Agriculture story in marathi importance of fodder processing | Agrowon

प्रक्रियेतून वाढवा चाऱ्याची पोषकता

योगेश पाटील, डॉ. प्रभाकर पडघान
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

वाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे चाऱ्याची पचनियता वाढण्यास मदत होते. प्रक्रियेमुळे चाऱ्याची चव सुधारल्याने जनावरे चारा आवडीने खातात व चाऱ्यातील पोषक द्रव्याचे प्रमाण ही सुधारते.
 

दुभत्या व कामाच्या जनावरांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी व दुभत्या जनावरांपासून दूध मिळविण्यासाठी व
त्यांच्या शरीराची समाधानकारक वाढ होण्यासाठी त्यांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम

वाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे चाऱ्याची पचनियता वाढण्यास मदत होते. प्रक्रियेमुळे चाऱ्याची चव सुधारल्याने जनावरे चारा आवडीने खातात व चाऱ्यातील पोषक द्रव्याचे प्रमाण ही सुधारते.
 

दुभत्या व कामाच्या जनावरांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी व दुभत्या जनावरांपासून दूध मिळविण्यासाठी व
त्यांच्या शरीराची समाधानकारक वाढ होण्यासाठी त्यांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम
वगळता जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. अशा वेळी भाताचा पेंडा तसेच गव्हाचे काड यांचा वाळलेला चारा मोठ्या प्रमाणात जनावरांना दिला जातो. वाळलेला चारा कठीण व तंतुमय असून, त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अतिशय कमी असते. या चाऱ्याची पचनियता व चवही समाधानकारक नसते. अशावेळी जनावरांचे पोषणद्रव्यांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते. त्यामुळे जनावरांना पशुखाद्यासारखा महागडा पोषणआहार द्यावा लागतो. त्यामुळे चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्याने व प्रक्रिया केलेला चारा जनावरांना दिल्याने त्यांची पोषणाची तसेच प्रथिनयुक्त आहाराची गरज पूर्ण होते.

चाऱ्यावर युरिया प्रक्रियेसाठी आवश्यक साधने

 • गव्हाचा भुसा/ भाताचा पेंडा/ बाजरीचे सरमड इ.
 • युरिया प्रति १०० किलो चाऱ्यास ४ किलो प्रमाणे
 • प्लॅस्टिकची बादली व १०० लिटर क्षमतेची टाकी
 • मिश्रण फवारण्यासाठी झारी
 • लाकडी दंताळे किंवा फावडे
 • प्लॅस्टिकचा कागद/ गोणपाटाचे पोते
 • अर्धा किलो मीठ

युरिया प्रक्रिया करण्याची पद्धत

 • प्रक्रियेकरिता सिमेंट काँक्रीटचा ओटा किंवा सारवलेली स्वच्छ जागा निवडावी.
 • वाळलेला १०० किलो चारा ओट्यावर व्यवस्थित पसरून ४ ते ६ इंच उंचीचा समान थर तयार करावा.
 • प्लॅस्टिकच्या टाकीत ६० ते ६५ लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४ किलो युरिया पूर्णपणे विरघडून घ्यावा,
 • मोठी १०० लिटरची प्लॅस्टिक टाकी नसल्यास प्लॅस्टिकच्या बादलीत १० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४००ग्रॅम युरिया विरघळून घ्यावा.
 • युरिया व पाण्याचे तयार केलेले निम्मे मिश्रण वाळलेल्या चाऱ्यावर समप्रमाणात झारीने हळू हळू फवारून घ्यावे.
 • लाकडी दंताळ्याचा सहाय्याने किंवा हाताने चाऱ्याचा थर उलटा करावा.
 • उर्वरित मिश्रणात अर्धा किलो मीठ विरघळून पूर्ण मिश्रण पुन्हा वरील पद्धतीने चाऱ्यावर फवारावे.
 • प्रक्रिया केलेला चाऱ्याचा कोपऱ्यात ढीग करावा, ढीग करताना चारा थरावर थर देऊन भरपूर दाब द्यावा जेणेकरून वैरण घट्ट दाबून बसेल अश्या ढिगाचे पावसापासून रक्षण करणे आवश्यक आहे.
 • चाऱ्याचा ढीग गोनपटाने किंवा प्लॅस्टिकच्या कागदाच्या सहाय्याने पूर्णपणे झाकून ठेवावा. पूर्ण चार
 • आठवडे ढीग उघडू नये व हलवू नये.
 • चार आठवडे झाल्यानंतर वाळलेल्या चाऱ्याचा रंग पिवळा सोनेरी होऊन चारा खाण्यास योग्य असा तयार होतो.

