Agriculture story in marathi, importance of high fibre pallets for cows and buffaloes | Agrowon

चाराटंचाई काळात जनावरांसाठी हाय फायबर पॅलेट्स उपयुक्त
डॉ. पराग घोगळे
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे नसते तर त्यांची उत्पादन क्षमता टिकवणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण जेव्हा पुढील काळात हिरवा/कोरडा चारा किंवा खाद्य उपलब्ध असेल तेव्हा जनावरांची शारीरिक झीज भरून काढून पुन्हा उत्पादन क्षमता वाढविण्यास जास्त वेळ लागेल. या टंचाई काळात चाऱ्याला काही प्रमाणात पर्याय म्हणून हाय फायबर पॅलेट्सची उपयुक्तता आपण जाणून घेऊ.
 

चाराटंचाईच्या काळात फक्त जनावरे जगवणे महत्त्वाचे नसते तर त्यांची उत्पादन क्षमता टिकवणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण जेव्हा पुढील काळात हिरवा/कोरडा चारा किंवा खाद्य उपलब्ध असेल तेव्हा जनावरांची शारीरिक झीज भरून काढून पुन्हा उत्पादन क्षमता वाढविण्यास जास्त वेळ लागेल. या टंचाई काळात चाऱ्याला काही प्रमाणात पर्याय म्हणून हाय फायबर पॅलेट्सची उपयुक्तता आपण जाणून घेऊ.
 
दुभत्या जनावरांचे संगोपन करताना उत्पादकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यातील एक गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात कमी होत जाणारी चाऱ्याची उपलब्धता. अशा टंचाईच्या काळात चाऱ्याच्या व खाद्याच्या किमती वाढत जातात व त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जगात सर्वत्र पशुधनाला दुष्काळसदृश स्थितीचा सामना कधी न कधी करावा लागला आहे, तर काही देशात जसे की दुबई तसेच इतर संयुक्त अरब अमिराती वाळवंटी देशामध्ये कुठलाच चारा उगवत नाही. सर्व प्रकारच्या चारा व पशुखाद्य इ.साठी त्यांना बाहेरील देशांवर अवलंबून राहावे लागते; पण अशा परिस्थितीतही या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात दुभते पशुधन असून, उन्हाळ्यात सुमारे ५५ अंश सेल्सिअस तापमानातही या जनावरांच्या उत्तम व्यवस्थापनातून चांगले उत्पादन घेतले जाते. या देशांमध्ये जास्त दूध देणाऱ्या गायींना सोयाबीन, मका, बायपास फॅट व इतर पोषकतत्त्वांनी युक्त आहार दिला जातो, चाराही मोजून दिला जातो व या खाद्य आणि चारा या दोन्हींच्या मध्ये असणारा एक घटक त्यांना देण्यात येतो तो म्हणजे हाय फायबर पॅलेट्स. म्हणजे खाद्य व तंतुमय पदार्थ (फायबर) या दोघांचे पॅलेट् स्वरूपातील संतुलित मिश्रण.

हाय फायबर पॅलेट्सची उपयुक्तता

 • गायी-म्हशींना असणाऱ्या चार पोटांमध्ये (अनुक्रमे: जाळीपोट, कोठीपोट, पडदेपोट व खरेपोट) कोठी पोटाची क्षमता सर्वांत जास्त म्हणजे सुमारे १५० ते २०० लिटर इतकी असते.
 • कोठीपोट पूर्ण भरल्याशिवाय जनावरांना भूक भागल्याची भावणा होत नाही. चाऱ्यातील फायबर किंवा तंतुमय पदार्थ ही गरज पूर्ण करतो. भूक न भागलेली जनावरे सारखी हंबरताना दिसतात.
 • जसजसा उन्हाळा वाढत जातो तसा दुभत्या जनावरांवरील ताणही वाढत जातो अशा वेळी आवश्यक पोषकतत्त्वे शरीरात गेली तरच जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकून राहू शकते.
 • टंचाई काळात चाऱ्याच्या, कच्या मालाच्या व पशुखाद्याच्या किमतीही वाढत जातात त्यामुळे दूध उत्पादकांना मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणात परिपूर्ण पशुआहार देणे काही वेळा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा वेळेस पशू खाद्यापेक्षा सुमारे ३० ते ४० टक्के कमी किमतीत हाय फायबर पॅलेट्स उपलब्ध होऊ शकते.

चाराटंचाई काळातील समस्या

 • दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात सातत्य ठेवणे.
 • जनावरांचे शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवणे.
 • परवडणाऱ्या किमतीत चारा, खाद्य इ. ची उपलब्धता करणे.
 • उपलब्ध चारा व खाद्य इ. मोजून देणे व नासाडी टाळणे.
 • दुभती व गाभण जनावरे, वासरे, बैल इ. ना वजनाप्रमाणे खुराक देणे.

वजनानुसार खाद्याचे नियोजन
सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देण्यापेक्षा जनावराच्या वजनाप्रमाणे खाद्य व चाऱ्याचे नियोजन केल्यास खर्चात बचत होऊ शकते. जास्त खाद्य व चारा दिल्यामुळे जास्त दूध मिळेल ही धारणा चुकीची आहे. प्रथम जनावराचे वजन करावे त्यासाठी खालील सूत्राचा वापर करावा.
सूत्र ः
{जनावराच्या छातीचा घेर (इंच)}२ x लांबी (इंच) = जनावराचे वजन (किलो)/ ६००
उ.दा. {६६ x ६६ } x ७० / ६०० = ५०८ किलो वजन

जनावराच्या छातीचा घेर म्हणजे पुढील दोन्ही पायांमागून मोजलेला छातीचा घेर इंचांमध्ये त्याचा वर्ग, गुणिले जनावराची लांबी म्हणजे पुढील पायाच्या खुब्यापासून ते शेपटापर्यंतचे अंतर इंचामध्ये भागिले ६०० बरोबर जनावराच अंदाजे वजन किलोमध्ये आपल्याला मिळते.

वजनानुसार गाई, म्हशींना खाद्य व चारा देण्याचे प्रमाण

जनावराचे वजन (किलो) एकूण शुष्क पदार्थ (वजनाच्या ३ टक्के) पशुखाद्य (किलो) कोरडा चारा (किलो हिरवा चारा (किलो)
४०० १२ किलो ५.५ १८
४५० १३.५ किलो ४.५ १६
५०० १५ किलो ६.५ २२
५५० १६.५ किलो ५.५ २५

 
टीप

 • पशुखाद्य, कोरडा व हिरवा चारा यांचे प्रमाण आर्द्रतेसह गृहीत धरले आहे.
 • वरील प्रमाण हे २४ तासांचे असून दोन वेळेस विभागून जनावरांना द्यावे.
 • हिरवा चारा उपलब्ध नसल्यास कोरडा चारा वाढवून द्यावा.
 • याव्यतिरिक्त दुभत्या गाई, म्हशींना बायपास फॅट व प्रिमिक्स द्यावे.

संपर्क ः डॉ पराग घोगळे, ९८९२०९९९६९
(लेखक बर्ग + श्मिट इंडिया, पुणे येथे पशू आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.) 

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...