agriculture story in marathi, Fulwade family is doing jaggery & vale added products business successfully. | Page 2 ||| Agrowon

गुऱ्हाळघरातून मिळविला उत्पन्नाचा हुकमी स्रोत

गणेश कोरे
शनिवार, 17 जुलै 2021

खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम फुलवडे यांनी मुलगा किशोर यांच्या साथीने कांदळी (ता. जुन्नर. जि. पुणे) येथे गुऱ्हाळघर थाटले आहे. रसायनांचा वापर न करता श्रद्धा ब्रॅण्डने गूळनिर्मिती, मसाला गूळ, काकवी, पावडर व क्यूब्ज या स्वरूपात मूल्यवर्धन केले आहे. 

खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळशीराम फुलवडे यांनी मुलगा किशोर यांच्या साथीने कांदळी (ता. जुन्नर. जि. पुणे) येथे गुऱ्हाळघर थाटले आहे. रसायनांचा वापर न करता श्रद्धा ब्रॅण्डने गूळनिर्मिती, मसाला गूळ, काकवी, पावडर व क्यूब्ज या स्वरूपात मूल्यवर्धन केले आहे. स्थानिक आउटलेटसह पुणे-मुंबई येथे बाजारपेठही तयार केली आहे.
 
कांदळी (ता. जुन्नर. जि. पुणे) येथील तुळशीराम फुलवडे प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीत नोकरीस होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर कृषिपूरक व्यवसाय करायचे त्यांच्या मनात होते. सन २०१९ मध्ये त्यांनी एक एकर जागा खरेदी केली. येथे मंगल कार्यालय बांधण्याचा विचार होता.

मात्र सर्वेक्षणाअंती त्यांची संख्या अधिक असल्याचे आढळले. दुसरा पर्याय शोधताना परिसरातील ऊसक्षेत्र व गुऱ्हाळबाबत अभ्यास केला. त्यातून गुळाला चांगली बाजारपेठ असल्याचे जाणवले. जिल्ह्यातील इंदापूर, दौंड तालुक्यांतील गुऱ्हाळे हंगामी असतात. त्यामुळे आपले गुऱ्हाळ वर्षभर सुरू राहील याचा विचार करून हाच व्यवसाय निश्‍चित केला.

व्यवसायाची तयारी
कोल्हापूर भागात गुऱ्हाळांची संस्कृती असल्याने तळसंदे येथील पाहुणे बाळासाहेब पवार यांच्याकडे भेट दिली. त्यांच्यामार्फत चार- पाच गुऱ्हाळे पाहिली. स्वतःकडील भांडवल आणि शरद सहकारी बॅंकेचे कर्ज असे ३० लाख रुपयांचे भांडवल उभे केले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भुईवाडी येथील पांडुरंग पाटील यांनी गुऱ्हाळाची यांत्रिक बांधणी करून दिली. सर्व हाताळणी सोपी व्हावी यासाठी गुऱ्हाळघराची उंची जमिनीपासून सहा फूट उंच ठेवली. काहिली ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅंड तयार केला. काहिली मागे- पुढे सरकविण्यासाठी बेअरिंग्ज वापरुन रुळाप्रमाणे रचना केली. त्यामुळे रस ओतण्यासाठी काहिली एका बाजूने वर व एका बाजूने खाली करणे सोपे झाले. कोल्हापूर येथील गुळव्या आणून स्वतः तुकाराम, मुलगा किशोर व कामगारांनी गूळनिर्मितीचे प्रशिक्षण घेतले. गुऱ्हाळात काम करण्याचा अनुभव असलेल्या मध्य प्रदेशातील मजूर कुटुंबांची राहण्याची सोय केली. परिसरातील सुमारे ५० ऊस उत्पादकांकडून फुलवडे २९०० रुपये प्रति टन दराने ऊस खरेदी करतात. तुळशीराम यांचा मुलगा किशोर यांनी ‘मॅकेनिकल डिप्लोमा’ व पुढे जेमॉलॉजीचा (हिरे) अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. इमिटेशन ज्वेलरी व हिरे संबंधित त्यांचा निगडी येथे व्यवसाय आहे. मात्र दोन वर्षांपासून कोरोना संकाटमुळे तो कमी झाला आहे. त्यामुळे किशोर यांनी पूर्णवेळ गुऱ्हाळाचे व्यवस्थापन पाहतात.

