agriculture story in marathi, indigenious cow farm, milk branding, dhandarphal, akole, nagar | Agrowon

दोनशे देशी गायींच्या संगोपनासह साडेसातशे लिटर दूध विक्री 
सूर्यकांत नेटके 
शनिवार, 18 मे 2019

दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने गावे व शहरांशी कायम जोडलेलो आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने व्यवसायात प्रगती करता आली. ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पुरवण्याला प्राधान्य देतो. 
-शुभम घुले 

सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह दररोज साडेसातशे लिटर दुधाची विक्री व्यवस्था, सोबत तूपनिर्मिती व उपउत्पादने असा सक्षम दुग्ध व्यवसाय नगर जिल्ह्यातील धांदरफळ (कौठे) येथील युवा शेतकरी शुभम घुले यांनी उभारला आहे. ‘निमाई’ हा आपला ब्रॅंड तयार करून विश्‍वास देत ब्रॅंडने वेगळी ओळख निर्माण केलीय. 

अकोले तालुका म्हणजे नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक. येथील शुभम घुले या तरुणाने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. वडील तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक. शुभम यांची बहीण श्रद्धा यांनी लांब उडी क्रीडा प्रकारात कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविलेले असून ती शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती आहे. मेहुणे गुजरातमध्ये जिल्हाधिकारी आहेत. घरचे पंचवीस एकर क्षेत्र. प्रवरा नदी शेजारून वाहती असल्याने पाण्याचीही कमतरता नाही. 

देशी गो-संगोपन 
शुभमने पदवीनंतर नोकरीपेक्षा व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला. हा परिवार अनेक वर्षापासून दुग्ध व्यवसायात आहेच. दहा संकरीत एचएफ गायी होत्या. परंतु देशी गायीच्या दुधाला चांगली मागणी व दर असल्याचे अभ्यासातून पुढे आले. त्यातून देशी गायींचेच संगोपन करण्याचे ठरले. कुटुंबातील व्यक्तींनी त्यास सहमती दिली. शुभमने गुजरातमधील धरमुपुरी येथे पंचगव्य सिद्ध विषयातील तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. गीर गायींच्या सर्व ऋतूंतील जीवनशैलीचा अभ्यास केला. सन २०१६ मध्ये १० गीर गायी आणून मुक्त संचार गोठा सुरू केला. सुरवाताली चाळीस लिटर दूध संकलन व्हायचे. टप्प्याटप्प्याने गायींची खरेदी करीत संख्या वाढवली. 

सध्याचा दुग्ध व्यवसाय 

 • गायींची संख्या 
 • देशी गीर गायी- १३८ 
 • कांकरेज- ५ 
 • स्थानिक जात- १ 
 • खिलार- १ 
 • वासरे- ६५. 

गीर गाय प्रति दिन ८ ते १० लिटरपर्यंत दूध देतात. सोळा लिटरपर्यंतही दूध देणाऱ्या काही गायी. 
गीर जातीचे दोन वळू (एक भावनगर व एक जुनागढ) खरेदी केले आहेत. त्यांच्या जन्मापासूनच्या मागील सात पिढ्यांची माहिती घेतली आहे. 

दूध विक्री 

 • दूध संकलन- दररोजचे ७०० ते ७२५ लिटर. 
 • अकोले, संगमनेर येथे प्रति लिटर ७५ रुपये दराने २५० लिटर तर पुण्यात ९९ रुपये दराने ३०० लिटर थेट ग्राहकांना विक्री. 
 • पुण्यासारख्या शहरात निवासी सोसायट्यांमध्ये डोअर टू डोअर जाऊन दुधाचे महत्त्व समजावून दिले. 
 • माहितीपत्रके छापून प्रसार केला. प्रसंगी फ्लेक्स उभारून प्रमोशन केले. 
 • दुधाच्या डिलिव्हरीसाठी वितरक व स्वतंत्र कामगार ठेवले आहेत. 
 • उर्वरित दुधापासून सुमारे सहा ते आठ किलो तूप. मागणीनुसार तीन हजार रुपये प्रति किलो दराने विक्री. 
 • सिंगापूर, अमेरिका, दिल्लीसह अन्य भागांत स्थायिक ग्राहकांना तूप थेट कुरिअरने पाठवले जाते. 

