सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग

सुधारीत तंत्राद्वारे तुळ्याचा पाडा येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला भुईमूग
सुधारीत तंत्राद्वारे तुळ्याचा पाडा येथील शेतकऱ्यांनी पिकवलेला भुईमूग

तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या गरीब, दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी इच्छाशक्ती, जिद्द, प्रशिक्षण, प्रामाणिकपणा या गुणांच्या जोरावर भातानंतर भुईमूग ही पीकपद्धती यशस्वी केली आहे. पालघर कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने आधुनिक तंत्राचा वापर व काटेकोर व्यवस्थापनाच्या जोरावर भुईमुगाचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याचा त्यांनी केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे.  पालघर जिल्हा- आदिवासी बहुल. सरासरी २५३७ मिमी. पर्जन्यमान.  मोखाडा तालुका- अतिशय दुर्गम, पूर्णतः आदिवासी लोकवस्ती  तुळ्याच्या पाड्यातील प्रयोग  तालुक्यातील तुळ्याचा पाडा हे पालघरपासून ११० किलोमीटरवरील अतिशय दुर्गम, टेकड्यांनी आणि जंगलाने वेढलेले आहे. गावाजवळच धरण आहे. खरिपात पावसाच्या पाण्यावर भात, नागली, वरई, उडीद आदी पिके घेतली जातात. त्यानंतर रोजगारासाठी बहुसंख्य तरुण मुंबई, नाशिक येथे जातात. गावातील तरुणांचे गट प्रत्येकी १० ते १५ गुंठ्यांत धरणाच्या पाण्यावर मिरची घेतात. बाकीचे क्षेत्र ओसाड असते.  भुईमुगातून पर्याय  दरातील चढउतार, भांडवलाची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अभाव आदी कारणे येथील शेतकऱ्यांच्या प्रगतीत अडथळे ठरत होती. पण त्यांची जिद्द, मेहनत पाहून पालघर कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) विषय विशेषज्ञ भरत कुशारे त्यांना पुढे नेण्यास सरसावले. भातानंतर भुईमूग या पीकपद्धतीची संकल्पना त्यांच्यासमोर मांडत त्याचे महत्त्व, अर्थकारण समजावून दिले.  असे घडले प्रयोग 

  • तुळ्याचापाडा (मोर्हंडा) गावचे केव्हीकेमार्फत २०१४ मध्ये सर्वेक्षण 
  • शेतीच्या प्रमुख समस्या जाणून घेत भात, नागली, खुरासणी, परसबाग, कोंबडीपालन 
  • आदी प्रात्यक्षिके राबवली 
  • गावातील ४५ शेतकऱ्यांना भुईमूग लागवड प्रशिक्षण 
  • भात-भुईमूग पीक पद्धती राबवण्यासाठी पाणी व बाजारपेठेच्या अंदाजानुसार डिसेंबर २०१५- १६ कालावधीत भुईमूग लागवड 
  • थंडीमुळे उगवण होण्यास अडचण येऊ नये म्हणून प्लॅस्टिक आच्छादन तंत्राचा वापर 
  • (२५ शेतकऱ्यांकडून १८ एकरांवर) 
  • शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके 
  • सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये इक्रिसॅट तंत्रज्ञानाने लागवड. यात २०१७-१८ मध्ये ५९ आदिवासींचा सहभाग. 
  • वापरलेले वाण व ठळक बाबी 

  • प्लॅस्टिक आच्छादन तंत्रज्ञान- टीएजी २४ 
  • इक्रिसॅट पद्धत- टीजी ३८ व टीजी ३९ (मोठे दाणे) उपट्या प्रकारातील 
  • उन्हाळी हंगामात १० ते १२ दिवसांच्या अंतराने १० वेळेस पाणी 
  • ड्रीप व स्प्रिंकलरद्वारे पाणी बचत होण्याबरोबर उत्पादन वाढले. फांद्या फुटण्याची, आऱ्या उतरण्याची आणि शेंगा भरण्याची अवस्था या वेळेस पाणी देण्याची काळजी घेतली. 
  • प्लॅस्टिक आच्छादन तंत्र 

  • गादीवाफा तयार करून तणनाशक फवारणीनंतर प्लॅस्टिक आच्छादन. 
  • दोन वाफ्यांच्या सरीमधील आच्छादनाच्या कडावर मातीचा थर. 
  • पॉलीथीन अंथरण्यापूर्वी बी टोकण्यासाठी ३ सेंमी. व्यासाची छिद्रे पाडली. 
  • भुईमुगाच्या चार ओळी प्रत्येक वाफ्यावर. 
  • प्लॅस्टिक आच्छादनासाठी एकरी सहा हजार रु. खर्च. 
  • या तंत्राचे झाले फायदे 

