agriculture story in marathi, importance of calcium in cow and buffalo health | Agrowon

कॅल्शियमची गरज ओळखून करा आहाराचे नियोजन
डॉ. पराग घोगळे
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

गाय म्हैस विल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शियमची गरजही वाढते. त्यामुळे गायी, म्हशींच्या संक्रमण काळात जनावरांचे उत्तम व्यवस्थापन, चांगल्या प्रतीचा आहार आणि रोग प्रतिबंधक उपाययोजना या प्रमुख तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे.

संपूर्ण वेतामध्ये मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण हे संक्रमण काळातील घेतलेल्या काळजीवरच अवलंबून असते. यामुळे संक्रमण काळाचे (ट्रान्झीशन पीरियड) महत्त्व ओळखून दुभत्या जनावरांची पुरेपूर काळजी पशुपालकांनी घ्यावी. संक्रमण काळ हा दुभत्या जनावराच्या आयुष्यातील अतिशय नाजूक काळ असून गाय म्हैस लवकर गाभण राहाण्यासाठी या काळातील घेतलेली काळजीच उपयुक्त ठरते.

गाय म्हैस विल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शियमची गरजही वाढते. त्यामुळे गायी, म्हशींच्या संक्रमण काळात जनावरांचे उत्तम व्यवस्थापन, चांगल्या प्रतीचा आहार आणि रोग प्रतिबंधक उपाययोजना या प्रमुख तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे.

संपूर्ण वेतामध्ये मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण हे संक्रमण काळातील घेतलेल्या काळजीवरच अवलंबून असते. यामुळे संक्रमण काळाचे (ट्रान्झीशन पीरियड) महत्त्व ओळखून दुभत्या जनावरांची पुरेपूर काळजी पशुपालकांनी घ्यावी. संक्रमण काळ हा दुभत्या जनावराच्या आयुष्यातील अतिशय नाजूक काळ असून गाय म्हैस लवकर गाभण राहाण्यासाठी या काळातील घेतलेली काळजीच उपयुक्त ठरते.

संक्रमण काळात कॅल्शियमची गरज

 • गाय म्हैस विल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शियमची गरजही वाढते. पहिल्या दिवशी तर ही गरज तीन पटींनी जास्त असते यावेळेस चिक किंवा दुधावाटे कॅल्शियम शरीराबाहेर जात असते. त्यामुळे पहिल्या आठवड्यात कॅल्शियमची कमतरता जास्त असते.
 • शरीरातील संप्रेरके हाडांमधील कॅल्शियम काढून रक्तामधील त्याचे प्रमाण वाढवितात जेणेकरून चिक व दूधनिर्मितीला कॅल्शियम कमी पडू नये, परंतु जेव्हा खाद्यामध्ये पोटॅशियम व सोडियमचे प्रमाण जास्त असते तेव्हा या घटकांचे रक्तातील प्रमाण वाढून रक्ताचा सामू अल्कली स्वरूपाचा बनतो.
 • जास्त पोटॅशियममुळे मग्नेशियमची उपलब्धता कमी होते त्यामुळे शरीराची कॅल्शियमची कमतरता ओळखण्याची क्षमता कमी होते. यामुळे संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण कमी होते व शरीरातील कॅल्शियम दूध उत्पादन व इतर शारीरिक कामांसाठी उपलब्ध केले जात नाही किंवा खाद्यातील कॅल्शियम कमी शोषला जातो. अशावेळी रक्तात शोषले जाणारे कॅल्शियम या काळात तोंडावाटे देणे आवश्यक असते.
 • गाई म्हशींना अशावेळेस कमी पोटॅशियम व कमी सोडियम असलेला आहार द्यावा. मॅग्नेशियमचे प्रमाण मात्र वाढवावे. पशु आहारामधील मीठ व सोडा यांचा वापर कमी करावा. यामुळे रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा राहण्यास मदत होईल जेणेकरून संप्रेरके हाडांमधील व आतड्यामधील कॅल्शियम दुधासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध करू शकतील. तसेच काही पूरक खाद्य वापरून शरीरातील रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा करून दुभत्या गाई म्हशींना होणाऱ्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.
 • गाभण काळात कमी कॅल्शियम व जास्त मग्नेशियम अशा स्वरूपात खनिजांची उपलब्धता ठेवावी. गाभण काळात जास्त कॅल्शियम दिले गेल्यास ते शरीरात शोषले जाण्याची क्रिया मंदावते कारण दूध उत्पादन नसल्यामुळे कॅल्शियम शरीरात शोषून घेणाऱ्या रिसेपटार्सचे कार्य मंदावते, याचा फटका गाय म्हैस व्यायल्यावर बसतो कारण विल्यावर तोंडावाटे दिलेला कॅल्शियम शरीरात कमी शोषला जातो व जनावराला मिल्क फिव्हर किंवा दुधाचा ताप हा आजार होण्याची शक्यता बळावते.
 • संक्रमण काळातील एकूण सहा आठवड्यांत दुभत्या जनावरांची रोग प्रतिकार क्षमताही कमी झालेली असते यामुळे कासेचा दाह व गर्भाशयाचा दाह ई. रोगांना जनावर बळी पडू शकते.
 • यामुळे संक्रमण काळात तीन गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागेल. संक्रमण काळातील जनावरांचे उत्तम व्यवस्थापन, चांगल्या प्रतीचा आहार व पुरके, रोग प्रतिबंधक उपाययोजना.

संक्रमण काळातील आहार

 • शेवटच्या तीन आठवड्यात पचण्यास सोपा जास्त पाचक तत्त्वे असलेला आहार सुमारे ४ ते ५ किलो प्रतिदिन विभागून खाऊ घालावा. हिरवा तसेच कोरडा चारा गरजेनुसार द्यावा.
 • विल्यानंतर सुरवातीला दुभत्या गाई-म्हशींची भूक कमी असते अशा वेळेस जास्त ऊर्जा व जास्त पचनीय प्रथिने असलेला आहार द्यावा जेणेकरून जनावरांच्या शरीराला कमी खाद्यामध्ये जास्त पोषकतत्त्वे मिळू शकतील.
 • चांगल्या प्रतीच्या आहारासाठी पशुआहारतज्‍ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रतिलिटर दुधामागे ४०० ते ५०० ग्राम पशुखाद्य व शरीर स्वास्थासाठी १ ते २ किलो पशुखाद्य दररोज विभागून द्यावे.
 • एकूण ६ ते ७ किलो पशुखाद्य सुमारे १५ ते २० लिटर दूध देणाऱ्या गायीसाठी व सुमारे ८ ते १० लिटर दूध देणाऱ्या म्हशीसाठी देणे आवश्यक आहे. तसेच हिरवा व कोरडा चारा शारीरिक गरजेनुसार द्यावा. कोरडा चारा हा जनावरांच्या दुधात फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी देणे आवश्यक आहे. तसेच जास्त ऊर्जेसाठी बायपास फॅट व इतर खाद्यपुरके दिल्यास गाई म्हशींचा संक्रमण काळ आरामदायी होण्यास मदत होते.
 • शेवटच्या गाभण काळात व विल्यानंतर सुरवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषणमूल्ये असणारा आहार दिल्यास पचनासाठी लागणाऱ्या ऊर्जेत बचत होते.

संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९
(लेखक बर्ग श्मिट, पुणे येथे पशुआहारतज्‍ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...