agriculture story in marathi, heavy & continuous raining has given impact on Pune flower market in Dasara & Diwali festive season. | Agrowon

दसरा, दिवाळीत फूलबाजारात राहिले पावसाचेच वर्चस्व

गणेश कोरे
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

यंदाच्या वर्षी फुलांना गणेशोत्सवात मागणी राहिल्यानंतर नवरात्र आणि दिवाळी सणांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, सतत पडत राहिलेल्या पावसामुळे फूलशेतीचे मोठे नुकसान झाले. बाजारात भिजलेल्या फुलांची मोठी आवक राहिली. चांगल्या दर्जाच्या फुलांना विशेष मागणी आणि दर राहिले. पुणे बाजार समितीत (गुलटेकडी) नवरात्रीत सुमारे १२ कोटींची तर दिवाळीत सुमारे पाच कोटींची उलाढाल झाली. आता डिसेंबरपासून पुढे लग्नसराईपर्यंत मागणी वाढून दर चांगले राहतील व नुकसान भरून निघण्याची आशा घेऊन शेतकरी कामांत व्यस्त झाले आहेत.

यंदाच्या वर्षी फुलांना गणेशोत्सवात मागणी राहिल्यानंतर नवरात्र आणि दिवाळी सणांवर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, सतत पडत राहिलेल्या पावसामुळे फूलशेतीचे मोठे नुकसान झाले. बाजारात भिजलेल्या फुलांची मोठी आवक राहिली. चांगल्या दर्जाच्या फुलांना विशेष मागणी आणि दर राहिले. पुणे बाजार समितीत (गुलटेकडी) नवरात्रीत सुमारे १२ कोटींची तर दिवाळीत सुमारे पाच कोटींची उलाढाल झाली. आता डिसेंबरपासून पुढे लग्नसराईपर्यंत मागणी वाढून दर चांगले राहतील व नुकसान भरून निघण्याची आशा घेऊन शेतकरी कामांत व्यस्त झाले आहेत.

गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, डिसेंबरपासूनच्या लग्नसराई हे फुलांचे महत्त्वाचे हंगाम असतात. गुलटेकडी येथील पुणे बाजार समिती विविध फुलांसाठी विशेष प्रसिध्द आहे. यंदा दसरा, दिवाळी आणि सध्याही सतत सुरू असलेल्या पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारातील चांगल्या दर्जाच्या फुलांची आवक कमी झाली. येथील बाजारात झेंडूची आवक प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील पुरंदर, यवत, दौंड तर मराठवाड्यातील भूम, परांडायासह सोलापूर, बार्शी आदी भागांतून होते. शेवंती पुणे जिल्ह्यातील यवत, दौंड, खेड, आंबेगाव या तालुक्यांतून येते.

दरांमध्ये राहिली तफावत
पुणे बाजार समितीमधील अखिल फूल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, की यंदा लांबलेल्या पावसामुळे कळी लागण्याच्या अवस्थेपासूनच फुलांच्या नुकसानीला सुरवात झाली. पाऊस कमी असलेल्या ठिकाणी स्थिती बऱ्यापैकी होती. मात्र, ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या पावसामुळे झेंडू, शेवंतीच्या पाकळ्या काळ्या पडल्या. त्यांची टिकवण क्षमता कमी झाली. अनेकवेळा शेतकरी फुलांची तोडणी झाल्यावर एक दिवस ती खुल्या जागेत सुकवून मग बाजारात पाठवतात. त्यामुळे फुलांचा दर्जा व टिकवण क्षमता वाढल्याने दर चांगले मिळतात. मात्र यंदा ते शक्य झाले नाही. अतिउच्च दर्जाच्या फुलांची १० ते २० टक्केच आवक राहिली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्क्यांपर्यंत झेंडूच्या तर २० टक्क्यांपर्यंत शेवंती फुलांची आवक घटली होती. साहजिकच दरांमधील तफावत मोठी राहिली. आडतदार सागर भोसले म्हणाले, गेल्यावर्षी फुलांना पोषक वातावरण होते. पावसाची चांगली उघडीप असल्याने दिवाळीत झेंडूला किलोला ५० ते ८० रुपयांपर्यंत दर होता. हाच दर यंदा १० ते ६० रुपयांपर्यंत होता. शेवंतीला गेल्यावर्षी किलोला ८० ते १५० रुपयांपर्यंत असणारा दर यंदा ३० ते ८० रुपये राहिला. यंदा पावसाने साथ दिली असती तर चांगल्या फुलांची आवक चांगली आणि दरही सरासरी राहिला असता.

