agriculture story in marathi, Galve family from Sangli Dist. has raised their income from nursery business. | Page 2 ||| Agrowon

रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभार

अभिजित डाके
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

गळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक वर्षांपासून भाजीपाला रोपनिर्मिती व्यवसायात टिकून आहेत. कांदा, मिरची व वांगी आदींची रोपनिर्मिती ते करतात. सातत्य, अनुभवातून बाजारपेठा वाढवत त्यांनी या व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली आहे.

गळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक वर्षांपासून भाजीपाला रोपनिर्मिती व्यवसायात टिकून आहेत. कांदा, मिरची व वांगी आदींची रोपनिर्मिती ते करतात. सातत्य, अनुभवातून बाजारपेठा वाढवत त्यांनी या व्यवसायातून आर्थिक उन्नती साधली आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका दुष्काळी आहे. मात्र इथला शेतकरी जिद्दीने शेतीत विविध प्रयोग
करण्यात माहिर आहे. कितीही नैसर्गिक संकटे आली तरी त्यावर मात करण्याची ताकद त्यांच्याकडे
पाहण्यास मिळते. तालुक्यातील गळवेवाडी येथील राजाराम नामदेव गळवे हे त्यातीलच
एक उदाहरण आहे. त्यांचे वडील नामदेव यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेती करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. ते पूर्वी थोड्या प्रमाणात रोपे तयार करायचे. शिवाय शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय होता. त्यांची विक्री करूनच प्रपंच चालायचा. पत्नी सखूबाई, मुले गणेश व योगेश असं राजाराम यांचं छोटं कुटुंब आहे. गणेश बीएसी ॲग्रीचे शिक्षण घेत असून योगेश बी. फार्म करीत आहे. गळवेवाडीत नुकतेच टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. गावात मका, ऊस व हंगामी पिके शेतकरी घेतात.

शेतीतील वाटचाल
पूर्वी कष्टाच्या मानानं राजाराम यांना पैसा मिळत नव्हता. वाटणीस चार एकर शेती आली. राहायला घर नव्हतं. छप्पर उभारून ते जिद्दीने शेतीत नव्या वाटा शोधण्यासाठी नव्याने कार्यरत झाले. ध्येय निश्चित होते. आपल्या मुलांना चांगलं घडवायचे ही मनिषा होती. वडिलांकडून भाजीपाला रोपेनिर्मितीचं तंत्र अवगत झालं होतं. अनुभवही पाठीशी होता. आणि मुलगाही कृषी अभ्यासक्रमाशी संलग्न असल्याने त्याचीही मदत मिळणार होती. या जोरावर हाच व्यवसाय पुढे चालवायचे निश्‍चित केले. माळरान व्यवस्थित करण्यापासून सुरवात करायची होती. गाळाची माती आणून शेतात टाकली. सामाईक विहीर असल्याने पाणी पुरेसं ठरलं. पण कमी पडेल तेव्हा प्रति तास १०० रुपयांप्रमाणे पाणी
घेतले जाते.

लागवडीचे नियोजन
गळवे यांचे चार एकर क्षेत्र आहे. कांदा, मिरची, वांगी आदींची रोपे ते तयार करतात. त्यासाठीचे क्षेत्र ५ गुंठ्यापासून ते १० गुंठ्यापर्यंत असते. लागवडीसाठी वाफा पद्धतीचा वापर होतो. जून महिन्यात लागवड झाल्यास दीड महिन्याच्या कालावधीत काढणी होते. मागणीनुसार
टप्प्याटप्प्याने लागवडीस प्राधान्य दिले जाते. त्यानुसारच क्षेत्रही ठरवले जाते. यानुसार लागवडीचे नियोजन वर्षभर केले जाते. कांद्याचे बियाणे घरीच तयार करण्यास प्राधान्य दिले जाते.
मशागत करतेवेळी शेणखताचा वापर होतो. चार ते पाच दिवसांच्या अंतराने वाफसा पद्धतीने पाणी देण्यात येते. २० ते २१ दिवसांच्या दरम्यान खुरपणी होते. सुमारे २५ दिवसांनंतर १९-१९-१९ सारख्या विद्राव्य खतांचा वापर होतो.

