agriculture story in marathi, integrated farming, progressive farming in drought, shirur kasar, beed | Agrowon

ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद जागवली 
सूर्यकांत नेटके
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

दुष्काळात हार मानू नये...
अर्जून सांगतात की पर्याय नसल्याने ऊसतोडणीचा व्यवसाय पंचवीस वर्षे केला. आई वडिलांनीही देखील हेच कष्ट उपसले. पण अखेर यातून किती काळ निभावणार, असा प्रश्न सतत पडायचा. कुक्कूटपालनाने खरंच दिशा आणि उमेद दिली. आता पूर्णवेळ शेतकरी झालो आहे याचे समाधान वाटते आहे.  कोणत्याच शेतकऱ्याने उमेद हरवू नये. दुष्काळात हार मानू नये. धडपड सुरू ठेवावी. यश नक्कीच येईल.  

शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील स्थिती यंदा फारच गंभीर आहे. तालुक्‍यातील वारणी येथील अर्जुन केदार यांना आपल्या तीस गुंठे क्षेत्रात जीवावरची कसरत करावी लागत आहे. पंचवीस वर्षे ऊसतोडणीचे काम केलेले केदार मोठ्या जिद्दीने पूर्णवेळ शेती करताहेत. त्यात नवे घडवण्याचा प्रयत्न आहे. भाजीपाला शेती पाण्याअभावी थांबली असली तरी जिद्दीने कुक्कूटपालन, शेळीपालन करीत त्यांनी 
शेतीत नवी उमेद मात्र जपली आहे. 

नगर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या पाथर्डी तालुक्‍याला जोडून बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका आहे. सिंचनाचा अभाव असल्याने येथील शेती पाण्याच्या भरवश्‍यावर असते. त्यामुळे या भागातील बहूतांश शेतकरी कुटूंबे ऊसतोडणीचे काम करतात. तालुक्यातील वारणी येथील अर्जुन नामदेव केदार यांनादेखील नाईलाजास्तव तब्बल पंचवीस वर्षे ऊसतोडणीचे काम करावे लागले. मात्र त्यातून आयुष्य स्थिर नव्हते. खडतर कष्ट होते, पण त्या मानाने आर्थिक परतावा काहीच नव्हता. अखेर तीन वर्षांपूर्वी पूर्णवेळ शेतकरी होऊन स्वतःच्याच ३० गुंठ्यांतून चांगल्या उत्पन्नाची हमी मिळवावी असे त्यांनी ठरवले. 

शेतीतील उमेद वाढली 
उसतोडणीचे काम सुरूच असताना २००५ मध्ये पाचशे कोंबडीपालन क्षमता असलेले शेड त्यांनी बांधले होते. त्यासाठी बैल विकून भांडवल उभे केले. तीनशे देशी कोंबड्यांचे पालन सुरू केले. कोंबडी विक्रीतून पस्तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. शेतीतील उमेद त्यातून वाढली. 

धडपड सुरूच राहिली 
कोंबडीपालनाचा व्यवसाय तब्बल दहा वर्षे सुरूच राहिला. त्या काळात भाकड म्हशींचे संगोपन करून त्या गाभण राहिल्या की विकायच्या, असा व्यवसाय सुरू केला. शेडमध्ये कोंबड्यांची पैदास व विक्रीही सुरू होतीच. 

संघर्षातून नव्या शेडची उभारणी 
साधारण २०१५ च्या सुमारास ऊसतोडणी व्यवसाय थांबवला. मात्र त्या वर्षी पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून एकहजार पक्षी क्षमतेच्या शेड उभारणीसाठी अनुदान मिळाले. त्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून शेड बांधले. जरी अनुदान मिळाले तरीही पुरेसे भांडवल नसल्याने त्यावर्षी बैल विक्री करून ५२ हजार रुपये उभे करावे लागले. उर्वरित भांडवलासाठी पुन्हा ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धडपड करत नव्या शेडची उभारणी केली. 

पूरक व्यवसायांची जोड 
अर्जुन यांच्या कुटूंबात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. सगळे मिळून आज शेतीला हातभार लावतात. तीस गुंठ्यांत शेती, कोंबडीपालन व शेळीपालन असा पसारा उभा केला आहे. सुमारे पंधराशे लेअर पक्षी आहेत. महिन्याला सुमारे ४०० ते ५०० पक्षांपर्यंत विक्री होते. त्यातून सुमारे १० हजार रुपयांचा मोठा आधार मिळतो. बहुतांश विक्री बांधावरच होत असल्याने त्यासाठी स्वतंत्र कोठे जावे लागत नाही. 

शेळीपालनाची जोड 
सध्या सात ते आठ शेळ्या आहेत. शक्यतो बोकडाची तीनशे रुपये प्रति किलो दराने विक्री होते. 
कोंबडीपालनाला या व्यवसायाची जोड मिळाल्याने उत्पन्नातही वाढ झाली आहे. 

भाजीपाला शेती संकटात 
साधारण १५ गुंठे टोमॅटो, १० गुंठे मिरची असे क्षेत्र असते. सातही दिवस दररोज बाजारात स्वतः बसून थेट विक्री करण्याचे कष्ट अर्जून उचलतात. त्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढते. दररोज सुमारे एकहजार ते पंधराशे रुपयांचे एकूण उत्पन्न मिळते. मात्र यंदा पाऊस जवळपास झालाच नाही. त्यामुळे पाणीच नाही. अशावेळी भाजीपाला शेती थांबवली असल्याचे अर्जून यांनी सांगितले. कोंबडी व शेळीपालन शेडच वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यासाठी विंधन विहीर खोदली आहे. पाण्याचा वापर काटेकोर व्हावा म्हणून ठिबक सिंचनही केले आहे. दिलासादायक बाब म्हणजे कुक्कूटपालन व ऊसतोडणीतील उत्पन्नातून दहा गुंठे जमीन घेतली आहे. दहा गुंठ्यांवर शेळ्यांसाठी चारा लागवड केली आहे. 

आत्मविश्वास उंचावला 
अर्जून सांगतात की पर्याय नसल्याने ऊसतोडणीचा व्यवसाय पंचवीस वर्षे केला. आई वडिलांनीही देखील हेच कष्ट उपसले. पण अखेर यातून किती काळ निभावणार, असा प्रश्न सतत पडायचा. कुक्कूटपालनाने खरंच दिशा आणि उमेद दिली. आता पूर्णवेळ शेतकरी झालो आहे याचे समाधान वाटते आहे. भले उत्पन्न फार नसेल पण प्रयत्न सोडलेले नाहीत. कोणत्याच शेतकऱ्याने उमेद हरवू नये. दुष्काळात हार मानू नये. धडपड सुरू ठेवावी. यश नक्कीच येईल. मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता. मागील वर्षी शेततळे घेतले होते. मात्र अनुदानाची रक्कम मिळाली नाही. अस्तरीकरणासाठी पुरेसे भांडवल नाही. 
अशा परिस्थितीत पाण्याची शाश्‍वत सोय करणे शक्य नाही. तरीही चिकाटी कायम ठेवल्याचे अर्जून म्हणाले. 

केदार यांच्याकडून शिकण्यासारखे 

  • अल्प शिक्षण असूनही अभ्यास, धडपडीतून पूरक व्यवसाय केले उभे 
  • दुष्काळी भाग असला तरी उमेद कायम 
  • पाण्याचे काटेकोर नियोजन  

संपर्क- अर्जून केदार - ९७६७६०५१३२ 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...