नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कृषिपूरक
आजार निदानासाठी शवविच्छेदन आवश्यक
विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार बंधनकारक असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. नैसर्गिक आपत्ती जसे वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे व वाहून जाणे, जळणे किंवा गारपिटीमुळे मृत्यू झाल्यास, ते शवविच्छेदन करूनच सिद्ध करता येते. त्यानंतर मिळणारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक असतो.
विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार बंधनकारक असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. नैसर्गिक आपत्ती जसे वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे व वाहून जाणे, जळणे किंवा गारपिटीमुळे मृत्यू झाल्यास, ते शवविच्छेदन करूनच सिद्ध करता येते. त्यानंतर मिळणारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक असतो.
जनावरांच्या विविध शारीरिक तपासण्या आणि लक्षणांच्या साहाय्याने पशुवैद्यक योग्य अंदाज बांधून उपचार करतात. परंतु, बरेच आजारी जनावरांमध्ये एकसारखी लक्षणे दाखवतात, तर काही आजार कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आजाराचे योग्य निदान होत नाही. योग्य उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. आजार संसर्गजन्य असल्यास बाकी जनावरांना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. हे रोखण्यासाठी मृत जनावरांचे शवपरीक्षण करून आजाराचे निदान करणे महत्त्वाचे आहे.
- शवविच्छेदनात (पोस्टमार्टम) मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने चिरफाड करून त्यांच्या आंतरिक अवयवांची, त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांची तपासणी केली जाते. त्या आधारे अचूक रोगनिदान करून योग्य प्रतिबंध तसेच औषधोपचार करता येतात. योग्य वेळी रोगनिदान झाल्यास त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. यामुळे पुढील काळात जनावरांतील आजारांचा प्रादुर्भाव आणि मरतुक रोखता येते.
- पशुपालनाला व्यावसायिक दृष्टिकोन आल्यामुळे कमीत कमी जागेमध्ये जास्त जनावरे ठेवली जातात. त्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव अतिजलद गतीने होतो. कळपातील बाकी जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी शवविच्छेदन परीक्षणाद्वारे मृत्यूचे संभाव्य कारण शोधून आजारी जनावरांवर योग्य औषधोपचार करावेत. मात्र, काही आजारांमध्ये जनावरे आजारांची लक्षणे दाखवत नाही, तेव्हा शवविच्छेदन करूनच आजाराचे निदान करता येते.
- विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार बंधनकारक असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. नैसर्गिक आपत्ती जसे वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे व वाहून जाणे, जळणे किंवा गारपिटीमुळे मृत्यू झाल्यास, ते शवविच्छेदन करूनच सिद्ध करता येते. त्यानंतर मिळणारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक असतो.
- एखाद्या नवीन किंवा माहिती नसलेल्या आजारामुळे जनावर दगावल्यास, शवविच्छेदनाद्वारे शरीरामधून विविध अवयव, रक्त, विष्ठा इत्यादी नमुने काढले जातात. आणि ते नमुने शासकीय/ निम शासकीय किंवा खासगी प्रयोगशाळेत पाठवून मृत्यूच्या कारणाचा शोध घेता येतो. शवविच्छेदनाद्वारे आजाराचे अचूक निदान होते. योग्य ते प्रतिबंधात्मक उपचार करता येतात. यामुळे मरतुक कमी होते. औषधोपचारावरील खर्च सुद्धा कमी होतो.
संपर्क ः डॉ. भुपेश कामडी, ७५८८२२६०१८
डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
- 1 of 34
- ››