agriculture story in marathi, Gavli brothers have made economical & social progress through dairy farming. | Page 2 ||| Agrowon

गवळी बंधूंनी साधली दुग्धव्यवसायात प्रगती

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 29 जून 2021

शिरसोली (ता.जि. जळगाव) येथील नारायण भागवत गवळी यांनी कष्ट, जिद्द, काळानुसार बदलण्याची वृत्ती व कुटुंबाची सामुहिक ताकद यातून पारंपरिक दुग्धव्यवसायात प्रगती केली आहे. एकेकाळी पाच म्हशींच्या संख्येपासून २५ पर्यंत मजल गाठली आहे. दर्जेदार ताज्या, दुधाची थेट ग्राहकांना विक्री करून त्यांचा विश्वास व हमीची बाजारपेठ मिळविली आहे.

शिरसोली (ता.जि. जळगाव) येथील नारायण भागवत गवळी यांनी कष्ट, जिद्द, काळानुसार बदलण्याची वृत्ती व कुटुंबाची सामुहिक ताकद यातून पारंपरिक दुग्धव्यवसायात प्रगती केली आहे. एकेकाळी पाच म्हशींच्या संख्येपासून २५ पर्यंत मजल गाठली आहे. दर्जेदार ताज्या, दुधाची थेट ग्राहकांना विक्री करून त्यांचा विश्वास व हमीची बाजारपेठ मिळविली आहे.
 
शिरसोली (ता.. जि. जळगाव) हे जळगाव शहरापासून सुमारे १० किलोमीटरवर अंतरावर असलेले गाव आहे. फुले, भाजीपाला शेती आणि दूध व्यवसायासाठी गावाची ओळख आहे. येथील नारायण भागवत गवळी यांची चौथी पिढी आता दुग्ध व्यवसायात उतरली आहे. नारायण यांचे आजोबा म्हशींचे संगोपन करायचे. वडिलांनी तो पुढे चालवला. त्या वेळेस आर्थिक परिस्थिती बेताची होती. जमीन, पक्के घर नव्हते. कष्टी वृत्तीतून व्यवसायात सतत प्रगती झाली. शून्यातून विश्व तयार झाले. त्या जोरावर १३ एकर मध्यम प्रकारची जमीन शिरसोली प्रगणे बोरनार शिवारात खरेदी केली. वडिलांच्या निधनानंतर नारायण यांच्या मोठ्या बंधूंनी व्यवसाय सांभाळला. पण २००७ मध्ये त्यांच्या निधनानंतर नारायण यांच्यावर जबाबदारी आली. त्या वेळेस व्यवसाय बंद पडेल की काय अशी स्थिती होती. परंतु लहान बंधू साहेबराव यांच्या मदतीने नारायण यांनी तो समर्थपणे सांभाळला आणि वाढविलाही. पुतण्या विशाल यांची गोठा व्यवस्थापनात मदत लाभू लागली. साहेबराव घरोघरी जाऊन ग्राहकांना दूध वितरण करण्याचे काम सांभाळतात.

पूर्ण कुटुंबाचा राबता
दुग्ध व्यवसायात अधिक वेळ देण्याची आणि स्वतः कष्ट करण्याची तयारी असावी लागते. अलीकडे मजुरी, व्यवस्थापन हा खर्च वाढला आहे. तो जेवढा कमी करता येईल तेवढा नफा वाढेल असे सूत्र आहे. याच सूत्रानुसार गवळी कुटुंबीय या व्यवसायात राबत आहे. दूध वितरण, गोठा व्यवस्थापन, हिरव्या चाऱ्याची कापणी व त्याची कुट्टी करून पुढे पशुधनापर्यंत पोचविणे, शेण काढणे शिवाय शेतीची कामे करणे आदींमध्ये गवळी कुटुंब स्वतः राबते. यासाठी बाहेरील मजुरबळ लागत नाही. त्यामुळे त्यावरील खर्चात बचत झाली आहे. पहाटे साडेचार वाजता दिवसाची सुरवात होते. रात्री नऊपर्यंत गोठा व नजीकच्या शेतात कुटुंबाचा राबता असतो. सर्व ऋतू, सण, उत्सव शेतातच साजरे होतात. घरातील कुणालाही नोकरी करण्याची गरज आज उरलेली नाही.

पशुधनात झाली वाढ
सुरूवातीच्य काळात पाच म्हशी होत्या. गोठाही पारंपरिक स्वरूपाचा होता. आजघडीला २५ जाफराबादी म्हशी व चार एचएफ गायी आहेत. शिरसोली शिवारातील आपल्या शेतात मजबूत, उत्तम गोठा बांधला आहे. त्यानजीकच हिरव्या चाऱ्याची लागवड बारमाही केली जाते. कोरडा चारा किंवा कुट्टी साठविण्यासाठी गोदाम आहे. सुमारे अर्ध्या एकरांत गोठा, गोदाम अशी व्यवस्था आहे. दररोज दुपारी व रात्री गोठा शेण काढल्यानंतर पाण्याने स्वच्छ केला जातो. आधुनिक दूध काढणी यंत्रणा आहे. हिरव्या चाऱ्याची कुट्टी तयार करून दिली जाते.अलीकडे मुऱ्हा जातीच्या रेड्याचेही संगोपन केले जात आहे. एक डझन अंडी, एक किलो मोहरीचे तेल आदी आहार शक्य असेल त्याप्रमाणे उपलब्ध करून दिला जातो. त्यास चांगली मागणी आहे.

