नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संसर्गाची लाट अधिक तीव्र झाली असताना सर्वोच्च न्यायालयान
तेलबिया पिके
आरोग्यासाठी जवस फायदेशीर
यंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थांमध्ये आपण तेल, तूप, बटर, लोणी, चीज, सुका मेवा, मासे, अंडी, इ. पदार्थांचे सेवन करतो. बहुतांशी तेल हे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी या तेलबियांपासून काढले जाते. तीळ, शेंगदाणा या तेलबियांपासून चिक्की, चटणी हे आहारातले दैनंदिन पदार्थ झाले आहेत; पण या सर्वांत जवसाचे सेवन मात्र फारच कमी किंवा नाहीच असे आहे. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार अाहेत.
यंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थांमध्ये आपण तेल, तूप, बटर, लोणी, चीज, सुका मेवा, मासे, अंडी, इ. पदार्थांचे सेवन करतो. बहुतांशी तेल हे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी या तेलबियांपासून काढले जाते. तीळ, शेंगदाणा या तेलबियांपासून चिक्की, चटणी हे आहारातले दैनंदिन पदार्थ झाले आहेत; पण या सर्वांत जवसाचे सेवन मात्र फारच कमी किंवा नाहीच असे आहे. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार अाहेत. बाह्यस्वरूपी दिसायला लांबुळके, एका टोकाला अंडाकृती आणि दुसऱ्या बाजूला टोकदार असते. दोन्ही प्रकारच्या जवसाच्या प्रकारामध्ये पोषक घटक सम प्रमाणात असतात. भारतात बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र ही प्रमुख जवस उत्पादन करणारी राज्ये आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून जवस उत्पादन अधिक घेतले जाते. पूर्वीपासूनच जवसचा उपयोग हा लिनन तंतू किंवा कापड तयार करण्यासाठी केला जातो.
- जवसामध्ये २० टक्के प्रथिने, ४१ टक्के स्निग्ध पदार्थ, २९ टक्के कार्बोदके असून ४५० किलो कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते.
- अधिक प्रमाणात स्निग्धता असूनदेखील जवसामध्ये संतृप्त स्निग्धतेचे प्रमाण कमी असून आरोग्याला फायदेशीर असणारे मेदाचे प्रमाण जास्त आहे.
- आरोग्यासाठी महत्त्वाचे असलेले ओमेगा-३ आणि ओमेगा -६ असलेले अल्फा लिनोलिनीक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिड अधिक असतात.
- ओमेगा-३ आणि ओमेगा-६ या स्निग्ध आम्ले हृदयविकारासारख्या आजारांना नियंत्रित; तसेच प्रतिरोध करण्यासाठी खूप महत्त्वाचे सिद्ध झालेले आहेत.
- एकूण स्निग्धांशापैकी ५७ टक्के ओमेगा-३, १६ टक्के ओमेगा -६, १८ टक्के एक-असंतृप्त (मोनो अन-स्यॅच्युरेटेड फॅट) मेद आणि केवळ ९ टक्के संतृप्त प्रकारातले मेद असते.
- जवसामध्ये एकूण स्निग्धांशापैकी ९१ टक्के असंतृप्त प्रकारचे मेद असते. संतृप्त मेदामुळे कोलेस्टेरॉल अधिक तयार होऊन नसांमध्ये साठून रक्त प्रवाहासाठी अडथळा निर्माण होतो.
- आहाराद्वारे संतृप्त मेद अधिक सेवन सुरु राहते तेव्हा हृदय विकाराचे आजार बळावतात. जवसामधील प्रथिनांची गुणवत्ता देखील सोयाबीनच्या तुलनात्मक आहे. महत्वाचे म्हणजे जवसामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण देखील जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठ, कोलेस्टेरॉल कमी कमी करण्यासाठी, मधुमेहासाठी जवस आणि जवसापासूनचे पदार्थ फायद्याचे आहेत. लिग्नन नामक बायो-ॲक्टिव्ह संयुंगांचेा उत्तम स्रोत जवस आहे.
- लिग्निनमुळे ताणतणाव आणि अनेक असाध्य रोगांवर फायदेशीर सिद्ध झाल्याचे संशोधनातून दिसून आले आहेत. पोषणमूल्यां खेरीज जवसामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड आणि लीनाटिनसारखे अँन्टीन्युट्रीएंटस् असल्यामुळे जवसाचा वापर मर्यादित झाला आहे. शिवाय दिवसाला १ ते २ टेबल स्पून इतकेच जवस खाल्ले पाहिजे. म्हणूनच जवसाचा आहारात उपयोग करताना भाजून घेणे महत्त्वाचे आहे.
- कुकीज, मुखवास, चटणी, चिक्की, अनेक अन्नपदार्थांत जवसाचा अंतर्भाव करून जवसचे आहारातील प्रमाण वाढवून त्यापासून मिळणारे फायदे अनुभवू शकतो आणि उत्तम आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
संपर्क ः एस. एन. चौधरी, ८८०६७६६७८३
(के. के. वाघ अन्न त्रज्ञान महाविद्यालय, नाशिक.)
- 1 of 4
- ››