प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी

 • प्रत्येक प्रक्रियेच्या वेळी ताजे मिश्रण तयार करूनच प्रक्रिया करावी.
 • प्रक्रिया केल्यानंतर तयार केलेला ढीग भरपूर दाब देऊन घट्ट करावा, घट्ट नसलेल्या ढिगातील प्रक्रिया केलेला चाऱ्यावर परिणामकारक प्रक्रिया होत नाही.

प्रक्रिया केलेला चारा कसा खाऊ घालावा

 • ढिगातील चारा काढताना प्रत्येकवेळी समोरच्या बाजूचा आवश्यक तेवढा भाग काढून घेऊन पुन्हा ढीग पूर्ववत करून पुरेसा दाब देऊन ठेवावा.
 • प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालण्यापूर्वी सुमारे एक तास पसरून ठेवावा जेणेकरून चाऱ्यातील अमोनिया वायूचा वास निघून जाईल.
 • प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची वेगळी चव जनावरांना न आवडल्याने चारा खात नसतील तर चाऱ्याचा इतर प्रक्रिया न केलेल्या चाऱ्यात थोडे थोडे मिसळून जनावरांना खायला घालावे व हळूहळू प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.
 • प्रक्रिया केलेला चारा जनावरांना खायला देण्यास सुरुवात केल्यानंतर १५ दिवसांनी जनावरांचे दुग्धोत्पादन शरीर स्वास्थ्य व शारीरिक वाढ याबाबत निरीक्षण करावे. प्रक्रिया केलेला चारा सलग पद्धतीने जनावरांना खायला दिल्यास उत्तम परिणाम दिसून येतील.
 • प्रक्रिया केलेला चारा जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर किंवा कुट्टी करून फक्त प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालता येईल.

संपर्क ः योगेश पाटील, ९८३४८५३६८४
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली कृषी महाविद्यालय, लातूर) 


इतर कृषिपूरक
यकृत आजारावर चिरायता, कटुकी, माका उपयोगीजनावरांमध्ये आजारावर उपचार करताना प्रतिजैविकांचा...
कुक्कुटपालनाचे नियोजननाव: सतीश पोपट कुळधर गाव: सायगाव, ता.येवला, जि....
सुधारित तंत्रातून वाढते पशुआहाराची...सर्वसाधारणपणे भौतिक, रासायनिक, जैविक,...
शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला, ॲ...झाडपाल्याचा शेळ्यांसाठी चारा म्हणून वापर केल्यास...
दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञान दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी...
प्लॅस्टिकमुळे जनावरांच्या कोठीपोटावर...पॉलिबॅग आणि प्लॅस्टिक साहित्य जनावरांच्या...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी...मी जातिवंत बिटल, सिरोही आणि सोजत शेळी जातींच्या...
कोंबडी खत : सेंद्रिय खताचा उत्तम...कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती...
शेळ्यांमध्ये रोग निदानात्मक चाचणी,...रोग संक्रमण होऊन शेळ्या आजारी पडण्याचे  ...
‘बर्ड फ्लू’बाबत जागरूक राहापक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग...
पोल्ट्रीशेडमध्ये जैवसुरक्षा आवश्यकजैविक कारणांमध्ये रोगकारक जिवाणू, विषाणू, कवक,...
लेयर कोंबड्यांसाठी संतुलित आहारकोंबड्यांना संतुलित खाद्य नियोजन करावे. शुद्ध आणि...
शेळ्यांमधील पैदास तंत्रशेळीपालन करताना शेळीपालकांना उत्पन्न...
शेळीपालनाचे नियोजनमाझी शिंदेवाडी गावामध्ये अडीच एकर शेती आहे....
जनावरांमधील हिवाळी अतिसारहिवाळी अतिसार हा दुधाळ जनावरांच्या पचन संस्थेचा...
शेवाळ उत्पादन प्रक्रियाशेवाळाचे उत्पादन हे पोषक अन्न, औषधे, जैवइंधनासाठी...
अन्नासह विविध कारणांसाठी शेवाळ शेती शेवाळ म्हणजेच सुक्ष्म आकारापासून विविध आकारामध्ये...
शेळ्या, मेंढ्यांमधील देवी आजारदेवी आजाराच्या नियंत्रणासाठी मेंढ्यांसाठी शीप...
जनावरांच्या कातडी आजारांवरील उपचारजनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार होत असतात....