Agriculture story in marathi Gulakand and Aromatic Oil Production | Agrowon

गुलकंद अन सुगंधी तेलनिर्मिती

राजेंद्र वारे
शनिवार, 11 एप्रिल 2020

दर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया जाणाऱ्या गुलाब किंवा अन्य फुलांपासून उत्पादने तयार करणे शक्य असते. मागील भागात गुलाबापासून अत्तर निर्मितीचे तंत्र आपण अभ्यासले.  या भागात आपण गुलकंद व सुगंधी तेल निर्मिती व त्याचे प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत.

दर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया जाणाऱ्या गुलाब किंवा अन्य फुलांपासून उत्पादने तयार करणे शक्य असते. मागील भागात गुलाबापासून अत्तर निर्मितीचे तंत्र आपण अभ्यासले.  या भागात आपण गुलकंद व सुगंधी तेल निर्मिती व त्याचे प्रकार याविषयी माहिती घेणार आहोत.

गुलकंद निर्मितीची पध्दत

 • शिल्लक राहिलेल्या गुलाब पाकळया नैसर्गिक पद्धतीने वाळवून घ्याव्यात. त्याची पावडर अथवा हा पाकळीचा लगदा गुलकंद बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यात काचेच्या बाटलीत पत्री खडीसाखर घेऊन त्याचा थर करावा. पाकळी व पुन्हा त्यावर खडीसाखर असे थर रचीत जावे.
 • बाटलीच्या तोंडापर्यंत थर तयार झाल्यानंतर त्यावर थोडासा खाण्याचा गुलाबी रंग (गरज भासल्यास ) मिसळावा. बाटलीचे तोंड पातळ कापडाने बांधावे. हे सर्व मिश्रण बाटलीसहित उन्हामध्ये २ ते ४ दिवस ठेवावे. चार दिवसानंतर या बाटलीत चविष्ट असा गुलकंद तयार झालेला असेल.
 • कोणत्याही शहरात वा गावात मंदिरांमधून देवाला वेगवेगळी फुले वाहिली जातात. लग्नकार्यांत फुलांची आरास केली जाते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ही फुले वाया जातात. अशी फुलां प्रक्रिया केंद्रावर आणून ती वेगवेगळी करावीत. त्यांचे उपयुक्त भाग प्रक्रियेसाठी वापरून वेगवेगळी उत्पादने आपण बनवू शकतो.

सुगंधी तेल निर्मिती
अत्तर निर्मिती आपल्या संस्कृतीमध्ये जुन्या काळापासून होत असल्याची नोंद सापडली आहे. आता आपण व्यावसायिक सुगंधी तेल निर्मितीची प्रक्रिया पाहणार आहोत. त्याच्या सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे चार पद्धती आहेत.

 • स्टीम डिस्टिलेशन
 • हायड्रो डिस्टिलेशन
 • ड्राय डिस्टिलेशन
 • सुपर क्रिटिकल फ्लुईड एक्स्ट्रॅक्शन

स्टीम डिस्टिलेशन

 • या पद्धतीत तेलनिर्मिती करण्यासाठी संबंधित घटकाचे आवश्यक त्या आकारात रूपांतर करावे लागते. तसे छिद्र असलेल्या ट्रेमध्ये साधारण एक इंच  असे अनेक ट्रे एकावर एक अंतर ठेवावेत. हे ट्रे डिस्टिलेशन चेंबरमध्ये ठेवावेत.
 • या चेंबरच्या खालील भागातून उकळत्या पाण्यातून निर्माण होणारी वाफ या मटेरियलमधून सोडावी. या वाफेबरोबर सुगंधी वनस्पतीत असलेली सर्व सुगंधित द्रव्ये योग्य त्या तापमानानुसार  पुढे चेंबरच्या वरील बाजूस असणाऱ्या द्रवीभवन पाईपमध्ये एकत्रित करण्यात येतात. त्यानंतर थंड करण्यात येऊन या सुगंधी द्रव्यमिश्रित वाफेचे एकत्रीकरण एका वेगळ्या बल्बमध्ये म्हणजेच पात्रांमध्ये केले जाते.
 • या पात्रात सुगंधी तेल आणि सुगंधी पाणी यांचे दोन वेगवेगळे तवंग तयार होतात. यातून वरचा सुगंधी तेलाचा तवंग वेगळा केला असता तो नैसर्गिक तेल म्हणून गणला जातो. उर्वरित पाण्याचा भाग हा सुगंधी पाणी म्हणून वापरता येतो. ही दोन्ही उत्पादने आकर्षकपणे पॅक करून त्या त्या सुगंधित घटकाचे लेबल लावून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवता येतात.