उप-उत्पादने 

 • गोमूत्र अर्क, दूध, दही, तूप, शेण तसेच अन्य घटकांचा आधार घेऊन विविध उत्पादनांची निर्मिती 
 • यात पंचगव्य, कापरापासून अमृतधारा, हिरडा, आवळा, बेहडा यापासून त्रिफळा अर्क, गोवरीची राख, लवंगापासून दंतमंजन, रिठा, शिकेकाई, हेअरकेअर लोशन आदींचा समावेश 
 • त्यांना चांगली मागणी. उत्पादनांसाठी पहाटे गोमुत्राचे संकलन 

दर्जेदार चाऱ्याचे उत्पादन 
संकरित गायीच्या दुधापेक्षा देशी गायीच्या दुधाला दर जास्त मिळतो. साहजिकच ग्राहकांना दर्जा चांगला हवा असतो. ग्राहक चाऱ्याविषयी विचारणा करतात. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला चाराच दिला जातो. मका, मारवेल आदी पिकांची आठ एकरांवर लागवड आहे. दुधाचा दर्जा कायम टिकवण्यासाठी भात, हरभरा, गव्हाचा भुसा, बाजरी, ज्वारीचा वाळलेला चारा यांचीही गरजेनुसार साठवण केली आहे. 

गायींची जनुकीय तपासणी 
गायीचे ब्रीड देशी, जातिवंत असल्याचे व साहजिकच दूधही देशीच असल्याचे जनुकीय स्तरावरील पृथ्थकरण शुभम यांनी पुणे येथील प्रयोगशाळेतून करून घेतले. या अहवालात सहा गायी देशी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली. जातिवंत वाणच गोठ्यात ठेवण्याबाबत शुभम काटेकोर असल्याचे या उदाहरणावरून दिसून येते. 

बायोगॅस, खतनिर्मिती 

 • दर महिन्याला दहा ते बारा ट्रॉली शेण उपलब्ध. पाच हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री 
 • शेणखत व वाया जाणाऱ्या गोमुत्रावर प्रक्रिया करून जैविक स्फुरदयुक्त खत तयार करण्याचे प्रयत्न 
 • विजेवरील खर्च कमी करण्यासाठी बोयोगॅस प्रकल्प उभारणीचे नियोजन 
 • परिसरात फळबांगाचे प्रमाण अधिक. त्यासाठीही स्लरी तयार करणार 

घुले यांच्याकडून शिकण्यासारखे 

 • नोकरी न करता देशी गायींचा दुग्ध व्यवसाय सुरू करून १८ जणांना रोजगार 
 • गाईंसोबत वागणूक कशी हवी, त्यांना कसे हाताळायचे याचे मजुरांना प्रशिक्षण 
 • यंत्राचा वापर न करता हातांकरवी दूध काढणी. 
 • प्रत्येक गाईचे नामकरण. गायींना प्रशिक्षण दिल्याने नाव घेतले की ती त्वरीत जवळ येते. 
 • वासरे, दुभत्या गाई व गाभण गाई यांची स्वतंत्र व्यवस्था 
 • ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शास्त्रीय अहवाल 
 • उत्पादनांचा घरपोच पुरवठा. शेडवरही विक्री 

 संपर्क- शुभम घुले - ७०२८४०३३३३ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...
कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...
भूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...
गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...
सिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले...हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील...
प्रतिकूलतेवर मात करीत बटण मशरूमचा...स्पर्धा परीक्षेतून हुलकावणी, त्यानंतर केळी...
विदर्भात यशस्वी खजूरशेती, दहा...नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा...
दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम...सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर...
संकटातही ऐंशीहजार लेअर पक्षी उत्पादनाची...अमरावती जिल्ह्यात खरवाडी येथे सुमारे ३० ते ३५...