Agriculture story in marathi, health benefits of dreamstick leaves | Agrowon

शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्म
माधुरी रेवणवार
बुधवार, 30 जानेवारी 2019

शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या पावडरची कॅप्सुलदेखील बाजारात उपलब्ध आहे. बचतगटातील महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग करता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.
 

शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या पावडरची कॅप्सुलदेखील बाजारात उपलब्ध आहे. बचतगटातील महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग करता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.
 

शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खाण्यासाठी तर झाडाची साल डिंक मिळवण्यासाठी वापरतात. शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, अॅन्टीऑक्सिडंट आणि अमिनो अॅसिड असतात. पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोईचे आहे. वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते. झाडांची ताजी हिरवीगार पाने तोडून स्वच्छ धुवावीत आणि उन्हामध्ये वाळवावीत. उन्हात वाळवताना त्याला संरक्षित पद्धतीमध्ये शक्यतो सोलार ड्रायरचा वापर करून वाळवावे म्हणजे त्यावर कचरा, धूळ, किडे अथवा इतर घाण बसणार नाही आणि स्वच्छ वाळलेली पाने मिळतील. तसेच वेळही वाचेल. वाळलेली पाने मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावीत. ही पावडर भाजी, वरण, भाकरी, पराठे अथवा सुपमधून वापरता येईल.

१०० ग्रॅम शेवगा पानांच्या पावडरमधील पोषकतत्वे

  • ऊर्जा ः २०५ किलो कॅलरी
  • प्रथिने ः १६.५५ ग्रॅम
  • कार्बोदके ः ५०.४ ग्रॅम
  • तंतू ः ४.४० ग्रॅम
  • कॅल्शिअम ः ५६२०.६२ मिलीग्रॅम
  • मॅग्निशिअम ः ३६८ मिलीग्रॅम
  • लोह ः २६.५१ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व अ ६८६८.६६ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व ब १ ः २.६४ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व ब २ ः २०.५ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व ब ३ ः ८.२ मिलीग्राम
  • जीवनसत्व क ः १८.२१मिलीग्रॅम
  • जीवनसत्व इ ः ११३ मिलीग्रॅम

पाने सोलर ड्रायरमध्ये वाळवताना...

  • पानातील ओलावा ७४.५९ टक्के कमी होऊन २५.४० टक्के वाळलेला पाला मिळतो. साधारण १० किलो ताज्या पानांपासून २.५ किलो वाळलेला पाला मिळतो.
  • सोलर ड्रायरमध्ये वाळवल्यामुळे पानांचा रंग आणि गंध टिकून रहातो आणि वेळही वाचतो.

पानाचे आरोग्यादायी फायदे

  • लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे रक्तक्षय कमी होण्यास मदत होते.
  • हाडांना मजबुती येते.
  • मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर.
  • शरीरातील दाह कमी होतो.
  • झिंकचे प्रमाण असल्यामुळे केस गळती थांबून केसांच्या वाढीस मदत होते.
  • जीवनसत्व अ, क आणि इ चे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा निरोगी राहाते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
  • कॉलेस्ट्रोल कमी करून रक्त गोठण्यापासून वाचवते.
  • जीवनसत्व अ डोळ्यांना निरोगी ठेवते.
  • रक्तदाब नियंत्रित राहातो यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते रक्तदाब कमी करते.
  • मानसिक ताणताणाव कमी करण्यासाठी शेवगा पावडर उपयुक्त आहे.
  • अँटिऑक्सिडेंटस भरपूर असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या वाढीस देखील अटकाव करते.
  • शेवगा पावडर जीवनसत्व क युक्त असल्यामुळे पचन शक्ती सुधारते.
  • पाल्यातील चोथ्याचे प्रमाण बद्धकोष्टता कमी करते.
  • अल्सरमध्ये उपयोगी.
  • शेवग्याचा पाला अँटिवायरल, अँटिबॅक्टेरीएल, अँटिफंगल आहे. या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील जंतू संसर्ग नष्ट होऊन शरीर शुद्धीकरण होते. तसेच जखम भरून येण्यास देखील मदत होते.
  • मधुमेहात फायदेशीर.
  • लहान मुलांमधील कुपोषण टाळण्यास किंवा कमी करण्यास उपयोगी.

टीप ः शेवगा पावडर आहारात वापरण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

संपर्क ः माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४
(गृह विज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड) 

इतर कृषी प्रक्रिया
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...