Agriculture story in marathi, Ginger processing | Agrowon

प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धन
महेशकुमार कदम
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

आरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धन करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो.
 
भारतात आल्याची लागवड व्यावसायिक तत्त्वावर मुख्यतः केरळ, ओडिशा, मेघालय, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या राज्यात केली जाते. आले हे महत्त्वाच्या मसाला पिकापैकी एक आहे. आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांनाही चांगली मागणी आहे.

आल्याचे गुणकारी फायदे

आरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यामुळे प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धन करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो.
 
भारतात आल्याची लागवड व्यावसायिक तत्त्वावर मुख्यतः केरळ, ओडिशा, मेघालय, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या राज्यात केली जाते. आले हे महत्त्वाच्या मसाला पिकापैकी एक आहे. आल्यापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांनाही चांगली मागणी आहे.

आल्याचे गुणकारी फायदे

 • जीवनसत्त्व अ, क, इ आणि बी-कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सिलिकॉन, सोडियम, लोह व बिटा कॅरोटीन युक्त खनिजे मुबलक प्रमाणात आहेत.
 • सांधेदुखीमध्ये उपयुक्त.
 • ॲलर्जी आणि संसर्गापासून दूर ठेवते तसेच सर्दी व तापामध्ये उपयुक्त
 • कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि अर्धशिशी आजारामध्ये उपयुक्त
 • प्रतिकार शक्ती व भूक वाढविण्यासाठी
 • पाचक, सारक, वेदनाशामक आणि रुचीप्रद आहे. वायू आणि कफाचा नाश करणारे आहे.

प्रक्रियायुक्त पदार्थ
कॅन्डी

 • आवश्यक घटक ः ५०० ग्रॅम आले, ६०० ग्रॅम साखर, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम
 • आले स्वच्छ पाण्याने धुऊन साल चाकूच्या सहाय्याने काळजीपूर्वक काढावी.
 • स्लायसरचा वापर करून अद्रकाच्या चकत्या कराव्यात.
 • चकत्या केलेले आले आणि १ चमचा मीठ ४०-४५ मिनिटे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावी. चकत्या गरम पाण्यातून काढून थंड करावी.
 • ७५ अंश ब्रिक्स साखरेचा पाक तयार करावा व त्यात २ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून चकत्या उकळून घ्याव्यात. 
 • वरील मिश्रण २ दिवसांसाठी पाकामध्ये ठेवावे. त्यानंतर तयार कॅन्डी स्वच्छ पाण्याने धुऊन वाळवावी.

सिरप

 • कॅन्डी तयार झाल्यानंतर उरलेल्या पाकापासून सिरप बनवले जाते (१५ अंश ब्रीक्सचा).
 • लिंबाचा रस स्वतंत्र काढून तो पाकामध्ये एकजीव करावा.
 • तयार द्रावणात १:४ या प्रमाणात पाणी मिसळून सिरप तयार करावे.

आले सुपारी

 • आल्यापासून बनविलेल्या सुपारीमुळे शरीराची पाचन क्षमता वाढण्यास मदत होते शिवाय पित्त कमी होण्यासाठी मदत होते.
 • आले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
 • चाकूच्या सहाय्याने अल्याची साल काढून स्वच्छ करून घ्यावी.
 • आल्याचे छोटे छोटे काप करून त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ व गरजेनुसार चाट मसाला मिसळावा.
 • वरील मिश्रण उन्हामध्ये किंवा ड्रायरमध्ये वाळवावे.

आले- लसूण पेस्ट

 • आवश्यक घटक ः आले - लसून (१:१ प्रमाण), तेल व मीठ आवश्यकतेनुसार
 • आले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. आले व लसणाची साल काढून घ्यावी.
 • आले - लसून १:१ प्रमाणामध्ये मिक्सरमधून काढताना गरजेनुसार मीठ मिसळावे.
 • मंद आचेवर तेल गरम करून आले - लसणाचा लगदा भाजून घ्यावा.
 • तयार पेस्ट निर्जंतुक केलेल्या हवाबंद बाटल्यांमध्ये साठवून ठेवावी.

संपर्क ः महेशकुमार कदम, ९०९६०३८३६१
(एम. जी. एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद) 

इतर कृषी प्रक्रिया
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
फळे, भाज्यांचा वापर करून दुग्धजन्य...विभागनिहाय उपलब्ध असणाऱ्या फळांना व भाज्यांना...