कॅल्शियम, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः नाचणी

नाचणी
नाचणी

मानवी अाहारात गव्हाव्यतिरिक्त इतर धान्यांचा अत्यंत कमी वापर केला जाताे. चांगल्या आरोग्यासाठी आहारात विविध धान्यांचा समतोल समावेश करणे गरजेचे आहे. म्हणूनच गव्हाव्यतिरिक्त ज्वारी, बाजरी, नाचणी यांचे सेवन आरोग्य उत्तम राखण्यास मदतीचे ठरेल. नाचणी प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशातील लोकांच्या दैनंदिन अाहारातील प्रमुख धान्य अाहे. नाचणीपासून विविध पदार्थ तयार करून शहरी भागातील लोकांच्या अाहारात नाचणीचा वापर वाढवणे शक्य अाहे.

नाचणीचे अाहारातील महत्त्व

  • नाचणीमध्ये ७.३ टक्के प्रथिने, ३.६ टक्के तंतुमय पदार्थ, ५९ टक्के पिष्टमय पदार्थ, १.३ टक्के स्निग्ध पदार्थ आणि ३ टक्के खनिजे असतात.
  • नाचणी हे एकमेव कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असणारे धान्य आहे. इतर कोणत्याही धान्यापेक्षा १० पट तर दुधापेक्षा ३ पट अधिक कॅल्शिअम नाचणीमध्ये असते.
  • ब्राऊन राईस, मका किंवा गहू या धान्यांपेक्षा नाचणी मधील कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.
  • लोह हे खनिजसुद्धा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात असून आरोग्यवर्धक लिनोलिनिक आणि लिनोलिक ॲसिड, तसेच थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन आणि टोकोफेरॉल नामक आरोग्याला फायदेशीर घटक मुबलक प्रमाणात असतात.
  • नाचणीपासून सत्त्व, पापड, डोसा, चकल्या, शेव, बिस्किट्स, केक इत्यादी असे विविध पदार्थ बनवता येतात.
  • नाचणीत भात-गव्हापेक्षा तंतुमयपणा जास्त आहे. यामुळे नाचणी रक्तातील साखर वाढण्यास विरोध करते. यासाठी मधुमेही रुग्णांसाठी नाचणी हे चांगले अन्न अाहे.
  • नाचणीच्या सेवनाने लोहाच्या कमतरतेमुळे होणारे आजार उदा. रक्तक्षय, बद्धकोष्ठता बरा होण्यास मदत होते. त्यामुळे गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश उपयोगी ठरतो.
  • नाचणीतील तंतुमय पदार्थ रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर रक्तशर्करा वाढण्यास कमी प्रतिसाद देते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना नाचणी हे पोषक अन्न आहे.
  • नाचणी लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते.
  • नाचणीमध्ये कर्बोदकांचे प्रमाण ७२ टक्के असून, ते नॉन स्टार्चच्या स्वरूपात आहे.
  • नाचणीमध्ये टॅनिन व फायटेट हे अनावश्‍यक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. नाचणीचा आहारात वापर केल्यास धातूच्या शोषणात बाधा येण्याची शक्‍यता असते, म्हणून असे अनावश्‍यक घटकांचे कमी करून नाचणीचा वापर करता येतो. हे अनावश्‍यक घटक काढून टाकण्यासाठी मोड आणण्याची प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केली जाते. परंतु आता भाजणे, वाळविणे, शिजविणे इ. प्रक्रियांचाही वापर केला जातो.
  • संपर्क ः एस. एन. चौधरी, ८८०६७६६७८३ (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com