खासगी कंपनीतील पंधरा वर्षांचा अनुभव होता. त्यातून बटाट्यावर प्रक्रिया करण्याचे निश्‍चित झाले. आदेश यांनीच मग आपली वीस गुंठे जागा, त्याचबरोबर पाण्याची सोय उपलब्ध केली. ५० लाख रुपयांपर्यंत भांडवलाची गरज होती. तीही उभी केली. प्रक्रियेसाठी आवश्‍यक पीलर, स्लायसर, ड्रायर, फ्रायर, मसाला ड्रम, पॅकिजिंग अशा विविध यंत्रांची खरेदी गुजरातहून केली. त्यासाठी जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च आला.

अशी होते प्रक्रिया

  • ‘पोटॅटो चिप्स’ तयार करण्यासाठी लागणारा बटाटा स्वतःच्या शेतीसह गुजरातहून घेतला जातो.
  • प्रसंगी शेतकऱ्यांकडूनही खरेदी होते. साधारणपणे प्रति किलो १० ते १५ रुपये दर त्यासाठी पडतो.
  • खरेदीनंतर कंपनीमध्ये साठवणूक करून मागणीनुसार वापरला जातो. प्रक्रियेपूर्वी बटाटा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला जातो. पिलरद्वारे साल काढली जाते. त्यानंतर ‘स्लायसर’च्या आधारे ‘चिप्स’ तयार केले जातात. ‘ड्रायर’द्वारे सुकवणी होते. त्यानंतर ‘फ्रायर’द्वारे तळून घेतले जातात. मागणीप्रमाणे मसाल्यांचा वापर करून उत्पादन तयार होते.

उत्पादनांचे ‘मार्केटिंग’
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, दौंड, पुणे शहर, तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर येथील किराणा व हॉटेल व्यावसायिकांना उत्पादने पुरवली जातात. मालाचा पुरवठा करण्यासाठी वाहनही घेतले आहे. सुरुवातीला ब्रॅण्ड स्थापित करण्यासाठी खूप कष्ट पडले. मात्र दोघे भाचे पूर्वी एका कृषी कंपनीत ‘मार्केटिंग’ विभागात नोकरीस असल्याने त्यांचा अनुभव कामी आला.

उत्पादनाविषयी
‘नेचर टॉप’ असा उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार केला आहे. सॉल्टेड, टोमॅटो, मसाला, क्रीम ॲण्ड ओनियन अशा चार स्वादांमध्ये (फ्लेवर्स) चिप्स सादर केले आहेत. बाजारपेठेतील मागणीनुसार १५ ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम असे ‘फूड ग्रेड लॅमिनेटेड’ पॅकिंग केले आहे. अनुक्रमे ५ रुपये, ५० रुपये व १०० रुपये असे त्यांचे दर आहेत. जोडीला मसाला कुरकुरे श्रेणीतील सुमारे सहा ते सात विविध उत्पादने उपलब्ध केली आहेत. पदार्थांची ‘रेसिपी’, स्वाद, गुणवत्ता या बाबींमध्ये श्रीराम यांचा अनुभव उपयोगी ठरला आहे. ‘फूड सेफ्टी’ विषयी केंद्र सरकारच्या संबंधित संस्थेचा परवानाही घेतला आहे.

गुणवत्तेत कोठेही तडजोड करीत नसल्याने बाजारपेठेत आमच्या उत्पादनांना पसंती मिळत असल्याचे आदेश सांगतात.

उलाढाल
चिप्स बनविण्यासाठी प्रामुख्याने बटाटा, तेल, मसाला, वीज, मजूर, पॅकिंग मटेरिअल, वाहतूक या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी दर महिन्याला सुमारे ८ लाख रुपये खर्च येतो. पैकी बटाटा आणि तेल यावरील खर्च सुमारे ५ लाख रुपयांच्या घरात आहे. महिन्याला सुमारे दहा लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत आहे. कोरोना संकटाच्या काळात अडचणी आल्याने आर्थिक फटकाही बसला.या उद्योगाच्या रूपाने चार महिला व काही पुरुषांना स्थानिक रोजगारही उपलब्ध झाला आहे.
कामगारांना उद्योगाचे प्रशिक्षण दिल्याने त्यांच्यात कौशल्यवृद्धी देखील झाली आहे.
येत्या काळात ‘ऑटोमेशन’चा वापर करण्याचे नियोजन व खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

संपर्क- श्रीराम बजरंग भगत, ८१२८५१७४०७
आदेश काटकर, ९६५७५३४५२४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...