फणसाचा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापर

फणस
फणस

फणसाच्या गऱ्यांना शहरी बाजारपेठेत मागणी आहे. फणसापासून लोणचे, जॅम, मुरांबा, फणस पोळी, फणसाचे चिप्स या पदार्थांसोबतच पिकलेल्या फणसाचा वापर करून अनेक पाैष्टिक दुग्धजन्य पदार्थ घरच्याघरी तयार करता येतात.   फणसाचे प्रकार   फणसाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात १) कापा फणस   या जातीच्या फणसाचे गरे कोरडे, खुसखुशीत, गोड व चवीला उत्तम असतात. गराचा रंग पिवळा किंवा गडद केशरी असतो. या फणसाला बाजारात चांगली मागणी अाहे. या फणसापासून लोणची, जॅम, जेली, तळलेले गरे (चिप्स), साखरेच्या पाकात वाळवलेले गरे, गऱ्यांची पावडर, तसेच पेय तयार केले जाते. २) बरका फणस  या फणसाचे गरे मऊ असतात व ते रसाळ असून, त्यामध्ये तंतूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. गरांचा रंग पिवळसर पांढरा असतो व हे गरे जास्त काळ टिकत नाहीत. गरांचा उपयोग प्रामुख्याने फणसपोळी तयार करण्यासाठी केला जातो.

फणस हा कापायला खूप त्रासदायक असून, एक फणस कापण्यासाठी एक ते दीड तास लागतो. यासाठी कृषी प्रक्रिया विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी हस्तचलित व विद्युतचलित फणस कापणी यंत्र विकसित केली आहेत.

फणसाचे दुग्धजन्य प्रक्रियायुक्त पदार्थ  फणसातील पोषणमूल्यांचा विचार करून दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात फणसाचा दुगधजन्य पदार्थात वापर कसा करता येईल या बाबत संशोधन करून काही पदार्थांमध्ये फणस रसाचा वापर केला. फणस रसाचा उपयोग फक्त फणसपोळीकरिता होतो. मर्यादित मागणी असल्याने प्रक्रियायुक्त फणस रस सहजरित्या उपलब्ध होऊ शकत नाही. याकरिता या रसाचा उपयोग दुग्धजन्य पदार्थामध्ये केल्यास फणसरसाची मागणी वाढू शकते. 

 फणस श्रीखंड 

  • दही मलमलच्या कापडामध्ये बांधून ६ ते ८ तास टांगून ठेवावे त्यातील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर चक्का मिळेल. 
  • चक्क्यामध्ये ५० ते ७० टक्के बारीक केलेली साखर मिसळावी. (१ किलो चक्क्यासाठी ५०० ते ७०० ग्रॅम साखर हे प्रमाण चक्क्याच्या अाम्लतेनुसार कमी जास्त करावे.)
  • साखर अाणि चक्का चांगला एकजीव करून त्यामध्ये १५ टक्के फणस रस मिसळावा. 
  •  रसगुल्ला

  • गाईच्या दुधाचा छन्ना बनवून घ्यावा. छन्ना चांगला मळून घ्यावा.
  • छन्ना मळताना त्याला तेलकटपणा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्यामध्ये ८ ते १० टक्के फणसाचा रस मिसळावा.
  • छन्ना चांगला एकजीव करून त्याचे गोळे तयार करावेत.
  • गोळ्यांना तडे जात असल्यास त्यामध्ये थोडा (५ टक्के) मैदा मिसळावा.  
  • गोळे चांगले गुळगुळीत व तडा न गेलेले असावेत. 
  • एक लिटर पाण्यामध्ये २५० ग्रॅम साखर मिसळून पाक उकळावा. पाक उकळत असताना त्यामध्ये ३/४ चमचे दूध मिसळून पाकावर अालेला साका काढून टाकावा म्हणजे स्वच्छ पाक मिळू शकेल. 
  • उकळत्या पाकात छन्न्याचे गोळे सोडावेत. गोळे जास्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गोळे झाकण ठेवून पाकामध्ये शिजवून घ्यावेत.  
  • गोळे शिजताना त्यावर कायम पाक राहील याची काळजी घ्यावी, १० ते १५ मिनिटानंतर गोळे फुगलेले अढळून येतील. छन्ना चांगला मळून जर गोळे तयार केले असतील तर गोळ्यांना तडा जाणार नाही. गोळ्यांना पिवळसर रंग अाल्यानंतर गॅस बंद करावा. 
  • २० ते २५ मिनिटांत रसगुल्ले तयार होतील. एकतारी पाकामध्ये २ ते ३ तास शिजवलेले गोळे मुरवावेत.
  • संपर्क ः अजय गवळी, ८००७४४१७०२ (पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com