हिरवा चारा आणि मका उत्पादन
पशुधनासाठी दरवर्षी सात ते आठ एकरांत हिरव्या चाऱ्यासाठी ज्वारीची पेरणी केली जाते. बारमाही हिरवा चारा त्यातून उपलब्ध होतो. दीड एकरात संकरित गवताची लागवडही केली आहे. खरीप व रब्बीतही दोन ते तीन एकरांत मक्याची लागवड केली जाते. एक-दोन वर्षाआड शेजारील चार ते पाच एकर जमीन भाडेतत्वावर घेऊन ज्वारीची खरिपात पेरणी केली जाते. कडब्याची कुट्टी त्यातून उपलब्ध होते. त्यात होणारे मक्याचे उत्पादनही खाद्यासाठी उपयोगात येते. आपल्याच शेतातून शंभर टक्के कोरडा व हिरवा चारा आणि अतिरिक्त पशुखाद्य उपलब्ध होईल यावर भर असतो.

दुधाचा थेट ग्राहकांना पुरवठा
दूध काढणीनंतर पॉलिथिनच्या पिशवीत पॅकिंग करून थेट ग्राहकांना घरी जाऊन पोचविले जाते.
जळगाव शहरात २० हून अधिक डॉक्टर या दुधाचे ग्राहक आहेत. काही ग्राहकांकडून गायीच्या दुधाचीही मागणी होती, ही बाब लक्षात घेऊन गायींचे संगोपनही सुरू केले आहे. सचोटी व प्रामाणिकपणा यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे.

अभ्यासू वृत्ती जोपासली
गवळीबंधू यांना वडिलांकडून पारंपरिक स्वरूपात दुग्ध व्यवसाय मिळाला. मात्र अभ्यासू वृत्ती आणि जोखीम घेण्याची तयारी यातून व्यवसायवृद्धी केली. स्वतःचे पक्के घर झाले. सामाजिक प्रतिष्ठाही मिळाली. कृषी प्रदर्शने, दर्जेदार दूध उत्पादक यांच्या सतत संपर्कात गवळी बंधू असतात. जळगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनात त्यांच्या जाफराबादी म्हशींचा सहभाग नोंदविण्यात आला होता. भरघोस उत्पादन व दूध व्यवसायातील प्रगती यांची दखल घेत जळगाव कृषी विभागाने त्यांचा सत्कार केला. शिरसोली येथेही कृषी यंत्रणांच्या कार्यक्रमात पालकमंत्री महोदयांकडून त्यांचा सत्कार झाला आहे.
दूध काढणीची नवी यंत्रणा, म्हशींच्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करीत गवळी यांनी
व्यवसायाचे स्वरूप आधुनिक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वमालकीची आधुनिक लहान डेअरी सुरू करण्याच्या तयारीत ते आहेत.

ठळक बाबी

  • दररोजचे संकलन (दोन्ही वेळचे)- सुमारे २५० लिटर व त्यापुढे.
  • दूधविक्रीचा दर- ५० रुपये प्रति लिटर
  • खाद्य व्यवस्था- मका - पाच एकर (दोन्ही हंगामात)
  • उत्पादन - एकरी 20 क्विंटल
  • चारा पिकांची लागवड - १३ एकर
  • चारा उत्पादन - एकरी २०० पेंढ्या

संपर्क- नारायण गवळी- ९९२२७८४३४५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...
वर्षभर वांगी उत्पादनाचे गवसले तंत्रपुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील योगेश तोडकरी...
बोलके यांचे दर्जेदार संत्रा उत्पादनकचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील आशिष...
पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक...फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (...
श्रीराम गटाचे पावडरीद्वारे हळदीचे...लाख (रयाजी) (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील...
पीक नियोजनातून बसविले आर्थिक गणितपुणे जिल्ह्यातील केंदूर (ता. शिरूर) येथील संदीप...
प्रतिकूल परिस्थितीवर सुनंदाताईंनी केली...माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या...
औषधी वनस्पती प्रयोगासाठी ‘शेवंतामाता’...नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार...
पदवीधर तरूणाचा ‘काकतकर’ ब्रँडसिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्हावेली रेवटेवाडी येथील...
पोल्ट्री उद्योगात विट्याची दमदार ओळखसांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख...
कमी खर्चिक किफायतशीर कापूस पीक...घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र...
तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह टोमॅटो...नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या...