Agriculture story in marathi, importance of postmortem in livestock | Agrowon

आजार निदानासाठी शवविच्छेदन आवश्यक

डॉ. भुपेश कामडी, डॉ. विठ्ठल धायगुडे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार बंधनकारक असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. नैसर्गिक आपत्ती जसे वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे व वाहून जाणे, जळणे किंवा गारपिटीमुळे मृत्यू झाल्यास, ते शवविच्छेदन करूनच सिद्ध करता येते. त्यानंतर मिळणारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्‍यक असतो.
 

विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार बंधनकारक असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. नैसर्गिक आपत्ती जसे वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे व वाहून जाणे, जळणे किंवा गारपिटीमुळे मृत्यू झाल्यास, ते शवविच्छेदन करूनच सिद्ध करता येते. त्यानंतर मिळणारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्‍यक असतो.
 
जनावरांच्या विविध शारीरिक तपासण्या आणि लक्षणांच्या साहाय्याने पशुवैद्यक योग्य अंदाज बांधून उपचार करतात. परंतु, बरेच आजारी जनावरांमध्ये एकसारखी लक्षणे दाखवतात, तर काही आजार कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आजाराचे योग्य निदान होत नाही. योग्य उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. आजार संसर्गजन्य असल्यास बाकी जनावरांना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यता असते. हे रोखण्यासाठी मृत जनावरांचे शवपरीक्षण करून आजाराचे निदान करणे महत्त्वाचे आहे.

  • शवविच्छेदनात (पोस्टमार्टम) मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने चिरफाड करून त्यांच्या आंतरिक अवयवांची, त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांची तपासणी केली जाते. त्या आधारे अचूक रोगनिदान करून योग्य प्रतिबंध तसेच औषधोपचार करता येतात. योग्य वेळी रोगनिदान झाल्यास त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. यामुळे पुढील काळात जनावरांतील आजारांचा प्रादुर्भाव आणि मरतुक रोखता येते.
  • पशुपालनाला व्यावसायिक दृष्टिकोन आल्यामुळे कमीत कमी जागेमध्ये जास्त जनावरे ठेवली जातात. त्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव अतिजलद गतीने होतो. कळपातील बाकी जनावरे आजारी पडण्याची शक्‍यता असते. अशावेळी शवविच्छेदन परीक्षणाद्वारे मृत्यूचे संभाव्य कारण शोधून आजारी जनावरांवर योग्य औषधोपचार करावेत. मात्र, काही आजारांमध्ये जनावरे आजारांची लक्षणे दाखवत नाही, तेव्हा शवविच्छेदन करूनच आजाराचे निदान करता येते.
  • विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार बंधनकारक असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. नैसर्गिक आपत्ती जसे वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे व वाहून जाणे, जळणे किंवा गारपिटीमुळे मृत्यू झाल्यास, ते शवविच्छेदन करूनच सिद्ध करता येते. त्यानंतर मिळणारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्‍यक असतो.
  • एखाद्या नवीन किंवा माहिती नसलेल्या आजारामुळे जनावर दगावल्यास, शवविच्छेदनाद्वारे शरीरामधून विविध अवयव, रक्त, विष्ठा इत्यादी नमुने काढले जातात. आणि ते नमुने शासकीय/ निम शासकीय किंवा खासगी प्रयोगशाळेत पाठवून मृत्यूच्या कारणाचा शोध घेता येतो. शवविच्छेदनाद्वारे आजाराचे अचूक निदान होते. योग्य ते प्रतिबंधात्मक उपचार करता येतात. यामुळे मरतुक कमी होते. औषधोपचारावरील खर्च सुद्धा कमी होतो.

संपर्क ः डॉ. भुपेश कामडी, ७५८८२२६०१८
डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
 


इतर कृषिपूरक
घटसर्पावर नियंत्रण, वाढवी दुग्ध उत्पादनघटसर्प आजार अतितीव्र आणि अत्यंत घातक आहे. बऱ्याच...
संगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचेस्थानिक जाती नैसर्गिक निवडपद्धतीतून निर्माण...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
व्यवस्थापन म्हशींच्या माजाचेदुग्ध व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी म्हशीने दर १३...
सुधारीत पद्धतीने लाव्ही पक्षीपालनजपानी लाव्ही पक्षांची खाद्याची गरज फार कमी असते....
जनावरांची रक्त तपासणी महत्त्वाची...आजार करणारे रोगजंतू जनावरांच्या शरीरामधील आंतरिक...
गोठ्यातील माश्यांचे एकात्मिक व्यवस्थापनगोठ्यात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे कीटकवर्गीय...
जनावरांतील परोपजिवींचे नियंत्रण...सध्याच्या काळातील परोपजिवींच्या प्रादुर्भावामुळे...
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनपावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता वाढते आणि अशा...
दुधाळ जनावरांच्या आहारात कॅल्शिअम...जनावरांच्या खाद्यामध्ये विकसित होणारी बुरशी तसेच...
प्रसुती दरम्यान जनावरांची काळजीगाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात तसेच डोंगर...
गाई, म्हशीमधील प्रजनन व्यवस्थापनकालवडी साधारण १२ ते १८ महिने आणि वगारी २४ ते ३६...
स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्राभरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर...
मजुरांशिवाय कुटुंब झाले दुग्धव्यवसायात...पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यालगत शहरीकरण वाढले...
बाजारपेठेत वाढतेय ‘चीज'ला मागणीआपल्या देशामध्ये प्रामुख्याने प्रक्रियायुक्त चीज...
लंम्पी स्कीन डिसीज आजाराचे नियंत्रणलंम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गाई, बैल,...
दुग्धोत्पादनासाठी प्रजननाची पंचसूत्रीदुग्धोत्पादन हे गाई,म्हशींच्या प्रजननावर अवलंबून...
अन्न सुरक्षेेचा प्रश्न ऐरणीवर...अंतर्गत संघर्ष, हिंसा या मानवी कारणांसोबतच विविध...
जनावरांतील धर्नुवाताची लक्षणे अन्...जनावरांच्या शरीरावरील जखमांतून धर्नुवात आजाराचे...
परसबागेमध्ये वनराजा कोंबडीपालनमुक्तपद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि, बंदिस्त...