  • जमिनीतील तापमान (५ ते ८ अंश से.) वाढते. त्यामुळे उगवण सुमारे ७ ते ८ दिवस लवकर. हिवाळी हंगामात पेरणी शक्य. 
  • जमिनीतून होणारे बाष्पीभवन रोखले. पाण्याच्या दोन-तीन पाळ्यांत बचत. 
  • जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची कार्यक्षमता वाढल्याने भुईमुगाची नत्र स्थिर करण्याची क्षमता वाढते. स्फुरद, पालाश आदी घटकांची उपलब्धता वाढते. 
  • मुळांची वाढ व विस्तार. 
  • फुले लवकर. जास्त प्रमाणात. त्यामुळे शेंगांचे प्रमाण वाढून शेंगा भरण्यास जास्त कालावधी. 
  • उशिरा येणाऱ्या आऱ्या कमकुवत. प्लॅस्टिक फिल्म भेदून जमिनीत जाणे अशक्य. त्यामुळे जमिनीत गेलेल्या आऱ्यांमधील दाणे चांगले पोसतात. सर्व शेंगा एकाच वेळी तयार होतात. 
  • शेंगांमधील तेल प्रथिनांचे प्रमाण वाढते. 
  • भुईमूग साधारण ८ ते १० दिवस लवकर काढणीस तयार. 
  • इक्रिसॅट तंत्राचे फायदे 

  • लागवडीसाठी रुंद वरंबा-सरी पद्धतीचा वापर. (गादी वाफा) 
  • जमिनीच्या उताराप्रमाणे लांबी ९ ते १५ मीटर. वरंब्याची रुंदी ९० सेंमी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे. 
  • वरंब्याच्या दोन्ही बाजूस १५ सें.मी. रुंदीच्या सऱ्या. वरंब्याची उंची १५ सेंमी. 
  • तीस बाय १० सेंमी.अंतरावर लागवड. 
  • झालेले फायदे 

  • गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहात असल्यामुळे मुळांची कार्यक्षमता वाढते. 
  • जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते. 
  • पिकास पाण्याचा ताण बसत नाही. अतिरिक्त पाण्याचा सरीतून निचरा करता येतो. 
  • तुषार सिंचन तसेच पाटाने पाणी देता येते. 
  • संतुलित खत व्यवस्थापनामुळे अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत नाही. 
  • उत्पादन सुके व ओले अनुक्रमे. क्विंटल (एकरी ) 

    १)पांडुरंग लहारे-  पॉली मल्चिंग, ड्रीप आधार-  १८ व २८ क्विंटल   २)पांडुरंग चौधरी व रामदास जाधव -इक्रिसॅट, ड्रीप तंत्राआधारे- १५ व २३.५ क्विंटल.  ३)वसंत चौधरी इक्रिसॅट व स्प्रिंकलर आधारे १५.५ व २४ क्विं. ४)रामदास जाधव इक्रिसॅट व पाटपाणी आधारे ११ व १७ क्विंटल. 

  • इक्रिसॅट तंत्रज्ञान- वाण- टीजी ३८ व टी.जी ३९- सरासरी उत्पादन- ९ ते १० क्विंटल. 
  • उत्पादन खर्च- एकरी सरासरी २० हजार ते २५ हजार रु. 
  • दर- प्रति किलो- ओल्या शेंगा- ३० रुपये, वाळलेल्या शेंगा- ४० ते ४५ रुपये. 
  • विक्री व्यवस्था  या भागातील शेतकरी शक्यतो ओल्या शेंगाच बाजारात विकतात. नाशिक, मुंबई, त्र्यंबकेश्‍वर व तालुक्यातील गावांचे आठवडी बाजार येथे त्यांना चांगली मागणी असते. साधारण दोन क्विंटल शेंगा प्रत्येक शेतकरी घरासाठी तेल काढण्यासाठी ठेवतात. 

  • भात–भुईमूग पीक पद्धत- वैशिष्ट्ये- फायदे 
  • कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत झाली. 
  • सुमारे ११०-११५ दिवसांचा रोजगार उन्हाळी हंगामात प्रत्येक कुटुंब उपलब्ध झाला. त्यांचे स्थलांतर थांबले. 
  • भुईमुगाच्या पाल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न सुटला. 
  • -जमीन मध्यम प्रकारची, उत्तम निचरा होणारी, थोडी लालसर आणि सामू कमी असल्याने भुईमुगास योग्य -भुईमुगामुळे जमिनीचा पोत सुधारून भातपिकास फायदा 
  • घरासाठी तेलाचा प्रश्न सुटला. 
  • अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर. 
  • उन्हाळी हंगामात ६५ एकरांपर्यंत भुईमूग लागवड विस्तारली. 
  • संपर्क -  पांडुरंग चौधरी- ९७६६४८१६४५  रामदास जाधव- ९५०३१७५३०२  (लेखक कृषी विज्ञान केंद्र, पालघर येथे विषय विशेषज्ञ आहेत.)  संपर्क- भरत कुशारे- ९८५०२६०३५५ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com