प्रक्रिया उद्योगातील मक्याचे महत्त्व

प्रक्रिया उद्योगातील मक्याचे महत्त्व
प्रक्रिया उद्योगातील मक्याचे महत्त्व

तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात, जनावरांसाठी पशुखाद्य आणि कुक्कुट खाद्य म्हणून उपयुक्त आहे. मक्यामध्ये ७५ टक्के स्टार्च, ८ ते १० टक्के प्रथिने, ४ ते ५ टक्के स्निग्ध पदार्थ (तेल) असतात. मक्याच्या दान्यामध्ये १२ टक्के भाग अंकुराचा असतो. या अंकुरापासून तेल मिळते. मक्यापासून विविध प्रकारच्या प्रक्रिया करून अनेक प्रक्रिया पदार्थ आणि औषधी उत्पादने तयार करता येतात. मका प्रक्रिया

  • मक्यावर प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया (मिलिंग) करता येते. कोरडी प्रक्रिया आणि ओली प्रक्रिया. कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची कणी, रवा, पीठ, पोहे, तेल आणि पशुखाद्य तयार करता येते. ही उत्पादने जास्त दिवस ठेवल्यास खवटपणा येतो.
  • मक्यावर ओली प्रक्रिया करून स्टार्च, साखर, तेल काढण्यासाठी सल्फरडाय ऑक्साइडमिश्रित पाण्यात मका ३०-३५ तास भिजत ठेवल्याने दाने मऊ बनतात आणि त्यापासून स्टार्च अंकुर आणि पेंड सहजरीत्या वेगळी करता येतात. या ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च साखर-तेल-पेंड यांचा वापर कापड-कागद-औषधे-बेकरी या व्यवसायात केला जातो.
  • मक्याचे पीठ इतर ज्वारी-बाजरीच्या पिठात ३० ते ५० टक्के प्रमाणात मिसळल्यास उत्तम प्रतीची चपाती-भाकरी मिळते. स्वतंत्रपणे मक्याची भाकरी करता येते.
  • बेकरी व्यवसायात पाव बनविण्यासाठी दहा टक्के मक्याचे पीठ मिसळल्यास पावाची प्रत कायम राहून किंमत कमी करता येते.
  • मक्याच्या रव्यापासून उपमा, केशरी हलवा, इडलीसारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात.
  • बेसन पिठामध्ये ५० टक्के मक्याचे पीठ मिसळून उत्तम प्रकारची तळलेली शेव, वडा, भजी, पकोडे, लाडू-पापडी, वेफर्स असे पदार्थ तयार करता येतात.
  • तेल, चीज, स्वाद, मीठ-मसाला, उत्तम चवीचे कोर्न तयार करता येतात.
  • मका पिठापासून सूप-सॉस-कस्टर्ड पावडर तयार करता येते.
  • साध्या लाह्या तसेच मसालेदार लाह्या मक्यापासून बनवता येतात.
  • शक्ती-१ या जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार करता येतो.
  • सोयाबीन-भुईमूग आणि मका पीठ अगर कनिपासून मुलांना पौष्टिक बाल आहार तयार करता येतो.
  • साधा मका किंवा माधुक्याचे कोवळे दाणे असणारी कणसे भाजून किंवा उकडून खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बेबीकोर्नचे सूप, सलाड, वडा, भजी, भाजी इ.साठी उपयोग होतो.
  • अंकुर काढून मक्याचा आहारात समावेश करता येतो.
  • संपर्क ः धनश्री थोरात, ९९२१७०२१४६ (के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com