agriculture story in marathi, integratd nutrient managemat in suagrcane) | Page 2 ||| Agrowon

पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

डॉ. पी. एस. देशमुख, जे. पी. खराडे
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते.

ऊस शेतीसाठी खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य प्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

सेंद्रिय खत व्यवस्थापन

पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते.

ऊस शेतीसाठी खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य प्रकारे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

सेंद्रिय खत व्यवस्थापन

 • पूर्वहंगामी उसामध्ये पहिली फणपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर एकरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून रोटाव्हेटरच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.
 • ऊस लागणी अगोदर राहिलेले एकरी ५ टन शेणखत आणि रासायनिक खताचा पहिला हप्ता लागणीच्या सरीमध्ये मातीत मिसळावा. सेंिद्रय खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो.
 • शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंिद्रय पदार्थ मिसळता येतात.
 • हिरवळीची पिके वाढवून जमिनीत गाडणे हा सेंिद्रय खतांचा पुरवठा करणारा परिणामकारक पर्याय आहे. यामध्ये ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.

खते देण्याच्या वेळा

 • ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ ह्या प्रमुख वाढीच्या अवस्था आहेत. नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची वाढीच्या अवस्थेनुसार गरज लक्षात घेता उसासाठी चार वेळा खते विभागून देणे आवश्‍यक आहे.
 • मातीचे परीक्षण करून खतमात्रा ठरविणे व त्यानुसार देणे गरजेचे आहे
 • उसाची उगवण ते फुटवे येइपर्यंत उसास नत्राची गरज कमी असते तर उगवण, मुळांची वाढ व फुटव्यासाठी स्फुरद व पालाशची गरज जास्त असते.
 • ऊस लागण करताना एकूण शिफरशीत खतमात्रेपैकी १० टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद व ५० टक्के पालाश देणे फायदयाचे ठरते.
 • - फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्राची गरज जास्त असते म्हणुन ६ ते ८ आठवडयांनी ४० टक्के नत्राची मात्रा दयावी. जोमदार वाढीच्या अवस्थेच्या वेळी सर्वच अन्नद्रव्यांची गरज जास्त असते. म्हणून मोठ्या बांधणीच्या वेळी ४० टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद व ५० टक्के पालाशची खतमात्रा द्यावी.
 • - मोठ्या बांधणीनंतर रासायनिक खते देण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के जास्त म्हणजे १६० किलो नत्र, ७० किलो स्फुरद व ७० किलो पालाश प्रति हेक्टरी याप्रमाणे द्यावे.

गंधकाचा वापर
महाराष्ट्रातील ऊस जमिनीत गंधकाची कमतरता लक्षात घेता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. त्यासाठी ऊस लागवडीच्या वेळी हेक्टरी ६० किलो मुलद्रवी गंधक टाकावे. त्यामुळे ऊस उत्पादनात १० ते २४ आणि १५ ते ३० टक्के साखर उत्पादनात वाढ झालेली दिसून येते.

ऊस पिकासाठी सूक्ष्मअन्नद्रव्यांचे महत्त्व

 • - ऊस पिकासाठी जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे तेवढीच सुक्ष्मअन्नद्रव्यांची सुद्धा अवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मल्टिमायक्रोन्युट्रीयंट द्रवरूप खत तयार करण्यात येते. यामध्ये व्हीएसआय निर्मित मल्टिमायक्रोन्युट्रीयंट आणि मल्टिमॅक्रोन्युट्रीयंट या द्रवरूप खताची प्रत्येकी २ लिटर २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि ३ लिटर ३०० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ होते.
 • - उत्पादन वाढीसाठी संशोधनावर आधारित व्हीएसआय मायक्रोसोल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घनरून खत तयार केले आहे. हे खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे आणि सेंिद्रय आम्लयुक्त असल्यामुळे ठिबक सिंचनाद्वारे तसेच जमिनीतून देण्यास उपयुक्त आहे.
 • - एकरी १० किलो व्हीएसआय मायक्रोसोलची मात्रा द्यावी. हे विद्राव्य खत दोन पध्दतीने देता येते. ठिबक संचाद्वारे प्रत्येकवेळी एकरी २.५ किलो १०० लिटर पाण्यात विरघळून लागणीच्या वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी असे चार वेळा सोडावे. किंवा ठिबक संच नसल्यास शेणखतात किंवा कंपोस्ट खतात मिसळून लागणीच्या वेळी एकरी ५ किलो आणि ऊस बांधणीच्या वेळी ५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे.
 • जिवाणू खतांचा वापर
 • - जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता शाश्‍वत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. घनरुप व द्रवरूप खतांची तुलना करता द्रवरूप जिवाणु खते अनेक बाबतीत सरस असतात. त्यामुळे जिवाणू खते द्रवरुप स्वरुपात तयार करणे व त्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
 • - वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या द्रवरूप जिवाणू खतांच्या संशोधनावर आधारित संस्थेने वेगवेगळी द्रवरुप जिवाणू खते मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची पध्दत विकसित केलेली आहे.
 • खते देण्याच्या पद्धती व काळजी
 • - रासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खते देण्याच्या अवजारांच्या सहाय्याने घालावीत.
 • - उभ्या पिकात खते देतांना जमिनीत थोडासा ओलावा म्हणजे वापसा असावा.
 • - रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये शक्यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे.
 • - स्फुरदयुक्त खते मुळांच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. हेक्टरी २.५ किलो द्रवरूप स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू खतांचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
 • - पालाशयुक्त खते सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्यतो ही खते नत्रयुक्त खतांबरोबर दिल्यास नत्राच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.
 • पूर्वहंगामी ऊस वाढीच्या अवस्थेप्रमाणे सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास ऊस व साखर उत्पादन वाढीबरोबर जमिनीचे गुणधर्मही सुधारण्यास मदत होते.

संपर्क ः डॉ. पी. एस. देशमुख, ९९२१५४६८३१
(शास्त्रज्ञ, मृदा शास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु.), पुणे)


इतर नगदी पिके
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
थंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...
कांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...
ऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्राबगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये...
मशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन खोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये...
रुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....
तंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...फेब्रुवारी पूर्वी तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा....
गुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
कापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोकाचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी...
पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे...
तंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी...
तंत्र ऊस खोडवा व्यवस्थापनाचे...ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
उसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापरपिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे...
ऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म...साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते,...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...