पाच जिल्ह्यांत विकली तब्बल ३०० टन द्राक्षे

ओझर मिग (जि. नाशिक) येथील जय बाबाजी भक्त परिवाराच्या शाखेने लॉकडाऊनमुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांची तब्बल २७० ते ३०० टन द्राक्षे विकून त्यांना ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचे मोठे कार्य पार पाडले आहे. आश्रमाने स्वतःच्या चार चे पाच वाहतूक वाहनांमधून स्वखर्चानेजळगाव, औरंगाबाद, जालना, धुळे व अहमदनगर जिल्ह्यात द्राक्षे पोचवली. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दीडपट ते दुपटीचा दर मिळवून दिला.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची द्राक्षे थेट विक्री करण्याचा उपक्रम यशस्वी झाला.
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची द्राक्षे थेट विक्री करण्याचा उपक्रम यशस्वी झाला.

ओझर मिग (जि. नाशिक) येथील जय बाबाजी भक्त परिवाराच्या शाखेने लॉकडाऊनमुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांची तब्बल २७० ते ३०० टन द्राक्षे विकून त्यांना ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याचे मोठे कार्य पार पाडले आहे. आश्रमाने स्वतःच्या चार चे पाच वाहतूक वाहनांमधून स्वखर्चाने जळगाव, औरंगाबाद, जालना, धुळे व अहमदनगर जिल्ह्यात द्राक्षे पोचवली. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दीडपट ते दुपटीचा दर मिळवून दिला. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा उत्पादनापूर्वी अतिवृष्टीचे संकट झेलावे लागले. त्यातून सावरून माल तयार झाला तर लॉकडाऊन सुरू झाला. एकीकडे काढणीसाठी मजूर भेटेना तर व्यापारी दर देईना. उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झाले. याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी अडवणूक करीत ७ ते १० रुपये प्रति किलो दर द्राक्षाला देऊ केला. या दराने विक्री करणे म्हणजे संपूर्णपणे नुकसानीत जाणे होते. जिल्ह्यातील अनेक शेतकरी ओझर मिग येथील जय बाबाजी भक्त परिवाराच्या शाखेशी संलग्न आहेत. अशा वेळी निफाड तालुक्यातील चितेगाव (जि. नाशिक) येथील द्राक्ष उत्पादक संजय दाभाडे यांनी समस्त शेतकऱ्यांची व्यथा भक्त परिवाराचे प्रमुख श्री. श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्याकडे बोलून दाखविली. महाराजांनी तत्परतेने दखल घेत द्राक्षउत्पादकांना संकटातून सावरण्याचे ठरवले. द्राक्षउत्पादकांना सावरले आश्रमाने निष्काम कर्मयोग तत्त्वाप्रमाणे काम हाती घेतले. नाशिक जिल्ह्याच्या शेजारील पाच जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे. आध्यात्मिक व सामाजिक संघटन आहे. त्याद्वारे द्राक्षे घेण्याचे आवाहन केले. थेट ग्राहकांच्या घरापर्यंत ताजी द्राक्षे पोचवण्याचे नियोजन आखले. यासाठी कामी लागणारे मनुष्यबळ, वाहन व्यवस्था व त्यासाठी लागणारे इंधन स्वतः आश्रमाच्या वतीने खर्च करण्यात आले. यात शेतकऱ्यांकडून कुठलाही खर्च घेण्यात आलेला नाही. आश्रमाची सुमारे चार ते पाच वाहने आहेत. त्यांचा वापर झाला. थेट बागेतून साडेचार किलो ते पाच किलो वजनाच्या पेट्या भरल्या. प्रति पेटी १०० रुपये असा दर ठेवण्यात आला. निफाड तालुक्यातील चितेगाव, कसबे सुकेणे, ओझर मिग, चांदोरी, पिंपळस रामाचे, नैताळे,खेरवाडी, दिंडोरी तालुक्यातील जानोरी व नाशिक तालुक्यातील लाखलगाव व गिरणारे येथील द्राक्ष उत्पादकांचा हा माल होता. वेळीच मालाची काढणी होण्यासह उत्पादकांना किलोला दीडपट ते दुपटीचा दर अडचणीच्या काळात मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला. यातून सुमारे साठ लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. स्वतःसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता हे सर्व उत्पन्न आश्रमाने शेतकऱ्यांच्याच हाती सोपवले. असे केले उपक्रमाचे नियोजन 

  • द्राक्ष उत्पादकांच्या थेट बागेतून द्राक्ष काढणी
  • पॅकिंग झाल्यानंतर वाहनांद्वारे पेट्या भरून पुरवठा
  • प्रत्येक जिल्ह्यात गटनिहाय १०० रुपये प्रती पेटीप्रमाणे वितरण
  • मागणी, पुरवठा, जमा रकमांच्या दैनंदिन नोंदी
  • यंत्रणेमार्फत जमा झालेले पैसे पेट्यांनुसार संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ अदा
  • एकूण पेट्यांचे वितरण- ६० हजार
  • एकूण द्राक्षमाल पुरवठा- २७० ते ३०० टन
  • पेटीची किंमत- १०० रुपये
  • मिळालेले उत्पन्न- ६० लाख रू.
  • प्रतिक्रिया: द्राक्ष हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले. त्यांना पुढील हंगामात उभे राहण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी यासाठी आम्ही उपक्रम राबवला. शेतकरी जगला तर देश जगेल या न्यायाने कृषिसेवा हे तत्त्व बाळगून आश्रमाने कर्तव्य म्हणून काम पार पाडले. -श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज लॉकडाऊनमुळे द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाली. दरम्यान जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये माल काढणीविना होता.यावर आश्रमाने पुढाकार घेत द्राक्षविक्रीची व्यवस्था राबवली. व्यापाऱ्यांच्या तुलनेत चांगला दर मिळवून दिला. -संजय दाभाडे,द्राक्ष उत्पादक,चितेगाव,ता.निफाड. संपर्क : विष्णू जाधव-८६६८६९८०९८ आश्रम प्रतिनिधी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com