Agriculture story in marathi importance of vaccination in livestock | Agrowon

जनावरांतील लसीकरणाचे महत्त्व

डॉ. शुभांगी वारके
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.
 

जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.
 
दुग्धव्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जनावरांना विविध प्रकारच्या जिवाणू व विषाणूपासून संसर्गजन्य रोग होतात. या रोगांमुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटते, जनावरांची कार्य करण्याची क्षमता कमी होते व त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते. त्यामुळे व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. जनावरांमध्ये विशिष्ट रोगांसाठी लस उपलब्ध आहे आणि अशाप्रकारची लस दिल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते. लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, मात्र लसीकरणापासून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते, त्यामुळे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावे.

लसीकरण करताना महत्त्वाचे

 • लसीकरण तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावे.
 • निरोगी जनावरांनाच लसीकरण करावे.
 • लसीकरण शक्यतो सकाळी करावे.
 • लसीकरणाच्या १५ दिवस आधी जनावरांना जंतनाशकाची मात्रा द्यावी.
 • जनावरांच्या अंगावरील गोचिड, पिसवा काढण्यासाठी योग्य औषधाचा वापर करावा.
 • जनावरांचे नियमित लसीकरण करावे
 • रोगाची लागण झालेल्या जनावरांमध्ये लसीकरण करू नये.
 • आपल्या भागात वारंवार उद्भवणाऱ्या आजाराचे लसीकरण पशुवैद्यकाला विचारून करावे; कारण काही विशिष्ट आजार काही
 • विशिष्ट भागातच उद्भवतात.
 • गाभण जनावरात लसीकरण करू नये.
 • जिवंत विषाणू लस असल्यास लसीकरण करताना बर्फावरच ठेवावी.
 • वापरलेल्या रिकाम्या बाटल्या योग्य प्रकारे नष्ट कराव्यात.
 • लसीकरण करण्याकरिता वापरलेल्या इंजेक्शन किंवा सुई योग्य प्रकारे नष्ट कराव्यात.
 • वयापेक्षा लहान जनावरांचे लसीकरण करू नये.
 • आपल्याकडील जनावरे व त्यांना आवश्यक मात्रा या बाबींचा विचार करून लस खरेदी करावी.
 • लसीच्या बाटलीवर लिहिलेली मुदतीची तारीख बघावी.
 • लस देण्याची पद्धत व मात्रा उत्पादकांच्या माहितीपत्रात दिल्याप्रमाणे असावी.
 • लसीकरणाबाबत व लस तयार करण्याबाबत लस निर्मात्या कंपनीच्या माहिती पत्रकात दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
 • बाजारातून आणलेली लस योग्य त्या तापमानात (बर्फात) ठेवावी.
 • एकदा लसीची बॉटल फोडली की त्यातील पूर्ण मात्रा लवकरात लवकर उपयोगात आणावी.
 • शिल्लक राहिलेल्या मात्रा योग्य रितीने नष्ट कराव्यात.
 • पहिल्यांदा लस दिल्यावर ठराविक कालावधीनंतरच दुसरी लस द्यावी.
 • कळपातील सर्व जनावरांचे एकाच वेळी लसीकरण करावे.
 • कळपात लसीकरण करीत असताना प्रत्येक जनावरांसाठी वेगळी सुई वापरावी किंवा किमान निर्जंतूक करून घ्यावी.
 • वरील नियमांचे पालन करून पशुवैद्यक सल्ल्याने जर लसीकरण केले तर लसीकरण प्रभावी होईल व जनावरांचे संभावित संसर्गजन्य रोगापासून संरक्षण होईल.
 • जनावरांना देण्यात येणाऱ्या लसी शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात नाममात्र शुल्कावर उपलब्ध होतात.
 • लसीकरणावरील खर्च हा तुलनेने अत्यल्प असतो; कारण एकदा का एखादा आजार झाला तर औषधेपचार करूनसुद्धा जनावर दगावण्याची शक्यता, यामुळे होणारे आर्थिक नुकसान जास्त असते.
 • पशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही.

गाई म्हशीतील लसीकरण

 • घटसर्प/गलघोटू ः एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
 • (संकरित गाई व म्हशीत वर्षातून दोन वेळेस दयावी)
 • फऱ्या/एकटांग्या ः एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
 • फाशी/काळपुळी ः मे महिन्यात वर्षातून एक वेळेस (रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच)
 • लाळ्या व खुरकुत ः वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.
 • अॅथ्रॅकस ः ज्या भागात प्रादुर्भावाची १ वर्ष शक्यता वारंवार आहे अशा ठिकाणी दरवर्षी द्यावे.
 • सांसर्गिक गर्भपात ः ज्या फार्मवर बुरसेल्लोसिसची चाचणी करून जी जनावरे निश्चितपणे रोगग्रस्त सापडतात त्यांना कळपातून काढून टाकले जाते. अशा ठिकाणी परत लसीकरण केले नाही तरी चालते.

शेळ्या मेंढ्यांतील लसीकरण
 

 • काळपुळी ः वर्षातून एकदा फेब्रुवारीत द्यावी (रोगग्रस्त भागात)
 • घटसर्प ः वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी
 • आंत्रविषार ः वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी
 • फऱ्या ः वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी
 • लाळ्या खुरकुत ः वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्च मध्ये द्यावी
 • देवी ः वर्षातून एकदा डिसंबरमध्ये दयावी (गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये.)

संपर्क ः डॉ. शुभांगी वारके, ९५६१२१४३९५
(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)

 


इतर कृषिपूरक
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...
किफायतशीर दूध उत्पादनासाठी गाईची निवड गाईची निवड करताना शरीररचना, रंग याचबरोबर...
फायदेशीर देशी मागूर माशांचे संवर्धन कराथाई मागूर हा मासा मांसभक्षक आहे. थाई मागूरची वाढ...
देशी गाईंच्या संगोपनातून वाढविला नफाव्यावसायिक पद्धतीनेच शेती नियोजन करायचे, हा...
गाभण जनावराची योग्य देखभाल महत्त्वाचीजनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य...
संतुलित खाद्य व्यवस्थापनातून दूध...जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने...