agriculture story in marathi, importance if Artificial Insemination in livestock | Page 2 ||| Agrowon

वंधत्व निवारणासाठी कृत्रिम रेतन फायदेशीर

डॉ. चेतन लाकडे, डॉ. सुनील सहातपुरे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

फायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम असणे अावश्‍यक अाहे. विविध कारणांमुळे जनावरांमध्ये वंध्यत्व किंवा वांझपणा अाढळून येतो. त्यामुळे गोठ्यातील प्रजनन व्यवस्थाच कोलमडून जाते. त्यामुळे वंधत्व निवारणासाठी योग्य प्रजनन व्यवस्थापनासोबतच कृत्रिम रेतनाकडे लक्ष देणे अावश्‍यक अाहे.

फायदेशीर व्यवसायासाठी जनावरे सुदृढ व प्रजननक्षम असणे अावश्‍यक अाहे. विविध कारणांमुळे जनावरांमध्ये वंध्यत्व किंवा वांझपणा अाढळून येतो. त्यामुळे गोठ्यातील प्रजनन व्यवस्थाच कोलमडून जाते. त्यामुळे वंधत्व निवारणासाठी योग्य प्रजनन व्यवस्थापनासोबतच कृत्रिम रेतनाकडे लक्ष देणे अावश्‍यक अाहे.

जनावरातील वंधत्व अाणि कृत्रिम रेतनाचा कमी प्रमाणात होणारा वापर ही उत्पादनात घट येण्याची प्रमुख कारणे अाहेत. कृत्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या विदेशी वळूचे वीर्य शास्त्रीय पद्धतीने गोळा केले जाते, त्याच्या अनेक चाचण्या घेऊन ते गोठविले जाते. प्रत्येक चाचणीमध्ये सिद्ध ठरलेले वीर्य गावठी व कमी उत्पादनक्षमता असलेल्या गाईंच्या गर्भाशयात कृत्रिम पद्धतीने सोडले जाते. या पद्धतीच्या संयोगातून निर्माण होणारी वासरे ही चांगल्या प्रतीची व भरपूर दूध उत्पादन देणारी असतात. अशा पद्धतीने उच्च गुणवत्तेची नवीन जात किंवा स्थानिक गाईंचे किंवा म्हशींचे रूपांतर उत्तम दूध देणाऱ्या जातीमध्ये करता येते.

कृत्रिम रेतन
कृत्रिम रेतनासाठी वापरले जाणारे वीर्य प्रयोग शाळेत उच्चप्रतीच्या जातिवंत सिद्ध वळूचे वीर्य कृत्रिमरित्या काढले जाते. त्यावर योग्य चाचण्या करून वीर्य द्रवरुप नायट्रोजनमध्ये साठविले जाते. कृत्रिम रेतन बंदुकीच्या मदतीने जतन केलेले वीर्य माजावर आलेल्या मादीच्या जननेद्रीयात सोडून गर्भधारणा केली जाते. या प्रक्रीयेला एकत्रितपणे कृत्रिम रेतन असे म्हटले जाते.

वंधत्वाची कारणे :

 • शरीररचनेतील बदल
 • अनियमित व्यवस्थापन
 • अनुवंशिकता
 • प्रजनन अवयवाचे आजार
 • मानसिक परिणाम
 • पशुआहार
 • मिश्रखनिजाची कमतरता
 • अपघाताने होणारा गर्भपात

इतर महत्त्वाची कारणे
१. शारीरिक बदल
जनावराच्या शरीर रचनेमध्ये होणारे काही बदल हे वंधत्वाला व वांझपनाला कारणीभूत ठरतात. गर्भपिशवीत गर्भाची वाढ होत असताना काही कारणामुळे गर्भाची विकृती होऊन वासराला क्रिप्टोरचिडीसम, फ्री – मार्टिन (जुळ्या वासारामधील मादी वासरू), अंडाशयाचा हर्निया, प्रजनन अवयवाची न झालेली वाढ इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. अशा प्रकारच्या वंधत्वावर कोणतेही उपचार नाहीत.
२. संतुलित अाहाराची कमतरता
पशु आहारातील पोषकतत्वाचा कमी व जास्त प्रमाणात वापराचा थेट परिणाम त्याच्या उत्पादकतेवर व प्रजनन क्षमतेवर होतो. पोषकतत्वाचा वापर जास्त दूध देणाऱ्या जनावराच्या खाद्यात कमी प्रमाणात केला तर जनावरे दुग्धउत्पादनासाठी शरीरातील साठ्यांचा उपयोग करतात. परिणामी, वजनात घट होते त्यामुळे अशक्तपणा येतो अाणि प्रजनन क्षमतेत घट होते. पोषकतत्वाची आवश्यकता दुधाळ व गाभण जनावराला जास्त प्रमाणत असते त्यामुळे पोषक घटकयुक्त अाहाराचा वापर जास्त प्रमाणात करावा.

कृत्रिम रेतनाचे फायदे

 • वंधत्वावर एकमेव उपाय म्हणजे कृत्रिम रेतन होय. कृत्रिम रेतनाने काही प्रकारच्या वंधत्वावर नियंत्रण मिळवता येते.
 • जातिवंत व सिद्ध वाळूचे वीर्य वापरता येते.
 • कृत्रिम रेतानासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूची सिद्धता वीर्य साठवण्या अगोदरच तपासली जाते. वंश उत्पादनक्षमता यावर मुख्य लक्ष असते.
 • जनावरे विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाला बळी पडत नाहीत. रोगांचा होणारा संसर्ग टाळता येतो.
 • बऱ्याचवेळा नैसर्गिक रेतनाचा काळ हा जनावराच्या माजानुसार नसतो त्यामुळे जनावरांमध्ये वंधत्व येते. कृत्रिम रेतनामध्ये माजाचे उत्तम परीक्षण करून रेतानाची क्रिया केली जाते.
 • पशुपालकाला गोठ्यात वाळूचे संगोपन करण्याची गरज पडत नाही त्यामुळे वळूच्या संगोपनावर व देखभालीवर होणारा खर्च कमी होतो.
 • वंधत्वामध्ये बऱ्याचवेळा असे दिसून येते की, जनावराचे शारीरिक वजन कमी असल्यास सुक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात असतो. अशा परिस्थितीमध्ये जनावराला उत्तम प्रतीच्या जंतुनाशकाचा योग्य प्रमाणात वापर करून रोजच्या आहारात मिश्र खनिज द्रव्याचा वापर करावा.
 • पैदाशीच्या वळूपासून एकावेळी गोळा केलेल्या वीर्यापासून किमान २०० ते ७०० वीर्यकांड्या तयार होतात, त्यामुळे उच्च गुणवत्तेच्या वळूची उपयुक्तता वाढविता येते.
 • जनावराच्या मूळ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, अशा जनावरांमध्ये सिद्ध वळूचे वीर्य वापरून त्या जनावरांच्या जातीचे संवर्धन करून दुग्धोत्पादन क्षमता वाढवता येते.
 • नैसर्गिक फलनासाठी वळू व मादीचे वजन व शारीरिक आकार समान असणे गरजेचे असते; पण कृत्रिम रेतनामध्ये ही अडचण येते नाही.
 • कृत्रिम रेतानामुळे नोंदी ठेऊन प्रजनानाचे योग्य व्यवस्थापन साधता येते.
 • जास्त वयाचा अाणि जखमी वळूंचाही रेतनासाठी वापर करता येतो.

कृत्रिम रेतन करताना घ्यायची काळजी

 • कृत्रिम रेतन तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच करावे, कारण रेतन यशस्वी होण्यासाठी सर्व बाबी शास्त्रीय पद्धतीने काळजीपूर्वक करायच्या असतात.
 • गाय कृत्रिम रेतन करते वेळी १५ मिनिट आधी व १५ मिनिट पर्यंत शांत असणे गरजेचे असते.
 • २ ते ३ कृत्रिम रेतनानंतर जर गाय गाभण राहत नसेल तर गायीची तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी.
 • कृत्रिम रेतन करण्यापूर्वी गाय-म्हैस योग्य माजावर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. गाय व म्हैस माज सुरू झाल्यापासून १२ ते १८ तासांनंतर भरवावी. म्हणजे सकाळी माजावर असलेली गाय संध्याकाळी भरवावी किंवा सायंकाळी माज दाखवत असलेली गाय दुसऱ्या दिवशी सकाळी भरवावी.
 • सर्वसाधारणपणे गोठविलेले वीर्य गर्भाशयाच्या मुखात सोडावे.
 • कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येणारी सर्व उपकरणे निर्जंतुक करावी. रेतन करण्यापूर्वी वीर्यकांडीवरील माहिती जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

संपर्क ः डॉ. चेतन लाकडे, ०८०८७१०९८७८
(पशुप्रजननशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)


इतर कृषिपूरक
गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाचीजनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य...
संतुलित खाद्य व्यवस्थापनातून दूध...जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने...
वेळीच ओळखा कोंबड्यांतील विविध रोगांचा...कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात...
प्रक्रियेतून वाढवा चाऱ्याची पोषकतावाळलेल्या चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यामुळे...
हिवाळ्यात जपा कोंबड्यांचे आरोग्यहिवाळ्यात पोट्री शेडच्या लिटरमधील ओलसर भाग...
उबविण्यापूर्वी तपासा अंड्यांची गुणवत्ता कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत...
जनावरांच्या दातांचे आजार अन् उपचारजनावरांची निवड करताना किंवा खरेदी करताना कास, सड...
देशी कोंबड्यांमधील कृमीचे नियंत्रणकोंबड्यांमध्ये कृमीचा प्रादुर्भाव झाल्याचे...
प्रतिबंधात्मक उपायांनी रोखा कोंबड्यातील...कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव...
प्रतिजैविकांचा वापर अन् वाढता प्रतिरोधजनावरांमध्ये आणि मानवीय आजारांमध्ये वापरण्यात...
दुधाळ जनावरांना हिवाळ्यात होणारे आजार...दुधाळ व गाभण जनावरांच्या व्यवस्थापनात आणि आहार...
आजार निदानासाठी शवविच्छेदन आवश्यकविमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन...
मिथेन उत्सर्जन कमी करून दुग्धोत्पादनात...भारतातील एकूण मिथेन उत्सर्जनापैकी निम्मे मिथेन...
...असा बांधा मुक्त संचार गोठा आणि जपा...बंदिस्त गोठ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या...
खनिज कमतरतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये...खनिजाचा अभाव असलेल्या मातीत जर पिके घेतली तर...
वाढवा ऊस चोथ्याची पोषकताउसाचा चोथा फेकून न देता यावर योग्य ती प्रक्रिया...
प्रतिबंधात्मक उपायातून टाळा...रक्ती हगवण रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेड...
राजगिरा ः मुबलक पोषकद्रव्यांचा स्रोत अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये विविध प्रकारचे...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास...सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते जानेवारी महिन्यापर्यंत...
शेळ्या-मेंढ्यांतील देवी आजारदेवी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने सुरवातीला लालसर...