agriculture story in marathi, four turmeric producer friends have started powder making business successfully with turnover four crores. | Agrowon

प्रक्रियेमुळे उत्पन्न वाढले शेतकऱ्यांना मार्केट मिळाले

चंद्रकांत जाधव
शनिवार, 2 जानेवारी 2021

वाघोदे बुद्रुक (ता. रावेर, जि. जळगाव) येथील किशोर पाटील व सहकाऱ्यांनी हळद पावडरनिर्मिती व हळकुंड विक्री व्यवसाय सुरू केला आहे. स्वतःबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांनाही नजीकचे मार्केट त्यामुळे उपलब्ध झाले आहे.

वाघोदे बुद्रुक (ता. रावेर, जि. जळगाव) येथील किशोर पाटील व सहकाऱ्यांनी हळद पावडरनिर्मिती व हळकुंड विक्री व्यवसाय सुरू केला आहे. स्वतःबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांनाही नजीकचे मार्केट त्यामुळे उपलब्ध झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल परिसर केळीसह हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. वाघोदे बुद्रुक (ता. रावेर) येथे किशोर पाटील व त्यांचे सहकारी अनिल महाजन, मोहन पाटील व सुभाष महाजन या हळद उत्पादकांनी केवळ शेतीवर भर न देता त्यातून उद्योग कसा उभा राहील याकडे अधिक लक्ष दिले. त्यामागील कारणही तसेच होते. हळद विक्रीसाठी या भागातील शेतकऱ्यांना सांगलीला जावे लागायचे. ही बाब खर्चिक ठरायची.

उद्योगाचा मुख्य हेतू
आपणच हळदीवर प्रक्रिया सुरू केली तर आपल्याला चार पैसे अधिक मिळतीलच. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांनाही स्थानिक बाजारपेठ तयार होईल असा विचार किशोर यांनी केला.

उद्योग अवतरला प्रत्यक्षात
किशोर यांची ३० एकर शेतीपैकी तीन एकरांत हळद आहे. वाघोदा गावानजीकच्या बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्गावर सुमारे १० हजार चौरस फुटांचे गोदाम आहे. येथेच ओल्या हळदीवर शिजवणी व वाळवणुकीची प्रक्रिया केली जाते. गोदामाताली यंत्रात हळकुंडाची प्रतवारी केली जाते. नंतर मजुरांकरवी पुन्हा प्रतवारी होऊन हळकुंडे ५० किलो क्षमतेच्या तागाच्या पोत्यांमध्ये भरली जातात.
किशोर व सहकारी प्रत्येकी तीन ते आठ एकरांत हळदीचे उत्पादन घेतात. परंतु वाढता व्यापार, मागणी लक्षात घेऊन ओल्या व शिजवलेल्या हळदीची खरेदी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जाते.
जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल व अन्य भागातील शेतकऱ्यांकडून शक्य असल्यास थेट जागेवर व वाघोदा येथील केंद्रात ही खरेदी होते.

 • नेटवर्क उभारलेल्या शेतकऱ्यांची संख्या- सुमारे २००
 • पावडरनिर्मितीसाठी सावदा (ता. रावेर) येथील एका सेवा पुरवठादाराकडून कार्यवाही करून घेतली जाते. उर्वरित प्रक्रिया म्हणजेच पॅकिंग, साठवणूक वाघोदा येथील गोदामात होते. 
 • प्रक्रिया जलद गतीने व आधुनिक स्वरूपात व्हावी यासाठी अहमदाबाद येथून यंत्रणा खरेदी केली आहे. लवकरच ती कार्यान्वित होईल.
 • हळकुंड प्रक्रियेसाठी इंधनचलित प्रतवारी यंत्र, तीन पॉलिशर्स व तीन बॉयलर्स आहेत.
 • चौघेही भागीदार आपापसांत नात्यांमधील आहेत. अनिल हे मार्केटिंग, सुभाष खरेदी आणि मोहन हे प्रक्रिया, पॅकिंगसंबंधीच्या कामावर लक्ष ठेवतात.
 • दरवर्षीची खरेदी
 • ओली हळद- किमान २५ हजार क्विंटल, दर प्रतिक्विंटल ८०० ते
 • एक हजार रुपये.
 • वाळविलेली हळद- ४५०० ते ५५०० रु. प्रति क्विंटल (प्रतवारीनुसार)

मार्केट

 • सुमारे चार वर्षांच्या प्रयत्नांतून किशोर व सहकाऱ्यांनी व्यवसाय वृद्धी करण्याचा प्रयत्न
 • केला आहे. दरवर्षी किमान चार ते पाच हजार क्विंटल वाळलेल्या हळकुंडाची विक्री होते.
 • तर ५०० क्विंटलपर्यंत हळद पावडर बाजारात विकली जात आहे.
 • सात्त्विक हा ब्रॅण्ड तयार केला आहे. हळकुंडे दिल्ली, राजस्थानमधील अलवर, जयपूर, मध्य प्रदेशातील देवास, इंदूर आणि राज्यात जळगाव येथे पुरवली जातात. येथे अनेक मोठे खरेदीदार आहेत.
 • हळद पावडरीची मुख्यतः पुणे, मुंबई, जळगाव भागांत विक्री केंद्रित केली आहे. या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या काही तरुणांना विक्री व्यवस्थेची जबाबदारी दिली आहे. आपला उद्योग व नोकरी सांभाळून उत्पन्नस्रोत वाढविण्यासाठी या तरुणांनाही त्याचा उपयोग होतो.
 • अलीकडे धणे, मिरची पावडर व मसाले विक्रीही सुरू केली आहे. बाजारातील मागणीनुसार विविध आकार, वजनाच्या पॅकेटमधून उत्पादने दाखल केली आहेत. हळद १०० टक्के सेलम वाणाची असते. त्याची एमआरपी प्रति किलोस २१५ रुपये, तर अर्धा किलोसाठी १२० रुपये आहे. काही ग्राहक १० किलो पॅकिंगमधूनही घेऊन जातात.

उलाढाल
बाजारपेठ शोध व विस्तारातून उलाढाल चार ते साडेचार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात किशोर व सहकारी यशस्वी झाले आहेत. लॉकडाउनमध्येही काही दिवस वगळता हा उद्योग मागणीमुळे सुरू होता. त्यामुळे यंदाही चांगली उलाढाल अपेक्षित आहे. यात अधिक खर्च मजुरीवर अधिक लागतो. फेब्रुवारी ते मे महिन्यांदरम्यान बॉयलिंग, हाताळणी यासाठी दररोज २५ मजुरांची गरज असते. हळकुंड प्रतवारी, पॅकिंग व अन्य कार्यवाहीसाठी बारमाही २५ मजूर कार्यरत असतात. त्यावर दरवर्षी ३० लाख रुपये खर्च येतो. तागाच्या गोण्यांसाठी दरवर्षी किमान अडीच ते तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. शिजवणीनंतर हळकुंड वाळविण्यासाठी दरवर्षी २५ हजार चौरस फूट नेटची आवश्यकता असते. वीज, वाहतूक, हळद खरेदी व अन्य सर्व खर्च लक्षात घेता एकूण उलाढालीतून सुमारे ३ ते ४ टक्के नफा हाती राहतो.

भांडवल
किशोर सांगतात की पाचहजार क्विंटल उत्पादनासाठी किमान गुंतवणूक एक कोटी रुपयांची करावी लागते.

संपर्क- किशोर पाटील, ९१५८८३३४४४


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा...येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व...