दोन तासात वाढलेले दर
फूलबाजार हा शेअर बाजारासारखा असल्याचे भोसले म्हणाले. काही काळ एखाद्या फुलाची आवक कमी मात्र मागणी वाढू लागल्यास दर देखील वाढण्यास सुरवात होते. ऐन दिवाळीच्या दिवशी पहाटे सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर येथे अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे फूल बाजारात किमान दोन तास एकही वाहन येऊ शकले नाही. या काळात झेंडूचे किलोचे दर १०० रुपयांपर्यंत तर शेवंतीचे २०० रुपयांपर्यंत वाढले होते. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर मात्र आवक वाढून दर कमी होऊन ते ५० -६० रुपयांपर्यंत स्थिरावले.

परराज्यातून मागणी घटली
दरवर्षीप्रमाणे गोवा, हैदराबाद येथून व्यापारी मोठ्या प्रमाणात झेंडू, शेवंतीची खरेदी करतात. मात्र, भिजलेल्या फुलांच्या अधिकच्या प्रमाणामुळे त्यांचीही निराशा झाली. परराज्यातून मागणी कमी झाल्याने देखील फुलांना उठाव नव्हता.

शेवंतीला आधार
दिवाळी झाल्यानंतर साधारण एक नोव्हेंबरच्या काळात ख्रिश्‍चन समाजाकडून शेवंतीच्या फुलांना विशेष मागणी असते. यामध्ये प्रामुख्याने गोव्याहून व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येतात. ही खरेदी दोन दिवस आधीपासून सुरू होते. त्या वेळी शेवंतीला किलोला ८० रुपयांपर्यंत दर राहिले.

आता भिस्त डिसेंबरमध्ये
पावसाने दगा दिल्याने यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मात्र, पुढील कालावधीत उघडीप मिळून चांगले ऊन पडण्यास सुरवात होईल. अशावेळी मार्गशीर्ष महिन्यात झेंडूचे दर ७० ते ९० रुपये तर शेवंतीचे दर १०० ते १२० रुपयांपर्यंत राहतील, असा अंदाज फूलबाजार अडते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया
नवरात्र, दसरा, दिवाळी सणांसाठी नियोजन करून प्रत्येकी अर्धा अर्धा एकरवर स्नो व्हाईट आणि पूजा व्हाईट वाणाच्या शेवंतीची लागवड केली होती. मात्र सततच्या पावसामुळे पिकाची वाढ झाली नाही. ऐन काढणीच्या काळातच पाऊस झाल्याने फुलांचे मोठे नुकसान झाले. पाऊस नाही असे फार कमी दिवस मिळाले. यामध्ये मिळालेल्या फुलांना नवरात्रीत किलोला १०० तर दिवाळीमध्ये ७० रुपयांपर्यंत दर मिळाले. उत्पादन ५० टक्क्यांनी घटले.
-आण्णा पाटील दिवेकर
वरवंड, ता. दौंड जि. पुणे
संपर्क - ९८६०८६३९१३

यंदा सव्वा दोन एकरांवर झेंडूची लागवड केली होती. मात्र, दिवाळीत सगळी फुले भिजली. दिवाळीच्या काळात साधारण आठ टन विक्री झाली झाली. किलोला ५० रुपये दराची अपेक्षा होती. मात्र, काहीच हाती लागले नाही. गेल्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यापर्यंत फुलांची आवक सुरू होती. या महिन्यात ४० ते ७० रुपये दर मिळाला होता.
- भाऊसाहेब जाधव
टाकळी, टेंभुर्णी, जि. सोलापूर
संपर्क - ७४९८०९२४२२

मिळालेले दर- रुपयांत
नवरात्री
फुलांचा प्रकार - किमान - कमाल -- सरासरी (प्रति किलो)

गुलछडी -       -- ६०--- २२० ---२२०
झेंडू --              ५ --- ५० --- ३०
बिजली ---        ३० --- १५० --- १००
शेवंती पांढरी --- २० --- १८० ---१००
शेवंती पिवळी --- २० ---१५० ---१२०
ॲस्टर ---            २०---८०---७०

दिवाळी
फुलांचा प्रकार ---- किमान --- कमाल --- सरासरी
गुलछडी ---- २०---२५०---२००
झेंडू --- १०---५०---४०
बिजली --- १०---१२०--- ११०
शेवंती पांढरी --- २०---८०---७०
शेवंती पिवळी ---- २०--१००--- ९०
ॲस्टर --- १०---८०---७०

आकडेवारी स्रोत - पुणे बाजार समिती
 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...
व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना...वासाळी (ता. जि. नाशिक) येथील संजीव गजानन रासने...