बाजारपेठ वाढवली
जून ते ऑक्टोबर या कालावधीत रोपांना अधिक मागणी असते. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, महूद, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर तर सातारा जिल्ह्यातील म्हसवड या आठवडी बाजारात
प्रामुख्याने विक्री होते. पूर्वी रोपांना आत्ताच्या तुलनेत मागणी फार कमी होती. ठराविकच बाजारपेठांचा आधार घेतला जायचा. मुळात घरातूनच रोपांची विक्री व्हायची. त्यामुळे उत्पन्न मर्यादित मिळायचे. त्यासाठी आटपाडी तालुक्याच्या जवळ असलेल्या सांगोला तालुक्यात विक्री सुरु केली. सातारा जिल्ह्यातील म्हसवड, माण तालुका या देखील बाजारपेठा आश्‍वासक वाटल्या. त्या ठिकाणी आठवडी बाजारात रोपे घेऊन विक्री सुरू केली. म्हसवड भागात उन्हाळी आणि पावसाळी कांदा लागवडीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या भागात कांदा रोपविक्रीचे नियोजन केले. दर्जेदार रोपनिर्मिती होत असल्याने
अन्य रोपांनाही मागणी वाढत गेली. स्पर्धेतून दर चढे म्हणजे प्रति पेंडी १० रुपयांपासून २० ते २५ रुपयांपर्यंत दर राहतात. प्रति पेंडीत ४० ते ५० रोप संख्या असते. १०० रुपयांना चार पेंड्या या पद्धतीनेही विक्री होते. जागेवरून शेतकरी खरेदी करीत असल्याने वाहतुकीच्या खर्चात बचत होण्यास मदत होते. पाच गुंठ्यासाठी किमान खर्च १० हजार रुपये असते. महिन्याला सुमारे ५० ते ६० हजार रोपांची विक्री होते.

संपर्क- राजाराम गळवे- ९८८१४८७१३७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
रेशीम शेतीतील समाधानकिनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथील समाधान भिकन...
शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची...राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८...
पापड, बेकरी उद्योगात तयार केली ओळखभादोले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील नसीमा...
गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी...
नागली उत्पादनांचा ‘स्टार बाइट’ ब्रॅण्डनाशिक ः  कोरोना संकटकाळात अनेकांनी संधी...
जागतिक दर्जाच्या शेतीतून वाटा केल्या...निघोज (जि. नगर) येथील आपल्या साठ एकरांत विज्ञान-...
निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा...परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट...
सालईबनला मिळाली नवी ओळखबुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनने...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत कांदा...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
टेरेसवर द्राक्ष बागेचा फिलकांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या...
‘ड्रायझोन’मध्ये आली गंगाअमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके...
मल्चिंग पेपर, ठिबकवर दोनशे एकरांत...शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी...
मोबाईल अन्‌ प्रक्षेत्रभेटीतून मिळतोय...हवामान बदलाच्या काळात तातडीने हवामान, पीक नियोजन...
साहिवाल पालनात तरुणाने दाखवली जिद्दकुठल्याही व्यवसायात टक्के-टोणपे, यश -अपयश येतच...
कुक्कुटपालन, फलोत्पादनातून मिळवले...विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दीपक खैरनार यांना...
पूरक उद्योगातून शेती झाली किफायतशीरभातशेतीसह पशुपालन व्यवसायामध्ये उतरत एकात्मिक...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
रोपवाटिका व्यवसायातून साधली प्रगतीकामशेत (ता. मावळ, जि. पुणे) येथील शुभांगी दळवी...
प्रयोगशीलतेतून वाढवले तुरीचे उत्पादनलोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील एकनाथ...