ऑस्कर विजेत्या कलाकाराचे १२४ एकरांत मधमाश्यांसाठी अभयारण्य

ऑस्कर पुरस्काराने सन्मान मॉर्गन यांना २००५ मध्ये मिलियन डॉलर बेबी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहायक अभिनेत्यासाठी जगातील सर्वांत मानाच्या ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले. या व्यतिरिक्त काही चित्रपटांसाठी ऑस्करचे नामांकनही त्यांनी पटकावले आहे.
माॅर्गन फ्रीमन या ऑस्कर विजेत्या अमेरिकी कलाकाराने आपल्या १२४ एकरांत मधमाशांसाठी अभयारण्या बनवले आहे,.
माॅर्गन फ्रीमन या ऑस्कर विजेत्या अमेरिकी कलाकाराने आपल्या १२४ एकरांत मधमाशांसाठी अभयारण्या बनवले आहे,.

मिसीसीपी (वृत्तसंस्था)- झपाट्याने कमी होत चाललेल्या मधमाश्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे. जगभरातील पर्यावरणप्रेमी व तज्ज्ञ त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेतील प्रसिद्ध ऑस्कर पारितोषिक विजेते चित्रपट कलाकार व दिग्दर्शक मॉर्गन फ्रीमन यांनी आपल्या मालकीच्या १२४ एकर कुरणाचे रूपांतर चक्क मधमाश्यांच्या अभयारण्यात केले आहे. त्यासाठी मधमाश्यांच्या वसाहतीही त्यांनी आणल्या आहेत. मधमाश्यांचे संरक्षण करा हा संदेशच जणू त्यांनी आपल्या कृतीतून जगाला दिला आहे.  मधमाश्या तसेच परागीभवन करणाऱ्या बंबल बी यांचे जगभरात महत्त्व आहे. अमेरिका, युरोपीय देश व भारतातही पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांचा वाटा अनमोल स्वरूपाचा आहे. अलीकडील काळात  मात्र या माश्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. हानिकारक कीटकनाशकांचा वापर, सीसीडी विकार व अन्य बरीच कारणे त्यामागे आहेत. मधमाश्यांना वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी, तज्ज्ञ आपल्या परीने प्रयत्नशील आहेतच. पण विशेष बाब म्हणजे अमेरिकेतील चित्रपट कलाकार मॉर्गन फ्रीमन यांनीदेखील मधमाश्यांचे मित्र अशी आपली नवी ओळख तयार केली आहे.  शेतीतही आदर्श  चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक अशीही मॉर्गन यांची ओळख आहे. सन २०१४ च्या सुमारासच  मधमाशीपालन सुरू करण्याचा इरादा त्यांनी चॅनेलवरील एका कार्यक्रमात बोलून दाखवला होता.  पर्यावरणाचे आरोग्य व जंगली मधमाश्यांचे संरक्षण हा त्यामागील मुख्य हेतू होता. पण केवळ बोलण्यापुरते मर्यादित न राहाता मिसीसीपी राज्यात असलेल्या आपल्या १२४ एकर कुरणाचे रूपांतर त्यांनी मधमाश्यांचे अभयारण बनवण्यात केले आहे. सुमारे ८१ वर्षे वयाच्या मॉर्गन यांनी तरुणांना लाजवेल असा उत्साह फुलवत शेतीतही आदर्श तयार केला आहे.  मधमाश्यांशी केली दोस्ती  अर्कान्सस राज्यातून मॉर्गन यांनी मधमाश्यांच्या २६ वसाहती आयात केल्या आहेत.  मधमाश्यांची दोस्ती करताना त्यांना व्यवस्थित हाताळण्याचे कौशल्य त्यांनी मिळवले आहे.  म्हणूनच त्यांच्या सान्निध्यात असताना संरक्षक वस्त्र त्यांना परिधान करावे लागत नाही. डोक्यावर हॅटही घालण्याची गरज पडत नाही. मधमाश्यांना ते प्रेमाने साखर - पाणी देऊ करतात. त्यांच्याकडून त्यांना मध किंवा तत्सम कोणत्याही पदार्थांची अपेक्षा नाही. त्यांचे संवर्धन हेच मॉर्गन यांच्यासाठी समाधानाची बाब आहे. त्यांची ही आपुलकी मधमाश्यांना निश्‍चित भावली असावी. म्हणूनच आत्तापर्यंत एकाही मधमाशीने आपल्याला डंख मारलेला नाही असे मॉर्गन सांगतात. त्यांच्या संवर्धनासाठी मॅग्नोलिया व लॅव्हेंडर यांसारख्या झाडांची लागवडही त्यांनी केली आहे.  अमेरिकेत घटतेय मधमाश्यांची संख्या  अमेरिका सरकारच्या पर्यावरण विभागाने मधमाश्यांना होणाऱ्या ‘कॉलनी कॉलॅप्स डिसऑर्डर’ (सीसीडी)  या विकाराकडे गंभीर लक्ष वेधले आहे. ‘सीसीडी’ मुळे मधमाश्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्याचा परागीभवन व शेतीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. निओनिकोटिनॉईडस गटातील कीटकनाशकांच्या वापरामुळेही जगभरात मधमाश्यांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. व्हरमॉँट विद्यापीठातील तज्ज्ञांनी याबाबत केलेल्या संशोधनातून २००८ ते २०१३ या काळात ही संख्या तब्बल २३ टक्क्यांनी कमी झाल्याचे धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com