Agriculture story in marathi importance of sorgham in human diet | Agrowon

ज्वारी पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले !

डॉ. साधना उमरीकर, डॉ. सचिनकुमार सोमवंशी
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश आहे. ज्वारीच्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादनाचा वाटा हा भारताचा आहे (संदर्भ एफएओ). भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे (एकूण सरासरी उत्पादन ४९ टक्के). म्हणूनच महाराष्ट्राला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही जिल्हे ज्वारी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश आहे. ज्वारीच्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादनाचा वाटा हा भारताचा आहे (संदर्भ एफएओ). भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे (एकूण सरासरी उत्पादन ४९ टक्के). म्हणूनच महाराष्ट्राला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही जिल्हे ज्वारी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

ज्वारीचे आरोग्यविषयक फायदे
ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असल्यामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही ज्वारीच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यामुळेच मोठ्या शहरातील हॉटेल्स, धाबे व पर्यटन स्थळे येथे ज्वारीच्या भाकरीच्या मागणीचे प्रमाण वाढते आहे.

ज्वारीमधील उपलब्ध पौष्टिक तत्त्वांचे प्रमाण

 • प्रथिने (टक्के) ः ः ११.६
 • स्निग्ध पदार्थ (टक्के) ः ः १.९
 • खनिज पदार्थ (टक्के) ः १.६
 • तंतुमय पदार्थ (टक्के) ः १.६
 • पचनारे तंतुमय पदार्थ (टक्के) ः १२.६९
 • कर्बोदके (टक्के) ः ७२.६
 • ऊर्जा (मिलीग्रॅम/१०० ग्रॅम) ः ३४९
 • कॅल्शियम (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः २९
 • फॉस्फरस (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः २२५
 • लोह (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम) ः ४.१
 • केरोटीन (प्रो व्हिटामिन ए) ः ४७
 • थायमिन ः ३७
   
 • ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक, पांढऱ्या रंगाची असते. आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा टक्के असतो.
 • ज्वारीमध्ये कर्बोदके, ऊर्जा, तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे ती शक्तीवर्धक आणि पचण्यास सुलभ आहे.
 • ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स (रक्तातील साखरेची पातळी वाढविण्याची क्षमता) कमी असल्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी ज्वारीचे सेवन फायदेशीर ठरते.
 • ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, कॉपर, नायसिनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यात अँटी ऑक्सिडंटसचे प्रमाण असल्यामुळे हृदय विकार, कर्करोग यासारख्या आजारांवर ज्वारीच्या सेवनाने लाभ होतो.

ज्वारीचा हुरडा
ज्वारीचा हुरडा हा अत्यंत स्वादिष्ट, रुचकर व लोकप्रिय पदार्थ आहे. डिसेंबर महिन्यात ज्वारी हुरड्यात यायला सुरवात होते. हा हुरडा कोवळा असताना खातात. ग्रामीण भागातून, कृषी पर्यटन स्थळे व मोठमोठ्या हॉटेल्स मधून हुरड्याला अत्यंत मागणी असते. हुरडा रुचकर लागण्याचे कारण म्हणजे कोवळ्या अवस्थेत या दाण्यांमध्ये मुक्त अमीनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

कोवळ्या दाण्यांमध्ये पिष्ठमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. असे दाणे भाजल्यावर ते अत्यंत रुचकर लागतात. यात मीठ साखर, लिंबू घालून शेंगदाणे किंवा खोबऱ्याच्या चटणी सोबत अथवा गुळासोबत खायला दिल्यास त्याची चव द्विगुणित करता येते. हुरड्याबरोबर लिंबाच्या सेवनाने ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढून लोहाचे शोषण सुलभतेने होते. हुरड्याच्या कोवळ्या दाण्यांची परिपूर्ण वाढ झाल्यावर त्याला जोंधळा म्हणतात.

हुरड्यासाठी ज्वारीच्या महत्त्वाच्या जाती
ज्वारीच्या चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार बियाणे, अधिक उत्पन्न देणाऱ्या नवनवीन जातींची लागवड करणे आवश्यक आहे.

 • खरीप हंगामातील अकोला वाणी, अकोला अश्विनी आणि अकोला कार्तिकी या जाती तर रब्बी पारंपरिक हंगामातील गूळभेंडी, सुरगी, कुचकुची या स्थानिक जाती हुरड्यासाठी लोकप्रिय आहेत.
 • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एस. जि. एस. ८४ या जातीची खास हुरड्यासाठी शिफारस केली आहे.
 • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या विविध जातीमधील फुले मधुर, फुले उत्तरा या शिफारसप्राप्त जाती हुरड्यासाठी लोकप्रिय होत आहेत. फुले मधुर व फुले उत्तराची वैशिष्ट्ये
 • या वाणांचा हुरडा अतिशय रुचकर व गोड आहे.
 • कोवळ्या अवस्थेतील दाणे हिरवीगार व दुधाळ असून याची कणसे भरदार आहेत, तसेच कणसातील दाणे सुलभतेने बाहेर पडतात. हा हुरडा ९० ते १०० दिवसांत तयार होतो. याच्या एका कणसापासून अंदाजे ७०-९० ग्रॅम दाणे मिळतात. यांची ताटे ही गोड असल्यामुळे जनावरांसाठीदेखील चांगल्या प्रकारचा कडबा मिळतो.

संपर्क ः डॉ. साधना उमरीकर, ९४२०५३००६७
(कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर) 


इतर कृषी प्रक्रिया
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...
कृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...
चिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...
पपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...
भोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक...
चिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...
कलिंगडापासून तयार करा विविध...कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने...
जांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेलीमे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात...