वासरांमधील संसर्गजन्य अतिसार

अतिसाराचा प्रादुर्भाव झालेल्या वासरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.
अतिसाराचा प्रादुर्भाव झालेल्या वासरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.

वासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची लक्षणे दर्शवतो. अतिसार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, जसे- गैरसंसर्गजन्य व संसर्गजन्य कारणे. प्रतिबंधात्मक उपायांसाठी संक्रमक घटकांची ओळख करून निदान करून घेणे आवश्यक ठरते. अतिसार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, गैरसंसर्गजन्य कारणे, जसे- असंतुलित आहार, आहारमध्ये अचानक बदल, खाद्याच्या वेळापत्रकातील बदल यांचा समावेश होतो. तसेच संसर्गजन्य कारणांमध्ये संक्रमण (जिवाणूजन्य किंवा विषाणूजन्य), परजीवी संसर्ग, आतड्यांमध्ये आंशिक अडथळा इ. घटक समाविष्ट होतात. अतिसार हा आतड्यातील पोषणमूल्य शोषून घेण्यास प्रतिबंधित करतो. वासरांमध्ये पोषक घटक शोषण्याची क्षमता प्रभावित होऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे (डीहायड्रेशन) आढळून येते .

रोटा व्हायरस विषाणूजन्य संसर्ग

  • रोटा व्हायरस विषाणूजन्य संसर्ग नवजात वासरात आंत्रशोषण व अतिसराचे प्रमुख कारण आहे. यामध्ये तीव्र स्वरूपाचा अतिसार होऊ शकतो.
  • हा संसर्ग साधारणतः चार दिवस ते तीन आठवडे वयाच्या वासरामध्ये आढळून येतो.
  • कारणे साधारणतः अतिसार हा आतड्यात बिघाड झाल्याने होऊ शकतो. अति थंडी किंवा पावसाळा यामुळे वासरांवर ताण येऊन ती इतर रोगजंतू व अाजारास बळी पडू शकतात. याची लक्षणे ही वजन कमी होणे, अतिप्रमाणात हगवण, रक्ती हगवण, हिरवट किंवा फिक्कट पिवळ्या रंगाचा अतिसार, आतड्यांचे श्लेष्म शौचातून जाणे, आतड्यांचा दाह होणे इ. आहेत. आतड्यांचे श्लेष्म शौचातून गेल्यामुळे आतडे प्रभावित होऊ शकतात व शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने (डीहायड्रेशन) शरीरात क्षारांची कमतरता होऊ शकते. आम्लतादेखील वाढू शकते.

    लक्षणे पातळ स्वरूपाचा हिरवट किंवा फिक्कट पिवळ्या रंगाचा अतिसार, भूक मंदावणे, पाण्याचे प्रमाण कमी होणे (डीहायड्रेशन), सुस्तावलेले आणि थकल्यासारखे दिसणे, डोळे निस्तेज खोलवर जाणे, दूध न पिणे, तीव्र व रक्ती अतिसार, आतड्यांचे श्लेष्म शौचातून जाणे. अतिसार साधारणपणे चार ते आठ दिवस असतो. वासरे दुय्यम संसर्गास बळी पडू शकतात. यात द्रवपदार्थ रोगचिकित्सा पद्धती (ईलेक्ट्रोलाईट थेरपी) उपयुक्त ठरते.

    रोगनिदान

  • योग्य निदानाच्या पद्धतीचा अवलंब, रोगप्रतिबंध व नियंत्रणास आवश्यक आहे. रोगाची विकसित लक्षणे हे रोटा वायरस विषाणूजन्य संसर्गाचे निदान करण्यास महत्त्वाचे ठरते.
  • रोगाचा नमुना घेणे आवश्यक आहे. रोगनिदानासाठी प्रयोगशाळेत अनेक तंत्राचा वापर केला जातो, त्यासाठी खालील चाचण्या उपयुक्त ठरतात.
  • एलायझा या चाचणीद्वारे जास्तीत जास्त नमुने जलदरीत्या तपासले जाऊ शकतात. ही चाचणी रोगाची ओळख करून घेण्यास महत्त्वपूर्ण ठरते.

    साखळी शृंखला अभिक्रिया ही चाचणी संसर्गाच्या सुरवातीच्या काळात त्वरित निदान करण्यास करणीभूत ठरते. या चाचणीकरीता अत्याधुनिक उपकरणाची आवश्यकता असते.

    रोगप्रतिबंध प्रादुर्भाव झालेलेल्या वासरांना इतर जनावरांपासून त्वरीत वेगळे करावे.

  • सर्व वासरांना स्वच्छ, निर्जंतुक व कोरड्या जागी ठेवणे तसेच मुबलक प्रमाणात निर्जंतुक, स्वच्छ पाणी द्यावे.
  • द्रवपदार्थ रोगचिकित्सा पद्धतीचा (इलेक्ट्रोलाईट थेरपीचा) अवलंब करावा. वासरे द्रवपदार्थ रोगचिकित्सा पद्धतीस प्रतिसाद देत नसेल तर प्रतिजैविकांचा वापर करावा, जेणेकरून दुय्यम संसर्गजन्यास कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंना अटकाव घालता येइल.
  • वेळापत्रकानुसार लसीकरण करून घ्यावे.
  • नवजात वासरांना विषाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून वासरांना चिकयुक्त दुधाचा म्हणजे आईचे प्रथम दूध द्यावे. या दुधातील प्रतिजैविके रोटावायरसपासून वासरांना संरक्षित करतात, वासरांची प्रतिकारशक्ती वाढवीतात.
  • लसीकरण केलेल्या मातेच्या चिकयुक्त दुधातून वासरांना रोगप्रतिकारशक्ती वाढून रोगास प्रतिबंध घालता येतो.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, इलेकट्रोलाईटची मात्रा द्यावी.
  • संपर्क ः शुभांगी वारके, ९५६१२१४३९५ (नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com