agriculture story in marathi, integrated farming, Washim | Agrowon

सेवानिवृत्तीनंतर शेतीत नंदनवन फुलवण्याचा ध्यास 
गोपाल हागे
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

अॅग्रोवन बनला मार्गदर्शक 
नोकरीत असल्याने पिंजरकर यांना शेतीतील प्रत्यक्ष अनुभव कमी होता. पण अॅग्रोवन  तज्ज्ञ मित्रासारखा धावून आला. भेडसावणाऱ्या प्रत्येक शंकेचे उत्तर अॅग्रोवनद्वारे मिळाल्याचे पिंजरकर सांगतात. अनेक उपयुक्त माहितींचे कात्रण व्यवस्थित काढून वहीत त्यांचा संग्रह केला आहे. 
 

नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतरचा काळ जीवन आरामदायी व्यतीत करण्याचा असतो. वाशीम येथील आनंदराव पिंजरकरही सेवानिवृत्त झाले. पण मनात शेतीची आवड खोलवर रूतून बसलेली. मग आपली नऊ एकर पडीक जमीन कसायली घेतली. त्याच क्षेत्रावर जिद्दीने सहा वर्षांत अॅपलबेर, गुलाब, डाळिंब, केशर आंबा अादींच्या विविधतेतून नंदनवन फुलवले. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि सकारात्मक वृत्तीचा आदर्शच त्यांनी उभा केला आहे. 
 
वाशीम येथील आनंदराव पिंजरकर सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. सन २०१३ मध्ये बुलडाणा येथे विभागीय भांडारपाल म्हणून ते सेवानिवृत्त झाले. वाशीम जिल्ह्यात त्यांचे दोन भाऊ राहतात. वाशीम शहराला लागून पिंजरकर यांची जमीन आहे. नोकरीतील व्यस्त कामांमुळे ती पडीकच राहिली. पण, पिंजरकर यांना शेतीचा पूर्वानुभव होता. आवडही होती. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या काळात पूर्ण लक्ष शेतीतच द्यायचे ठरवले. त्यानुसार काळी माती टाकून संपूर्ण शेतीला तारांचे कुंपण केले. 

पिकांच्या विविधतेवर भर 
पारंपरिक पिकांपेक्षा शेतीत नवे काही करायचे ठरवले होते. त्यानुसार पीकपद्धतीचा आराखडा तयार केला. त्यानुसार डाळिंब (दोन एकर), आंबा (३५ गुंठे), गुलाब (सुमारे ५ गुंठे), अॅपल बेर (३० गुंठे), शेवगा ( ७० झाडे बांधावर) अशा विविध फळ-फूल पिकांची लागवड केली. 

अॅपल बेर उत्पादन 
या पिकाची १२ बाय ९ फूट अंतरावर लागवड केली आहे. त्यातून आत्तापर्यंत दोन वर्षे उत्पादन घेतले आहेत. प्रत्येक वर्षी सुमारे एक लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सरासरी ३० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. यंदाच्या तिसऱ्या वर्षी झाडांवर भरपूर फळे लगडली असून चांगले उत्पन्न हाती येईल असे पिंजरकर म्हणाले. 

गुलाबातून ताजे उत्पन्न 
सहा बाय पाच फुटांवर गुलाबाची २५० झाडे लावली होती. मागणीनुसार पुरवठा अपुरा पडू लागल्याने ५० नव्या झाडांची लागवड वाढवली आहे. सध्या दररोज ३०० ते ४०० फुलांचे उत्पादन मिळते. वाशीम शहरात एका फूल विक्रेत्यासोबत तीन रुपये प्रतिनग असा दर निश्चित करून घेतला आहे. त्यामुळे वेगळी बाजारपेठ शोधण्याची गरज भासली नाही. या पिकातून दररोज ताजे उत्पन्न हाती येते. त्यातून दैनंदिन खर्चाला मदत होते. 

