agriculture story in marathi, Hivra Ganpati village in Vashim Dist. has made development through technology adaptation. | Agrowon

सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा चेहरामोहरा

गोपाल हागे
शुक्रवार, 8 जानेवारी 2021

गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन याद्वारे वाशीम जिल्ह्यातील हिवरा गणपती
गावचा चेहरामोहरा बदलला आहे. शेतकरी बियाणे बदल, बीजप्रक्रिया, गांडूळ खतनिर्मिती, रेशीम, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट, शेळी पालनाकडे वळले आहेत. त्यातून अर्थकारण उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन याद्वारे वाशीम जिल्ह्यातील हिवरा गणपती गावचा चेहरामोहरा बदलला आहे. शेतकरी बियाणे बदल, बीजप्रक्रिया, गांडूळ खतनिर्मिती, रेशीम, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट, शेळी पालनाकडे वळले आहेत. त्यातून अर्थकारण उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

वाशीम जिल्ह्यातील हिवरा गाव करडा येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) २०१७-१८ मध्ये दत्तक घेतले. केव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ तथा गाव प्रकल्प संयोजक डी. एन. इंगोले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. गावचे मूल्यांकन करताना भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, एकूण क्षेत्रफळ, पशुधन, यांत्रिकीकरण, शेती पद्धती, उत्पादकता, लघू उद्योगांबाबत माहिती संकलित करण्यात आली.

दुग्ध व्यवसाय रुजला
दुग्ध व्यवसायात अनावश्‍यक खर्चात बचत, वाढते उत्पादन, त्यातून मिळणारा नफा यातून गावाचे अर्थकारण सुधारत असल्याचे दिसून आले. सन २०१७-१८ पूर्वी ५० ते १०० लिटर असलेले दूध संकलन ८०० लिटरच्या पुढे गेले आहे. गावात चारा पिकांची अत्यंत वानवा होती. केव्हीकेच्या आद्यपीक प्रात्यक्षिकांतर्गत काही शेतकऱ्यांकडे प्रायोगिक तत्त्वावर सीओ-४ नेपिअर, ल्युसर्न, बरसीम आदींची लागवड करण्यात आली. त्याद्वारे चाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यात आला.

नवीन वाणांकडे कल
सोयाबीन, तूर, हरभरा, गहू आदींच्या पारंपरिक वाणांपासून कमी होत चाललेले उत्पादन गावकऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. या पिकांच्या सुधारित वाणांचा प्रसार सुरू झाला. तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध झाल्याने शेतकरी वाण बदलाबाबत सकारात्मक झाले.
पूर्वी कीडनाशकांचा वापर असंतुलित असायचा. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालीच शिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही होत होता. त्यासाठी एकात्मिक कीड- रोग व्यवस्थापन पद्धतीला चालना दिली. पीक प्रात्यक्षिके, नवीन तंत्र तंत्रज्ञान चाचण्या, विविध प्रशिक्षणे घेण्यात आली. परिणामी, प्रमुख हंगामी पिकांत रसायने वापरात ५० टक्क्यांपर्यंत कपात झाली. शेतकरी मंडळे आता स्वतःचे बियाणे तयार करू लागली आहेत.

उपक्रमशील शेतकरी

 • गावातील शेतकरी, तरुण दुग्ध व्यवसायात अग्रेसर
 • भाजीपाला विक्रीतून दररोज पैसा खेळता राहतो.
 • केंद्र सरकारच्या कृषी कल्याण अभियान, पीकविमा योजना, शेतीमाल थेट विक्री व्यवस्था आदी योजनांचा लाभ गावकऱ्यांनी घेतला.
 • स्वच्छता ही सेवा’ हा कार्यक्रम केव्हीके तीन वर्षांपासून राबवीत आहे. फलश्रुती म्हणून गाव १०० टक्के निर्मल झाले आहे. सरकारच्या निर्मलग्राम पुरस्कारही मिळाला.

उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न
खर्च कमी करून उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. घरटी पाच फळझाडे हा पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला. गावकऱ्यांच्या दैनंदिन आहारामध्ये किमान एक फळ असावे या दृष्टीने कृषी कल्याण अभियानाची कटाक्षाने अंमलबजावणी झाली. पडीक जमिनी, शेताचे बांध यांचा उत्पन्नस्रोत म्हणून वापर करण्यात आला.

परसबाग निर्मिती

 • बहुसंख्य घरात परसबाग निर्मिती
 • दररोजच्या आहारातील भाजीपाला घरीच तयार करणे ही त्यामागील मूळ संकल्पना
 • परसबागेत वांगी, पालक, कोबी, लसूण, चुका आदी विविधता दिसून येते. व्यवस्थापन महिला करतात.
 • गांडूळ खत, कंपोस्ट खत निर्मितीद्वारे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे प्रयत्न

पीकविमा, जलसंधारण
गावातील शेतकऱ्यांची पीक विमा योजनेबाबत पूर्वी कमालीची उदासीनता होती. जागृती केल्यानंतर
शेतकरी १०० टक्के खरीप व रब्बी पिकांचा विमा उतरवीत आहेत. गावशिवारात मृद्‍ व जलसंधारणाचे उपाय एकात्मिक, सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविण्यात आले.

हिवरा गावाविषयी

 • लोकसंख्या- २०६१
 • भौगोलिक क्षेत्र ८४० हेक्टर, वहिती क्षेत्र- ७९० हेक्टर
 • घरोघरी दुग्ध व्यवसाय
 • शेळीपालन १८
 • कुक्कुटपालन- ४
 • रेशीम उद्योग, तुती बेणेनिर्मिती नर्सरी, गांडूळ खत प्रकल्प, नवीन अवजारांची खरेदी आदींद्वारे विकास -ग्रामदैवत गणपती मंदिरामुळेही जिल्ह्यात तीर्थस्थान म्हणून पुढे येत आहे. भाविकांची मोठी गर्दी होत असून हिवरा गणपती म्हणूनच गाव ओळखले जात आहे.

प्रतिक्रिया
माझे एमएपर्यंत शिक्षण झाले आहे. तीन वर्षापासून दुग्ध व्यवसायात आहे. दिवसाला १०० लिटर दूध वाशीममध्ये नेऊन ५० ते ५५ रुपये प्रतिलिटर दराने विक्री करतो. महिन्याला ३० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. शेणापासून गांडूळ खत तयार करतो. साडेसहा एकर बागायती शेतीत नव्या वाणांची लागवड होते.
-विशाल मंचकराव इंगळे

दोन वर्षांपासून शेळीपालन करतो. लॉकडाउनमध्ये त्यातून ६५ हजार रुपयांची मिळकत झाली. सहा शेळीपासून सुरू केलेल्या या व्यवसायाने आतापर्यंत अडीच लाखांचे उत्पन्न दिले आहे. ब्रॉयलर पोल्ट्रीही सुरू केली आहे. स्वतःच मार्केटिंग करीत आहे.
-अक्षय बबनराव देशमुख, हिवरा

ढाळीचे बांध, गॅबियन, भूमिगत बंधारे, जुने सिमेंट नाला, बंधारे खोलीकरण, गाळ काढणे,
रिचार्ज शाप्ट, पुनर्भरण चर, वृक्ष लागवड अशी कामे झाली.
- भागवत देशमुख, कृषी सहायक, हिवरा

गावकरी, केव्हीके, कृषी, पशुधन, विभाग असे सर्वांचे प्रयत्न, सातत्याने पाठपुरावा यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत झाली आहे. ग्रामसेवक संजय इढोळे देखील तत्परतेने कार्यरत आहेत.
- गजानन देशमुख- ९५५२१२७७०४
सरपंच, हिवरा

संपर्क- 
डी. एन. इंगोले- ९०११९२७८४२
प्रकल्प संयोजक, केव्हीके, करडा


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा...येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व...