agriculture story in marathi, indigenous cow farming, morshi, amravati | Agrowon

गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची विक्री 
विनोद इंगोले
मंगळवार, 11 जून 2019

ग्राहकांना दिले मोफत दूध 
दुधाचे मार्केटिंग करण्यासाठी विश्‍वजीत यांना कष्ट घ्यावे लागले. ब्रॅन्‍डिंगसाठी नागपूर, अमरावती येथील अपार्टमेंटमधील रहिवाशांना अर्धा लिटर दुधाची पाकिटे मोफत दिली. आवडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला.  

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी प्रसिद्ध तालुका. याच मोर्शीतील युवा शेतकरी विश्‍वजीत देशमुख यांनी गीर गायींचे संगोपन व देशी दूध व तुपाला मार्केट मिळवून देण्यास सुरवात केली आहे. व्हिडी फार्मलॅण्ड हा ब्रॅण्ड तयार केला आहे. उत्पादनापासून ते मार्केटिंग, पॅकिंग वितरणापर्यंत नेटवर्क उभारण्यात आले आहे. 
 
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुका हा संत्रा पट्टा म्हणून ओळखला जातो. याच मोर्शीमध्ये तरुण शेतकरी विश्‍वजीत देशमुख राहतात. सुरवातीपासून दुग्धव्यवसायच सुरू करण्याच्या विचारात असलेल्या विश्‍वजीतने देशी गायीचे संगोपन तसेच शेण, गोमूत्र यांच्या विक्रीचाही विचार डोक्‍यात ठेवला होता. त्यामुळेच या विषयातील तांत्रिक माहिती मिळविण्याचे काम त्याने पहिल्या टप्प्यात हाती घेतले. अपारंपरिक ऊर्जा वापरणाऱ्या देशांविषयी जाणून घेतले. दूध उत्पादनासोबतच बायोगॅसच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करता येईल का याची चाचपणी पुढच्या टप्प्यात सुरू केली. ‘मदर डेअरी’ कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. 

दुग्धव्यवसायाची उभारणी 
संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर दहा गीर गायींपासून व्यवसायाची सुरवात झाली. दूध उपलब्ध होऊ लागले. पण ते विकताना खूप त्रास झाला. ए टू मिल्क या नावाने संबोधल्या जाणाऱ्या या दुधाविषयी ग्राहकांना अजून खूप माहिती होणे बाकी होते. परिणामी विश्‍वजीत यांना दुधाला अपेक्षित दर मिळत नव्हता. मोर्शी येथील प्रयोगशील शेतकरी अजित जोशी यांनी मात्र हे महत्त्व ओळखून दुधाची खरेदी सुरू केली. तेच पहिले ग्राहक ठरले. 

टप्याटप्याने वाढविली संख्या 
गायींच्या खरेदीसोबतच जातिवंत गीर वळूची खरेदी पोहरा (जि. अमरावती) येथील शासकीय गीर संवर्धन केंद्रातून ६० हजार रुपयांना केली. दर चार महिन्यांनी तीन गायी याप्रमाणे टप्याटप्याने संख्या वाढविण्यात आली. आता प्रकल्पातील गायींची संख्या ८४ वर पोचली आहे. लहान वासरांची संख्या १५ पर्यंत आहे. 
प्रतिगीर गायीपासून प्रतिदिन सहा लिटरपर्यंतच दूध मिळते. 

