agriculture story in marathi, guava processing | Agrowon

पेरू प्रक्रियेतून वाढवा फायदा
सोनल चौधरी
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. अशा पदार्थांना बाजारात चांगली मागणीही आहे. पेरूपासून जॅम, जेली, सरबत, सिरप, टॉफी, चीज, नेक्‍टर, पेरूशेक, पेरूखंड असे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

पेरू हे फळ थंड पित्तशामक, रुचिकारक व बुद्धिवर्धक आहे. प्रति ग्रॅम पेरु फळामध्ये पाणी ८१.७७ टक्के, कर्बोदके ११.२३ टक्के, प्रथिने ०.९ टक्के, तंतुमय पदार्थ ५.५ टक्के, खनिजे ०.७ टक्के, क जीवनसत्त्व २१३ मिली ग्रॅम, कॅल्शियम ६० मि.ग्रॅ., फॉस्फरस २० मिलीग्रॅंम इ. घटक असतात.

प्रक्रियायुक्त पदार्थ
१) जेली

पेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. अशा पदार्थांना बाजारात चांगली मागणीही आहे. पेरूपासून जॅम, जेली, सरबत, सिरप, टॉफी, चीज, नेक्‍टर, पेरूशेक, पेरूखंड असे मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

पेरू हे फळ थंड पित्तशामक, रुचिकारक व बुद्धिवर्धक आहे. प्रति ग्रॅम पेरु फळामध्ये पाणी ८१.७७ टक्के, कर्बोदके ११.२३ टक्के, प्रथिने ०.९ टक्के, तंतुमय पदार्थ ५.५ टक्के, खनिजे ०.७ टक्के, क जीवनसत्त्व २१३ मिली ग्रॅम, कॅल्शियम ६० मि.ग्रॅ., फॉस्फरस २० मिलीग्रॅंम इ. घटक असतात.

प्रक्रियायुक्त पदार्थ
१) जेली

  • जेली तयार करण्यासाठी पेक्टिन अत्यावश्‍यक घटक असून, कच्च्या ते मध्यम पिकलेल्या फळामध्ये या घटकाचे प्रमाण अधिक असते.
  • फळे स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी. फळाचे बारीक काप करून त्यामध्ये त्याच्या वजनाच्या दीड पट पाणी मिसळून मिश्रण २५ ते ३० मिनिट उकळावे. त्यानंतर मिश्रण गाळून घेऊन गाळलेल्या द्रावणाचा वापर जेली तयार करण्यासाठी करावा.
  • द्रावण स्टीलच्या पातेल्यात घेऊन त्यात साखर मिसळून गॅसच्या मंद आचेवर शिजवावे. त्यामधील साखर (६५० ग्रॅम प्रति एक किलो ग्रॅम मिश्रणासाठी) पूर्ण विरघळून द्यावी. त्यानंतर मिश्रणात १ टक्के सायट्रिक ॲसिड मिसळावे.
  • जेली तयार झाली, की नाही हे ओळखण्यासाठी त्याचा ब्रिक्‍स ६५ अंश आहे का ते पाहावे. तयार झालेली जेली आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक करावी.

२) सरबत (आरटीएस)

  • पेरू सरबत तयार करण्यासाठी कमीत कमी १० टक्के रस, १५ टक्के टक्के साखर व आम्लता ०.३ ते ०.४ टक्के असावी. या प्रमाणानुसार १ किलो रस घेतल्यास त्यामध्ये १४०० ग्रॅम साखर, ७५ लिटर पाणी व २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. या प्रमाणानुसार १० लिटर सरबत तयार होऊ शकते.
  • रसामध्ये साखर पाणी व सायट्रिक ॲसिड मिसळून सर्वसाधारण ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला १० ते १५ मिनिटे उकळून घेऊन सरबत गाळून घ्यावे.
  • तयार झालेले सरबत निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये हवाबंद करून ठेवावे.

३) सिरप

  • पेरू सिरप तयार करण्यासाठी पिकलेले फळे घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन ती कापून त्यापासून गर तयार करावा.
  • गराचा ब्रिक्‍स २० ते २२ अंश आहे. का ते बघून घ्यावे. त्यामध्ये रसाचे प्रमाण ३५ टक्के ठेवून साखरेचे प्रमाण ६५ टक्के व आम्लता १.२ टक्के ठेवावी.
  • एक किलो गर असेल तर त्यामध्ये १५०० ग्रॅम साखर व ६९ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. नंतर सर्वसाधारण ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला १०-१५ मिनिटे उकळून घेऊन ते सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये हवाबंद करून ठेवावे.

संपर्क ः सोनल चौधरी, ८८०६७६६७८३
(के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

इतर कृषी प्रक्रिया
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...