पिकांची विविधता 
बांधावर असलेल्या शेवग्यानेही मागील वर्षी किलोला ५० ते ६० रुपये दराने ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न दिले आहे. केशर आंब्याच्या १२ बाय १२ फुटांवर असलेल्या बागेतूनही लवकरच उत्पादन सुरू होणार आहे. चांगले व्यवस्थापन करीत असल्याने झाडांची योग्य वाढ झाली आहे. या बागेत आंतरपिकेही घेतली जातात. यातील भुईमुगाच्या काढणीचे काम सुरू होणार असून ३५ गुंठ्यात सुमारे १० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. सीताफळ, द्राक्ष, चिकू, करवंद आदींचीही लागवड केली अाहे. आगामी काळात सर्वच झाडांपासून मिळकत सुरू होईल. पारंपरिक शेतीत सोयाबीन, तूर आहे. दोन विहिरी व ठिबक या आधारे संपूर्ण शेतीला पाणी दिले जाते. सध्या पुरेसे पाणी उपलब्ध आहे. तरीही गरज भासल्यास शेतापासून काही अंतरावर पाण्याच्या उपलब्धतेसाठी क्षेत्र घेतले आहे. तेथे विहिरी खोदून पाणी उपलब्ध करण्याचा विचार आहे. 

प्रत्येक गोष्टीची नोंद 
शेतीत यशस्वी व्हायचे असेल तर त्याकडे व्यावसायिक पद्धतीने बघावे लागेल. हाच दृष्टीकोन पिंजरकर यांनी स्वतःसमोर ठेवला. लागवड केलेल्या प्रत्येक पिकाची पहिल्या दिवसापासूनची नोंद त्यांनी वहीत केली आहे. खते, फवारण्या, मिळालेले उत्पादन आदी सर्व बाबींचा सारा तपशील तारीखनिहाय त्यांच्याकडे पाहण्यास मिळतो. कोणताही संदर्भ लागल्यास त्यांना तो त्वरित मिळतो. पिंजरकर यांनी शेतातच घर उभारले आहे. कुटुंबीयांसमवेत ते येथेच राहतात. अगदी सकाळीच त्यांचा दिनक्रम शेतातील कामांमधूनच सुरू होतो. शेतात चौफेर फिरून कुठले काम करायचे, काय समस्या आहे हे कळते. त्यानुसार व्यवस्थापन केले जाते. अगदी सायंकाळपर्यंत ते शेतीकामांमध्येच व्यस्त असतात. गरजेनुसार बाहेरून मजूर मागवले जातात. कामांमुळे स्वास्थही चांगले राहत असून तेच खरे औषध असल्याचे ते म्हणतात. 

संपर्क- आनंदराव पिंजरकर-७०३८८३४००८

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत मिश्र पिके घ्याः...पुणे ः यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती,...
पावसाअभावी राज्यातील पाणीटंचाई हटेनापुणे : जुलै महिना संपत आला तरी जोरदार पावसाअभावी...
चारा छावण्यांमध्ये जनावरांची वैद्यकीय...सांगली ः जिल्ह्यात ३८ छावण्यांत ४४ हजार ९७७ लहान...
बाजार समित्यांमधील शेतमालाच्या रोखीच्या...पुणे ः बाजार समित्यांमधील शेतमाल विक्री...
कापूस आयातीने मोडले विक्रमजळगाव ः चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा परिणाम...
कोरडवाहू शेतीत रुजला खजूरमाळेगाव हवेली (ता. संगमनेर, जि. नगर) येथील...
आंध्रमध्ये स्थानिकांना कंपन्यांमध्ये ७५...विजयवाडा, आंध्र प्रदेशः आंध्र प्रदेश सरकारने...
रत्नागिरीत मुसळधार पाऊसरत्नागिरी: मुसळधार पावसाने रत्नागिरीत कहर केला...
सुतार यांनी तयार केला दर्जेदार हळद...सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथील प्रकाश परशुराम...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची...पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
नदी वाहती ठेवणे हा खरा जल आशीर्वाद‘नांगरणे’ हा शब्द शेतीशी जोडलेला आहे. उन्हाळ्यात...
रोगनिदान झाले, पण उपचार कधी?चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत राज्यात सुमारे...
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...