व्यवस्थापनातील बाबी 

 • सुमारे ९० बाय ७० फूट आकाराचे शेड. नऊ लाख रुपयांत उभारणी 
 • मुक्‍त गोठा संचार पद्धतीचा अवलंब 
 • गायींच्या वजनारूप (बॉडी मास इन्डेक्‍स) खाद्य देण्यावर भर. मका, ज्वारी, तुरीची चुरी यांचे मिक्‍श्चर 
 • सोबत पोषक अन्नद्रव्ये. सुका व चारा यांचा संतुलित वापर 
 • मका, ज्वारी, यशवंत या हिरव्या चाऱ्यासोबत गुळवेलचा वापर 
 • सुमारे ४० एकर शेतीपैकी दहा एकरांवर चारा लागवड 
 • उन्हाळ्यात गाईच्या पाठीला कोरफड लावल्यास थंडावा राहतो 
 • बेलाची पाने १२ ते १५ दिवस वाळत घालून हाताने बारीक करून ती एखाद्या बॉक्‍समध्ये ठेवल्यास त्याद्वारे कॅल्शियम उपलब्ध करणे शक्य असल्याचे विश्‍वजीत सांगतात. कॅल्शियमवर अतिरिक्‍त खर्च करण्याची गरज यामुळे भासत नाही. गाय जमीन चाटते त्या वेळी या खनिजाची कमतरता असल्याचेही विश्‍वजीत यांचे म्हणणे. 
 • आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी ‘कॉल बेसीसॅवर पशुधन अधिकाऱ्यांची सेवा घेतली जाते. 
 • जनावरांचे लसीकरण त्याच माध्यमातून. कॅल्शियम वगळता महिन्याला सहा हजार रुपयांचा खर्च जनावरांच्या आरोग्यावर. 
 • दररोज सरासरी १२५ लिटरपर्यंत दूध संकलन होते. 
 • सुरवातीला यंत्राद्वारे दूध काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु गायींना सवय नसल्याने सुरवातीला दूध कमी मिळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मजुरांमार्फतच दूध काढण्यावर भर दिला गेला. 
 • गाय वाल्यानंतर दोन महिन्यांनी ती गर्भार राहिली पाहिजे असे नियोजन. त्यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य व ही सायकल सुरू राहते. 

दूध पॅकिंग युनिट 
प्रती तास ५०० पॅकेटस क्षमतेचे पॅकिंग युनिट त्यांनी उभारले आहे. सुमारे ६८ लाख रुपयांत त्याची उभारणी करण्यात आली. दररोज ३०० पर्यंत पॅकिंग होते. मोर्शीहून अमरावती आणि तेथून नागपूर असे दूध पाठविले जाते. त्यासाठी खासगी वाहतूकदाराची मदत घेतली आहे. सुमारे ३० लिटर दुधापासून एक किलो तूप मिळते. यात २५० मिली, ५०० मिली व एक किलो पॅकिंगमध्ये तुपाची विक्री होते. कंपोस्टची विक्री १५ रुपये प्रतिकिलो दराने होते. गोवऱ्यांची विक्रीही करण्यावर भर आहे. 
व्यवसाय व्यवस्थापन, दुधाची विक्री, मार्केटिंग, वितरणासाठी मोर्शी येथे आठ, अमरावती आणि नागपूर येथे प्रत्येकी सहा व्यक्‍तींची नेमणूक करण्यात आली आहे. ग्राहकांना घरपोच दूध पोचविले जाते. 

कर्जासाठी झिजविले उंबरठे 
व्यवसाय विस्ताराच्या विचारात असलेल्या विश्‍वजीत यांनी कर्जासाठी काही बॅंकांचे उंबरे झिजवले. 
परंतु, या बॅंकांनी नकारात्मकता दर्शविली. तरीही निराश न होता भांडवल उभारणीचे पर्याय विश्‍वजीत यांनी निवडले. शासनस्तरावरुन मुद्रा लोनचा प्रसार होत असला तरी बॅंका मात्र सुलभरित्या ते मिळू देत नाहीत, अशी व्यथा विश्‍वजीत व्यक्त करतात. 

ग्राहकांना दिले मोफत दूध 
दुधाचे मार्केटिंग करण्यासाठी विश्‍वजीत यांना कष्ट घ्यावे लागले. ब्रॅन्‍डिंगसाठी नागपूर, अमरावती येथील अपार्टमेंटमधील रहिवाशांना अर्धा लिटर दुधाची पाकिटे मोफत दिली. आवडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद मिळत गेला. पत्नी पूनम, चुलतभाऊ सारंग यांची मदत दैनंदिन व्यवस्थापनात होते. भूषण सोनोने वाहतुकीची जबाबदारी पाहतात. अमरावती येथील मयुरी भांगे यांच्याद्वारे तीन जिल्ह्यांतील वितरण व अन्य कामांची जबाबदारी पार पाडली जाते. 

 • दर 
 • दूध- प्रती लिटर- ६० रु. 
 • तूप- १२०० रुपये प्रतिकिलो 
 • गोमूत्र- वीस रुपये प्रतिलिटर 
 • गोमूत्र बॉटल- ५० मिली- साडेचार रुपये 

संपर्क- विश्‍वजीत देशमुख- ९९५३३२७९३४

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...