वर्षभर गूळनिर्मिती
कोणत्याही रसायनाचा वापर न करता चुना आणि भेंडी पावडरीच्या वापरातून गूळनिर्मिती केली जाते. त्यामुळे रंग, स्वाद दर्जेदार व टिकवणक्षमताही अधिक असल्याचे किशोर सांगतात. त्यांचा मुलगा चिन्मय नारायणगाव येथे कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण करीत असून, त्याचाही प्रक्रिया उद्योगाकडे ओढा आहे. तोही गुऱ्हाळ व्यवसायात मदत करीत आहे.

विक्री व्यवस्था
‘चिन्मय फूड’ नावाने व्यवसाय तर श्रद्धा नावाने गुळाचा ब्रॅंड तयार केला आहे. गूळ विक्रीसाठी कल्याण ते मुंबईपर्यंतची बाजारपेठ विकसित केली. कांदळी येथील डेअरीतील दूध मुंबईला पाठविले जाते. या दुधाचे वितरण करणाऱ्या मुलांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत म्हणून गूळ विक्रीचा पर्यायही उपलब्ध करून दिला. वर्षभरात आता ही साखळी तयार झाली आहे. अर्धा व एक किलोचे पॅकिंग केले आहे. गुऱ्हाळघरावरच स्वतःचे आउटलेटही सुरू केले आहे. तेथे ग्राहक व स्थानिक व्यापारी येऊन खरेदी करतात. सुमारे २०० किलो थेट विक्री होते. तर ३०० किलोपर्यंतची विक्री भोसरी, जुन्नर, खेड, आंबेगाव परिसरांत वितरकांच्या माध्यमातून होते.

कोरोना काळात मसाला गुळाची निर्मिती
कोरोना काळात आयुर्वेदिक काढ्याला मोठी मागणी वाढली होती. त्याचा विचार करून मसाला गूळ बाजारात आणण्याचे ठरवले. लवंग, दालचिनी, वेलची, सुंठ आणि जायफळ यांच्या मिश्रणातून १०० किलो गूळ तयार केला. मुंबईतून त्यास चांगली मागणी येऊ लागली. महिन्याला चार चे पाच टनांपर्यंत उत्पादन होते. ७० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. पेढ्याच्या आकाराचे पॅकिंग करून एक किलोच्या बॉक्समधून तो पाठवला जातो.

व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी
सुमारे अडीच टन उसातून १२०० लिटर रस तयार केला जातो. त्यापासून ३०० किलो गूळ तयार होतो. मुख्य हंगामात (उन्हाळ्यात) दररोज ८ टन ऊस गाळपातून ९०० किलो गुळाचे उत्पादन होते. त्याचा दर किलोला ४० रुपये आहे. पावसाळा काळात गूळ उत्पादनात घट होते. मजुरी, वीजबिल, बॅंक कर्ज हप्ता, इंधन व अन्य खर्च होतो. तो वजा जाता नफ्याचे प्रमाण १० ते १५ टक्के राहते. गुऱ्हाळाच्या माध्यमातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यात गुऱ्हाळातील कामांसाठी १२ ते १३ तर उसतोड, स्वच्छता, पॅकिंग आदींसाठी १२ महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या व्यतिरिक्त काकवी, गूळ पावडर व गूळवड्या (क्यूब्ज) तयार केल्या जातात.
काकवी १०० रुपये प्रति लिटर, तर पावडर १०० रुपये प्रति किलो दराने विकली जाते.

संपर्क- 
किशोर फुलवडे, ९४२२३२५१०२
तुळशीराम फुलवडे - ९११२२७३२४०v


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...