Agriculture story in marathi Intestinal Diseases in Cattle | Agrowon

बैलातील आतडे बंद होण्याची समस्या

डॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

उन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना विशेषतः आतडे बंद होण्याची समस्या होते. या रोगात जनावरांना वेदना तर होतातच; परंतु उपचारास उशीर झाला तर आतडे खराब होऊन जनावर दगावू शकते. म्हणून या रोगाविषयी पशुपालकांना माहिती असणे आवश्यक आहे.
 

उन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना विशेषतः आतडे बंद होण्याची समस्या होते. या रोगात जनावरांना वेदना तर होतातच; परंतु उपचारास उशीर झाला तर आतडे खराब होऊन जनावर दगावू शकते. म्हणून या रोगाविषयी पशुपालकांना माहिती असणे आवश्यक आहे.
 
जनावरांना बरेच आजार होतात. यात प्रामुख्याने पचनसंस्थेच्या आजारांचा समावेश होतो. आतडे बंद झाल्यावर जनावर खाणे कमी करते. जनावरास कळ येते व पोटात वेदना होतात. या वेदनेत जनावर करकर दात खाते, पोटावर लाथा झाडते. ही समस्या टाळण्यासाठी जनावराला अखाद्य वस्तू खाऊ देऊ नयेत. जनावरास जुलाब असतील किंवा पोटात जंत असतील तर पशुवैद्यकाकडून तात्काळ उपाय करावा.

रोगाची करणे

 • आतडे बंद होणे म्हणजे कोणत्याही कारणाने आतड्यातील विष्ठा पुढे जाणे थांबणे होय. आतड्यास पीळ पडणे, आतडे एकात एक जाणे, गुंतणे यामुळेही आतडे बंद होऊ शकतात.
 • सर्वसाधारणपणे शेतात काम देऊन झाल्यावर एकदम थंड पाणी किंवा भरपूर अन्न देणे यामुळे आतडे गुंतू शकते.
 • जनावरास लागणारी हगवण यामुळे आतड्यातील हालचाली वाढतात व आतडे एकात एक जाते व गुंतते.
 • जनावर लोळणे किंवा उडी मारणे यामुळे आतड्याला पीळ पडू शकतो व आतडे गुंतते.
 • आतड्यात एखादी वस्तू उदा. कपडा, प्लॅस्टिक, विष्ठा घट्ट होऊन बसणे यामुळे आतडे गुंतते
 • भरपूर प्रमाणात जंताचा प्रादुर्भाव झाल्यामुळेही आतडे बंद होते.
 • जनावराने स्वत:चे चाटलेले केस किंवा वाळलेल्या गवताचा गोल आकाराचा चेंडू होऊन आतड्यात अडकू शकतो व आतडे बंद होते.
 • जनावराच्या आतड्यास मार लागणे, आतड्यावरील ताण, प्रमाणापेक्षा भरपूर खुराक देणे यांमुळेही आतडे बंद होऊ शकते.
 • आतड्यावर बाहेरून गळू, कर्करोग याचा दाब पडल्यामुळे आतडे इतर भागात चिकटणे व अंतर्गळासारख्या रोगातही आतडे बंद होऊ शकते.

लक्षणे

 • आतडे बंद झाल्यावर जनावर खाणे कमी करते.
 • जनावरास कळ येते व पोटात वेदना होतात या वेदनेत जनावर करकर दात खाते, पोटावर लाथा झाडते.
 • जनावर पाठ ताणते, उठबस करते किंवा जमिनीवर लोळते.
 • जनावर सतत लघवी करते.
 • जनावर सतत शेण टाकण्याचा प्रयत्न करते पण शेण पडत नाही.
 • जनावराचे शेण टाकणे संपूर्णपणे बंद होते.
 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
 • डोळे खोल जातात व अशक्तपणा येतो.
 • जनावर शेण टाकण्याऐवजी चिकट पदार्थ टाकते हा चिकट पदार्थ रक्तमिश्रित असू शकतो

उपचार

 • पशुवैद्यकाकडून बंद आतड्यावर शस्त्रक्रियेने निश्चितपणे खात्रीशीर उपाय करता येतो. यासाठी उजव्या भकाळीवर छेद घेऊन आतडे बाहेर काढतात व बंद आतड्यातील वस्तू काढून टाकतात किंवा रोगी आतड्याचा भाग कापून आतडे एकमेकांना जोडून लवकर शस्त्रक्रिया करून घेतली तर जनावर वाचू शकते.
 • उपचारास विलंब झाला तर आतडे फुटून जाते व जनावर दगावण्याची शक्यता असते. यामुळे शस्त्रक्रियेचा निर्णय लवकर घेणे आवश्यक ठरते. शस्त्रक्रियेनंतर १२ ते १४ दिवसांत जनावर पूर्णपणे बरे होऊ शकते.
 • - जनावराच्या पोटात कोणत्याही प्रकारची कळ येत असल्याचे लक्षण दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकास संपर्क साधून उपचार करावा.

प्रतिबंध

 • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरास अखाद्य वस्तू खाऊ देऊ नयेत.
 • जनावरास जुलाब असतील किंवा पोटात जंत असतील तर पशुवैद्यकाकडून तात्काळ उपाय करावा.
 • बैलांना काम दिल्यावर लगेच भरपूर थंड पाणी किंवा खाद्य देऊ नये. ते अर्ध्या ते एक तासाने द्यावे.
 • जनावरास लोळू किंवा उडी मारू देऊ नये
 • - जनावराच्या खाद्यात एखादी अखाद्य वस्तू उदा. कपडा, प्लॅस्टिक जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 • जनावरास स्वत:चे केस चाटू देऊ नये
 • जनावराने अखाद्य वस्तू खाऊ नये म्हणून दररोज प्रत्येकी ५० ग्रॅम क्षार मिश्रणे खाद्यातून द्यावीत.
 • जनावराच्या पोटात वाळलेल्या गवताचा गोल आकाराचा चेंडू होऊ नये म्हणून जनावरास योग्य प्रमाणात ओले व वाळलेले गावत द्यावे व भरपूर पाणी पाजावे.
 • जनावराच्या आतड्यास मार लागू देऊ नये.
 • जनावरास योग्य प्रमाणात खुराक द्यावा.
 • आतड्यावर बाहेरून गळू, कर्करोग याचा दाब, आतडे इतर भागात चिकटणे व अंतर्गळासारख्या रोगात तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करावा.

डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई) 


इतर कृषिपूरक
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज कमतरतेचा परिणाम जनावरांची वाढ तसेच प्रजनन...
सामूहिक प्रयत्नातूनच प्राणिजन्य आजारावर...जगातील सुमारे ७० टक्के आजार हे प्राणिजन्य आहेत,...