Agriculture story in marathi, health management of calf | Agrowon

नवजात वासरांचे पोषण
डॉ. सचिन राऊत
गुरुवार, 31 जानेवारी 2019

नवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन पोषण केल्यास मृत्युदरावर नियंत्रण तर होतेच, शिवाय भविष्यात चांगली दुधाळ जनावरे तयार होतात.
 
नवजात वासरांकडे लहानपणापासूनच लक्ष देणे गरजेचे असते. लहानपणापासून योग्य देखभाल आणि चांगले पोषण असेल तर मोठेपणी या कालवडींपासून चांगले उत्पादन मिळते. याकरिता वयोमानानुसार आहार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
नवजात वासरांच्या पोषणपद्धती
पोषणाच्या मुख्यत्वे करून दोन पद्धती आहेत.
१. पारंपरिक पद्धत

नवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन पोषण केल्यास मृत्युदरावर नियंत्रण तर होतेच, शिवाय भविष्यात चांगली दुधाळ जनावरे तयार होतात.
 
नवजात वासरांकडे लहानपणापासूनच लक्ष देणे गरजेचे असते. लहानपणापासून योग्य देखभाल आणि चांगले पोषण असेल तर मोठेपणी या कालवडींपासून चांगले उत्पादन मिळते. याकरिता वयोमानानुसार आहार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
नवजात वासरांच्या पोषणपद्धती
पोषणाच्या मुख्यत्वे करून दोन पद्धती आहेत.
१. पारंपरिक पद्धत
या पद्धतीमध्ये वासरांना आई सोबत ठेवले जाते. आवश्यकतेनुसार व मर्जीनुसार आईचे दूध पिण्यासाठी सोडले जाते. मोठ्या प्रमाणावर ही पद्धत अवलंबली जाते, परंतु ही पद्धत अवैज्ञानिक आहे.

२. वैज्ञानिक पद्धत
ही पद्धत आजकाल प्रगत डेअरी फार्मवर अवलंबली जाते. वासरु जन्मल्यानंतर आईपासून वेगळे केले जाते. त्यांना कृत्रिम साधनांद्वारे आईचे दूध निश्चित मात्रेत व निश्चित वेळेवर पाजतात. याशिवाय अन्य आहारदेखील निश्चित मात्रेत दिला जातो.

वैज्ञानिक पद्धतीचे फायदे

 • वासराला दिला जाणारा आहार योग्य मात्रेत स्वच्छ, गुणवत्तापूर्ण व संतुलित असतो.
 • गाई किंवा म्हशीचे दूध उत्पादन अचूकपणे मोजता येते.
 • वासरांकडून गायीचा सडांना होणाऱ्या­ इजा टाळता येतात.
 • आईकडून संक्रमित होणा­ऱ्या आजारांपासून वासरांचा बचाव करता येतो.
 • वासरांचा आकस्मितपणे मृत्यू जरी झाला तरी गायीच्या दूध उत्पादनावर विपरित परिणाम होत नाही.
 • या पद्धतीद्वारे पशुपोषणावर होणाऱ्या खर्चाचे अचूक आकलन होते. म्हणून अधिक नफ्यासाठी कालवडी / वगारींना वैज्ञानिक पद्धतीने पोषण द्यावे.

वासरांना चीक पाजण्याचे फायदे
नवजात वासरांना जन्मानंतर दोन तासाच्या आत चीक पाजावा. त्या नंतर पुढील तीन ते चार दिवस त्यांच्या वजनाच्या दहा टक्के (साधारणत: २ ते २.५ किलो) चीक प्रतिदिवस द्यावा. चीक गरम न करताच ताजा द्यावा. हा चीक पाजल्याने कालवडी/वगारींना खालील लाभ होतात.

 • चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते (साधारणपणे १७ टक्के). या प्रथिनांमध्ये मुख्यत्वेकरून ग्लोब्युलिन असते, ज्यामध्ये संक्रामक आजारापासून बचाव करणारे तत्त्व (अँटिबॉडीज) असतात. नवजात वासरांच्या शरीरात ही तत्त्व नसतात, त्यामुळे त्यांना चीक पाजलाच पाहिजे.
 • जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात जी वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आवश्यक असतात.
 • चीक पचण्यास अवघड असतो, परंतु नवजात वासरांचे पहिले शेण बाहेर पडण्यास चीक मदत होते, त्यामुळे वासरांचे पोट साफ होते.
 • जर चीक पाजल्यानंतरही वासराने शेण टाकले नाही तर एक लिटर कोमट पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाकून एनिमा करावा.
 • चौथ्या दिवसापासून ते चौदाव्या दिवसापर्यंत वासरांना वजनाच्या दहा टक्के दूध पाजावे. दूध पाजण्यासाठी वापरात येणारे भांडे नेहमी गरम पाणी व साबणाने स्वच्छ करावे.

वासराचे आहार व्यवस्थापन

 • पंधराव्या दिवसापासून दूध हळूहळू कमी करावे. दुधावरची साय काढून टाकलेले दूध वासरांना द्यावे. चांगल्या प्रकारे कुट्टी केलेला कडबा व कोवळे गवत सुरू करावे. यांचे प्रमाण हळूहळू वाढवावे.
 • चौथ्या महिन्यापासून हिरवा चारा देण्यास सुरवात करावी. जर द्विदल वनस्पतींचा चारा उपलब्ध असेल तर हा चारा ३-४ तास सूर्यप्रकाशात वाळवावा आणि नंतरच वासरांना खण्यास द्यावा; अन्यथा या चाऱ्याने वासरांना पोटफुगी होण्याची शक्यता असते.
 • द्विदल वनस्पतींचा चारा अत्यंत पौष्टिक असतो. अर्थात हया चा­याची मात्रा थोडी थोडी करून वाढवावी.
 • सहा महिन्यांच्या वयात वासराचे कोठीपोट चांगल्याप्रकारे विकसित होते. शिवाय या वयात सर्व प्रकारचा चारा पचनीय असतो, मात्र वासरू निरोगी राहावे व त्यांचा विकास योग्यरीतीने व्हावा यासाठी वासरांच्या आहारात अचानकपणे बदल करू नये.
 • कोणत्याही नवीन आहाराची पचण्याची क्षमता ही पचन संस्थेमध्ये हळूहळू विकसित होते. वासरांना नेहमीच पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे. पाणी पाजण्यासाठी उपयोगात येणारे भांडी, टाक्या यांची नियमित सफाई करावी.
 • सहा महिन्यांच्या कालवडी/वगारींच्या पोषक तत्वाची गरज ही हिरव्या चा­ऱ्यासोबतच भुसा किंवा अन्य चारा दिल्याने भागते.
 • द्विदल वनस्पतींचा हिरवा चारा उपलब्ध नसेल तर एकदल वनस्पतींचा हिरवा चारा द्यावा. सोबतच विविध डाळींचा भरडा द्यावा. हिरवा चारा/ कडबा नेहमी कुट्टी करूनच द्यावा यामुळे चा­ऱ्याची बचत होते

संपर्क ः डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११
(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई) 

इतर कृषिपूरक
शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील...
आंत्रविषार,प्लेग आजारावर प्रतिबंधात्मक...आंत्रविषार आजार प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्यांना...
संसर्गजन्य आजारांबद्दल जागरूक रहापावसाळी वातावरणात जनावरांना साथीच्या आजारांचा...
पूर परिस्थितीमधील जनावरांचे व्यवस्थापन महापुराच्या प्रलयामुळे जनावरांचे आरोग्य अडचणीत...
दुभत्या गाई-म्हशींची जैवसुरक्षितता...दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा प्रादुर्भाव...
जनावरांतील विषबाधा टाळाशेतात बियाणे प्रक्रिया करताना नजरचुकीने काही वेळा...
शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन महत्त्वाचेशेळीपालनाद्वारे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...
गाई, म्हशींच्या प्रजननावर द्या लक्षवेगवेगळ्या ऋतूंमध्ये गाई, म्हशींच्या व्यवस्थापनात...
जनावरांतील पोटफुगीकडे नको दुर्लक्षपोटफुगीने त्रस्त असलेले जनावर सारखे ओरडते....
जनावरांना होते घाणेरीची विषबाधा मोकळ्या कुरणात जनावरे चरताना घाणेरी वनस्पती...
‘पोल्ट्री वेस्ट’ने भागवली विजेची...परभणी येथून पशुवैद्यकशास्त्राची पदवी, त्यानंतर...
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...