Agriculture story in marathi integrated farming by chaval family from Moregaon taluka selu district Parbhani | Agrowon

एकात्मिक शेतीला मिळाले एकीचे बळ

माणिक रासवे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

परभणी जिल्ह्यातील मोरेगाव (ता. सेलू) येथील चव्हाळ कुटुंबीयांनी एकीच्या बळावर आपली शेती ३ एकरपासून २०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रापर्यंत विस्तारली आहे. हंगामी पिकांसोबत भाजीपाला, मसाला पिके यांना फळपिकांची जोड दिली आहे. पूरक उत्पन्नासाठी दुग्धव्यवसायामध्ये गाय, म्हैस आणि शेळीपालन, गावरान कोंबडीपालन करतात. वर्षातील बाराही महिने उत्पन्न मिळत राहील असे नियोजन केले जाते. एकात्मिक शेती पद्धतीमुळे जोखीम कमी करण्यात यश आले आहे. हॉटेल, कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातून कुटुंबाच्या अर्थकारणाला बळकटी मिळत आहे.

परभणी जिल्ह्यातील मोरेगाव (ता. सेलू) येथील चव्हाळ कुटुंबीयांनी एकीच्या बळावर आपली शेती ३ एकरपासून २०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रापर्यंत विस्तारली आहे. हंगामी पिकांसोबत भाजीपाला, मसाला पिके यांना फळपिकांची जोड दिली आहे. पूरक उत्पन्नासाठी दुग्धव्यवसायामध्ये गाय, म्हैस आणि शेळीपालन, गावरान कोंबडीपालन करतात. वर्षातील बाराही महिने उत्पन्न मिळत राहील असे नियोजन केले जाते. एकात्मिक शेती पद्धतीमुळे जोखीम कमी करण्यात यश आले आहे. हॉटेल, कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातून कुटुंबाच्या अर्थकारणाला बळकटी मिळत आहे.

मूळ पाटोदा येथील बापुराव खेमाजी चव्हाळ यांना ओमप्रकाश, शिवाजी, भगवान, किशोर, प्रल्हाद ही पाच मुले. वडिलोपार्जित ३ एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह करण्यामध्ये अडचणी असल्याने त्यांना मजुरी करावी लागे. शेतमजुरी, बटई- ठोक्याने घेत सुमारे १५ ते १६ वर्षे शेती केली. त्यातून शिल्लक बाजूला टाकत १९५६-५७ मध्ये मोरेगाव येथे ६ एकर शेती खरेदी केली. भाजीपाला पिकांची लागवड आणि स्वतः सेलू, वालूर येथील आठवडे बाजारात विक्री यांचे गणित बसवले. काटकसरीतून रक्कम शिल्लक ठेवत टप्प्याटप्प्याने शेती खरेदी करत गेले. सध्या चव्हाळ कुटुंबीयांची मोरेगाव, हातनूर, रायपूर, सोनवटी, ब्राम्हणगाव, पाटोदा या सहा गावांच्या शिवारात एकूण २१० एकर शेती आहे.
बापुराव चव्हाळ यांनी १९६८ मध्ये दीड एकर क्षेत्रावर अनाबेशाही जातीच्या द्राक्षाची लागवड केली. पुढे त्याचा सहा एकरपर्यंत विस्तार केला. एकरी १५ ते १६ टन द्राक्ष उत्पादन घेऊन बॉक्समध्ये पॅकिंग करून नागपूर येथील बाजारपेठेत विक्री केली. १९९० नंतर त्यांनी द्राक्ष उत्पादन घेणे बंद केले. त्याऐवजी अन्य फळ पिकांचे क्षेत्र वाढवले. मोसंबीची ३९ एकरवर लागवड केली.

