सुशिक्षित तरुणाने शोधला मधमाशीपालनातून रोजगार

मधाचा मधुर ब्रॅंड
मधाचा मधुर ब्रॅंड

बीएससी. मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिक्षण झालेल्या कोपा मांडवी (जि. यवतमाळ) येथील विकास क्षीरसागर या युवकाने मधमाशीपालन उद्योगातून रोजगारनिर्मिती साधली आहे. स्वतःबरोबर अन्य शेतकऱ्यांच्या सोबतीने मधसंकलन व त्यापुढेही मधाच्या वापरातून साबणनिर्मिती करून व्यवसायाचे मूल्यवर्धन केले आहे.  . यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा तालुक्यातील कोपा मांडवी हे जेमतेम लोकवस्तीचे गाव आहे. येथील विकास क्षीरसागर या युवकाने बीएस्सी बीएससी. मायक्रोबायोलॉजीपर्यत शिक्षण घेतले. घरची आठ एकर शेती आहे. त्यात कपाशी घेण्यावर भर राहतो. गावापासून टिपेश्‍वर अभयारण्य पाचशे मीटरपर्यंत आहे. मधमाशीपालन प्रशिक्षण अभयारण्यालगतच्या गावांमध्ये जनवन विकास समिती कार्यरत आहे. या समितीचा सचिव वन संरक्षक राहतो. रोजगारनिर्मिती, ग्रामविकास या उद्देशाने संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते. त्याकरिता ‘आत्मा’ यंत्रणेची मदत वनविभाग घेतो. मधमाशीपालन हा त्यापैकी विषय आहे. यातील प्रशिक्षणानंतर यात सहभागी सहा युवकांना प्रत्येकी दोन मधपेट्या मोफत देण्यात आल्या. विकाससह गावातील दोघांनी या व्यवसायात पुढे सातत्य ठेवले. विकासचे व्यवसायातील प्रयत्न प्रशिक्षण

  • नागपूर- खादी ग्रामोद्योग संस्थेच्या वतीने
  • अमृतसर- राष्ट्रीय बी बोर्ड संस्थेच्या वतीने
  • वर्धा- सेंटर ऑफ सायन्स फॉर व्हिलेजेस.
  • या तीनही ठिकाणी शास्त्रीय मधमाशीपालनाचा पाया तयार झाला. परागीभवन

  • त्यासाठी या ठिकाणी जावे लागते.
  • राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आदी.
  • याठिकाणचा फुलोरा- मोहरी, लिची, सूर्यफूल आदी.
  • सध्या असलेल्या मधुपेट्या- ४६०
  • मधमाश्यांची जात- एपीस मेलिफेरा
  •  मधसंकलन

  • वार्षिक- २० ते २५ टन
  •  दर- ३६० रुपये प्रतिकिलो
  • मधाची वैशिष्ट्ये

  • मधूर नैसर्गिक हनी
  • 'एफएसएसएआय’ (फूड सेफ्टीविषयक संस्था) संस्थेचे प्रमाणपत्र
  • ॲगमार्क प्रमाणपत्र लवकरच घेणार आहे.
  • पॅकिंग

  • विशेष म्हणजे औषधांसाठी कमी प्रमाणात असलेली मागणी लक्षात घेऊन १५ ग्रॅमचे पॅकिंगही केले आहे.
  • अन्य पॅकिंग्ज- ५० ते ५०० ग्रॅम व एक किलो
  • विक्री

  • मुख्यतः कृषी प्रदर्शनांमधूनच.
  • सुमारे ५० टन किरकोळ स्वरूपात घरूनच विक्री
  • इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया या वेबपोर्टलवरही मधाची नोंदणी. यलो पेजेसप्रमाणे हे पोर्टल घाऊक विक्रेते आणि उत्पादकांमध्ये मध्यस्थांची भूमिका बजावते.
  • शेतकऱ्यांसोबत ‘टाय अप’ मधमाश्यांची वसाहत (कॉलनी) असलेल्या पेट्यांना मागणी राहते. पाच हजार रुपये प्रतिपेटी या दराने आजपर्यंत सुमारे साडेपाचशे पेट्या विकल्या आहेत. रिकाम्या पेटीची किंमत १८०० ते २००० रुपये आहे. स्थानिकस्तरावर पेट्या तयार केल्या जातात. उत्तर भारतातून मधमाश्यांच्या वसाहती खरेदी करण्यात येतात. शेतकऱ्यांना मधमाशीपालनाचे प्रशिक्षणही विकास देतात. त्यांचाच मध मग ते खरेदी करतात. अशा रितीने स्वतःकडील व एकूण होणारे वार्षिक संकलन ४० ते ५० टनांपर्यंत जाते.

  • आत्तापर्यंत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या सुमारे- ३००
  • खादी ग्रामोद्योग बोर्डाकडे मधमाशीपालक व प्रशिक्षक अशी नोंद
  •  अन्य बाबी सुमारे २५० ग्रॅमपर्यंतच्या पॅकिंगसाठी काचेच्या बॉटलचा वापर केला जातो. मात्र, त्यांची वाहतूक करण्यात मोठा धोका असतो. त्यामुळे पुढील पॅकिंगसाठी षटकोनी आकाराच्या प्लॅस्टिक पेटीचा वापर होतो. हे साहित्य नागपूरहून आणले जाते. विकास म्हणतात टिपेश्‍वर अभयारण्य आमच्यापासून जवळ आहे. मात्र, वर्षभर मर्यादित स्वरूपाचा फुलोरा असल्याने मध तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यामुळे परराज्यात पेट्या घेऊन जावेच लागते. त्यासाठी चार व्यक्ती तैनात केल्या आहेत. मधापासून अन्य उत्पादने मध व्यवसायातील नफा वाढविण्यासाठी विकास यांनी काही उत्पादनांच्या निर्मितीलाही प्रारंभ केला आहे. यात पायाला भेगा पडण्यापासून रोखण्यासाठी मलम तयार केले आहे. याशिवाय मध व मेण यांचा वापर करून हनी ऑरेंज, हनी चंदन, हनी हळद, हनी कोरफड, हनी गोटमिल्क, हनी निम अशा विविध प्रकारचे साबणही तयार करण्यात आले आहेत. यासाठी वर्धा येथे प्रशिक्षण घेतले आहे. कृषी प्रदर्शनांमधून त्यांची विक्री सुरू केली आहे. संपर्क-  विकास क्षीरसागर-९७६७७२८६७८, ८६६८४१४१५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com