हायड्रो डिस्टिलेशन

 • या पद्धतीत सुगंधी फुले वनस्पती अथवा मटेरियल आवश्यक त्या आकारांमध्ये घेण्यात येतात.
 • यात पाणी टाकले जाते. साधारणपणे एक भाग मटेरियल आणि सात भाग पाणी म्हणजे १-७ असे प्रमाण घेऊन डिस्टिलेशन चेंबरच्या खालच्या भागात ते घेतले जाते. बॉयलर मधून निघालेल्या वाफेवर नियंत्रित पद्धतीने उकळले जाते. यामुळे सुगंधी वनस्पती अथवा फुलांत असलेली सुगंधी संयुगे शुध्द वाफेबरोबर र बरच्या वरील भागात एकत्र होतात. ही वाफ थंड करण्यासाठी वेगळ्या बल्बमध्ये घेण्यात येते.
 • यात देखील सुगंधी तेल आणि सुगंधी पाणी यांचे दोन तवंग निर्माण होतात. दोन्ही उत्पादने बाजारपेठेत लेबलिंग करून विक्रीसाठी पाठवली जाऊ शकतात.

ड्राय डिस्टिलेशन

या पद्धतीत सुगंधी वनस्पती, फुले तसेच संबंधित मटेरियल घेतले जाते. त्याचे आवश्यक त्या आकारात रूपांतरण केले जाते. हे मटेरियल एका जाळीदार प्लेटवर टाकून त्याला नियंत्रित उष्णतेमध्ये गरम केले जाते. हे मटेरियल गरम करत असताना त्याला हवा हे माध्यम म्हणून वापरले जाते. म्हणजे त्यावरती नियंत्रित हवेचा स्रोत सोडला जातो. जेणेकरून हे मटेरियल गरम व्हावे. यातून गॅससदृश्य सुगंधी वाफ चेंबरच्या वरील बाजूस एकत्र केली जाते. यास एका बल्बमध्ये घेऊन पुन्हा थंड पाण्याची प्रक्रिया केली जाते. त्यसाठी गॅसपाईप लाईन पद्धतीचा वापर केला जातो. यातून उच्च प्रकारचे सुगंधी तेल तयार केले जाते.

सुपर क्रिटिकल फ्लुईड एक्स्ट्रॅक्शन

 • ही पद्धत अतिशय उत्कृष्ट मात्र महागडी आहे. कारण या पद्धतीमध्ये सुगंधी वनस्पतीतील सुगंधी संयुगे (ॲरोमॅटिक कंपाऊंडस) केवळ वेगळी म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केली जातात. त्यासाठी काही माध्यमांचा वापर होतो.
 • उदाहरणार्थ कार्बन डाय-ऑक्साइड व सोलव्हॅट म्हणजेच पेट्रोल इथर कॅरियर माध्यम म्हणून वापरण्यात येतात. यात आवश्यक त्या तापमानास माध्यम व आवश्यक त्या सुगंधी तेलाचा बाष्पीभवनाचा बिंदू (इव्हॅपोरेशन पॉइंट) यानुसार सुगंधी संयुगे वेगळे केली जातात. या पद्धतीनुसार शुद्ध सुगंधी तेल तयार करता येते.

तेलाचे प्रमाण व दर

 • कोणत्या वनस्पतीतून किती प्रमाणामध्ये सुगंधी तेल मिळते हे प्रमाण टक्केवारीत दिले आहे. तसेच त्याचा अंदाजे दरही दिला आहे. मात्र शेतकऱ्यांनी अधिकृत स्त्रोतांमधून दरांची खात्री करणे गरजेचे आहे.

 

वनस्पती सुगंधी तेल प्रमाण दर रू. प्रति लिटर
तुळशी ०.०२ ते ०.०४ ९८०० ते १०, ०००
बर्गमोट ०.३ ते ०.६ ९७०० ते १०,३००
चमेली( जर्मन) ०.०५ ते ०.१ ९०,००० रू.
चमेली ( रोमन) ०.८ ते १ ८९०० रू.
सिट्रोनेला ०.४ ते ३ ९८०० ते ११, २०० रू.
निलगिरी ३ ते ४ ७३०० ते ९२०७
जिरेनियम ०.१ ते १ १८, ००० ते २१, ०००
लव्हेंडर २.५ ते ३ १ ४७, ०००
पाचोली १.५ ते ४ १५, ७००० ते १७, ०००
लेमन २ ते ३ ११, २०० ते १५, ४००

संपर्क- राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७
(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी यातील तज्ञ आहेत.) 


इतर कृषी प्रक्रिया
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
फळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...
फळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...
फळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...
असे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...
फळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
महत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...
गुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...
खरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....
गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...
केळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...