विविध पुरस्काराने सन्मानित

 • कृषिक्षेत्रातील या उत्कृष्ट कामगिरीबद्दल १९८० मध्ये राज्यपाल सादिक अली यांच्या हस्ते शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • १९८४ मध्ये वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • दुग्धव्यवसायातील उल्लेखणीय कामगिरीबद्दल त्यांना गोपाल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महिनावार पीक नियोजन ः

 • जून, जुलै ः खरिप पिकांची पेरणी, हळद, आले आणि भाजीपाला पिकांची लागवड.
 • ऑगस्ट ः टोमॅटो, मिरची, फ्लाॅवर आदीचे उत्पादन सुरू होते.
 • सप्टेंबर ः मूग, उडिदाची काढणी. ऑक्टोबर ः सोयाबीन काढणी, कापूस वेचणीसोबतच सीताफळ काढणी.
 • नोव्हेंबर-डिसेंबर ः पेरू आणि पपईचे उत्पादन सुरू.
 • जानेवारी ः दिलपसंद, खरबूज, टरबूज आदी वेलवर्गीय फळांची लागवड.
 • फेब्रुवारी ः नवीन पपई लागवड आणि हळद काढणीस सुरुवात.
 • मार्च ः दिलपसंद आणि टरबूज उत्पादन सुरू.
 • एप्रिल - मे ः पेरणीपूर्व मशागतीचा हंगाम. जिरायती जमिनीला विश्रांती.

पीक नियोजन ः
दरवर्षी ७० ते ८० एकर सोयाबीन, कापूस ३० ते ३५ एकर, मूग ३० एकर तसेच उडिद, तूर, रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. सागाची ४० त ५० एकरवर लागवड आहे. धुऱ्यावर १५० ते २०० प्रकारची झाडे लावलेली आहेत.

भाजीपाला व हंगामी पिकांचे उत्पादन ः
खेळत्या उत्पन्नासाठी भाजीपाला पिकांवर चव्हाळ बंधूचा सुरुवातीपासूनच भर आहे. सध्या हंगामी भाजीपाला पिकांसह टोमॅटो एक ते दीड एकर, मिरची २ एकर, काकडी, दिलपसंद, फ्लाॅवर, कारले, पारसा दोडका आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सेलू, परभणी, मंठा येथील बाजारपेठेत दररोज टोमॅटो, मिरची पाठवतात. शेडनेटमध्येही ढोबळी मिरची उत्पादन घेतले जाते. दसरा, दिवाळी सणानिमित्त मागणीप्रमाणे झेंडू लागवडीचे नियोजन असते.

पूरक व्यवसाय ः
१९८८ मध्ये जर्सी, एचएफ जातीच्या संकरित गायी खरेदी करत दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. दररोज २०० ते २२५ लिटर दूध असे. सध्या त्यांच्याकडे १० म्हशी आणि ५ गायी असून, दररोज सरासरी शंभर लीटर दूध मिळते.

 • शेतीसाठी सहा बैलजोड्या आहेत.
 • शेळीपालन व्यवसायात सध्या ४० उस्मानाबादी शेळ्या आहेत.
 • गावरान जातीच्या ४० कोंबड्यांचे पालन केले जात असून, अंडी व पक्षी विक्रीतून वरकड उत्पन्न हाती येते.
 • शेती कामासाठी आठ सालगडी आहेत. मशागत, पेरणीची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. त्यासाठी छोटा एक आणि मोठे तीन ट्रॅक्टर आहेत.

सिंचत्र स्त्रोतांचे बळकटीकरण ः
सिंचनासाठी २ किलोमीटरवरील दुधना नदीपासून पाणी लिफ्ट केले आहे. एकूण ९ विहिरी आणि प्लॅस्टिकचे अस्तरिकरणासह दोन कोटी लिटर साठवण क्षमतेची दोन शेततळी केली आहेत. एकूण ४० एकर क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करतात.

बिगर हंगामी - हंगामी टरबूज ः
दरवर्षी जुलै महिन्यात ३ ते ४ एकरवर बिगर हंगामी टरबुजाचे लागवड करतात. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये उत्पादन सुरू होते. एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळते. व्यापाऱ्यामार्फत जयपूर बाजारपेठेमध्ये विक्री होते. बिगरहंगामी टरबुजाला ग्राहकांची चांगली मागणी असल्यामुळे सरासरी ८ ते १० रुपये प्रति किलो दर मिळतो. हंगामी टरबुजाचीही २ ते ३ एकरवर लागवड असते.

शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग ः

 • चव्हाळ बंधूनी फळ पिकांचे विविध प्रयोग केले. द्राक्ष, डाळिंब, मोसंबी पिकांचे उत्पादन घेतले.
 • १९८३ मध्ये सीताफळाच्या बाळानगर जातीची लागवड सात एकरवर केली. एकरी ८० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. सुरुवातीला टोकरी पॅकिंग नंतर बॅाक्स पॅकिंग करून ‘सावित्री गार्डन’ या नावाने विक्री करतात. अगदी अकोल्यापासून अमृतसरपर्यंत सीताफळे पाठविली जातात. सरासरी १०० ते १५० रुपये डझन (२५ ते ३० रुपये किलो) दर मिळतात.
 • पेरू (जी-विलास) ची सघन पद्धतीने ८ बाय ६ फूट अंतरावर लागवड केली असून, एकरी १० टनापर्यंत उत्पादन मिळते. सरासरी १२ ते २० रुपये प्रतिकिलो दर मिळतात.
 • पाच एकर क्षेत्रामध्ये पपईची आठ बाय ५ फूट अंतरावर लागवड आहे. एकरी ६० ते ६५ टन उत्पादन मिळते. व्यापाऱ्यामार्फत जम्मू, दिल्ली येथील बाजारपेठेत पपई पाठवतात. सरासरी ८ रुपये प्रतिकिलोला दर मिळतात.
 • मोसंबीची २ एकर आणि लिंबू २ एकरवर नवीन लागवड केली आहे..

आले, हळदीमध्ये सातत्य ः

 • आल्याच्या माहीम या वाणाचे गेल्या १२ ते १३ वर्षांपासून उत्पादन घेतात. दरवर्षी आल्याची सुमारे सात एकरवर लागवड असते. जानेवारी ते मार्च या कालावधीत आले काढणी केली जाते. एकरी ८० ते १२० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. प्रतिक्विंटलला सरासरी ५००० ते ६००० रुपये दर मिळतात.
 • हळदीची १० एकरवर लागवड असते. वाळलेल्या हळदीचे ३० त ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. प्रतिक्विंटलला ५ ते ७ हजार रुपयापर्यंत दर मिळतात.

एकत्र कुटुंबात कामाची विभागणी ः
चव्हाळ यांचे एकत्रित कुटूंब असून, त्यात ३० सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याकडे वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. ओमप्रकाश, शिवाजी, भगवानराव, किशोर या चार बंधू शेतीचे नियोजन, व्यवस्थापन पाहतात. प्रल्हाद यांचा सेलू येथे हॅाटेल व्यवसाय आहे. हॉटेलसाठी घरच्या गायी म्हशीचे दररोज निघणारे सरासरी शंभर लिटर दूध वापरले जाते. शेती व व्यवसायातील निर्णय सर्वानुमते घेतले जातात.

नवी पिढी शेतीपूरक व्यवसायात ः

 • चव्हाळ कुटुंबीयाची ज्ञानेश्वर, रामेश्वर, शाम हे शेतीतील व्यवस्थापन तसेच भाजीपाला विक्रीची बाजू सांभाळतात.
 • प्रभाकर चव्हाळ यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून एम.एस्सी (एबीएम) केले आहे. त्यांनी काही काळ एका कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर सध्या सेलू येथे कृषी निविष्ठा विक्री व सल्ला केंद्र सुरू केले आहे.
 • श्रीनिवास ओमप्रकाश चव्हाळ यांनी म्हैसूर येथून बी. टेक. एमबीए केले असून, सध्या पुणे येथील अन्नप्रकिया उद्योगामध्ये नोकरी करतात. अलीकडे ते प्रवाशी वाहतूक सेवेतदेखील उतरले आहेत. खर्च वजा जाता शेती व पूरक व्यवसायातून वर्षाकाठी सरासरी एक कोटी रुपयापर्यंत उत्पन्न मिळते.

ओेमप्रकाश चव्हाळ ः ८४८२८८३३३३
प्रभाकर चव्हाळ ः ८४८३८८३३३३  


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
रिक्त पदे तत्काळ भरारिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या कामांचा बोजवारा...
आरोग्यमय जीवनासाठी फळे-भाज्यांचे सेवन...संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४...
मागील वर्ष ठरले आजवरचे सर्वाधिक उष्णपुणे : कोरोनाचे संकट, बर्ड फ्लूची साथ आणि शेतकरी...
शेतकरी पुत्राने बनवले वाहन ऊस भरणी यंत्रसातारा : सध्या ऊस हंगामातील सर्वात मोठी समस्या...
मध्य महाराष्ट्रात थंडी; निफाडला नीचांकी...पुणे : राज्यातील किमान तापमानात चढउतार होत आहे....
गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारेऔरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (...
तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके मैं...लासूर (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील निवृत्त सैनिक...
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...