agriculture story in marathi, Jadhav family of Nasik Dist. have produced a ideal example of onion farming. | Agrowon

चाळीस एकरांत उत्कृष्ट कांदा शेतीचा आदर्श

मुकूंद पिंगळे
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

नाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील जाधव कुटुंबाने दर्जेदार कांदा उत्पादनात स्वतंत्र ओळख मिळवली आहे. सरासरी ४० एकरांवर ते कांदा घेतात. सप्टेंबरपासून रोपवाटिकेची सुरुवात होते.  

नाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील जाधव कुटुंबाने दर्जेदार कांदा उत्पादनात स्वतंत्र ओळख मिळवली आहे. सरासरी ४० एकरांवर ते कांदा घेतात. सप्टेंबरपासून रोपवाटिकेची सुरुवात होते. रब्बीत बीजोत्पादन करून बियाण्यात स्वयंपूर्णता आणली आहे. पुढे पुनर्लागवड व साठवणुकीपर्यंत कार्यक्रम राबवून एकरी २० ते ३० टनांची उत्पादकता त्यांनी मिळवली आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील नानाजी जाधव यांच्या वाट्याला वडिलोपार्जित अवघी अर्धा एकर जमीन आली. त्यामुळे कोथिंबीर खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला. शेती व व्यवसायातील उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी करीत ८० एकरांवर पोहोचवण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. कष्टातून ती बागायती केली आहे. मुरमाड क्षेत्रात माती पुनर्भरण करून त्यावर विविध पिके ते घेतात. प्रयोगशील शेतकरी म्हणून परिसरात ओळख निर्माण केली आहे. मुले रोहिदास व विकास शेतीची जबाबदारी समर्थ सांभाळतात.

कांदा व्यवस्थापन
सप्टेंबरदरम्यान रोपवाटिका, रब्बीत बीजोत्पादन, १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान पुनर्लागवड व मार्च- एप्रिलपर्यंत काढणी, साठवणूक व व विक्री असे कांदा शेतीचे नियोजन असते. घरच्या बियाण्यांचा वापर हे मुख्य सूत्र आहे. क्षेत्र वाढत गेले त्याप्रमाणे बीजोत्पादन क्षेत्रही वाढविले. गेल्या तीन वर्षांत सरासरी ४० एकर कांदा लागवड कायम ठेवली आहे.

ठळक बाबी

 • दर तीन वर्षांआड एकरी १० टन शेणखत तसेच ताग पेरणी. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो. त्यामुळेच काळ्या कसदार जमिनीत एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन घेण्यात यश मिळवले.
 • १५० ते २०० ग्रॅमपर्यंत कांदा वजन. यासाठी लागवड अंतर व पद्धत महत्त्वाची असते. गादीवाफ्यावर बियाणे फोकून रोपवाटिका तयार केल्याने पाण्याचा निचरा होऊन रोपांची मर कमी होते.
 • यात सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब.
 • स्थानिक साखर कारखान्याकडील मळीचे प्रक्रियायुक्त खत व राखेचा वापर.
 • एनएचआरडीएफ’ विकसित ‘रेड-३’ वाणाची संपूर्ण क्षेत्रावर लागवड. पुनर्लागवडपश्‍चात १२० ते १३० दिवसांनी काढणी. टिकवणक्षमता, लाल व हलका काशासारखा रंग. गोलाकार व पातळ मान अशी वाणांची प्रमुख वैशिष्ट्ये.
 • नोव्हेंबरमध्ये ७५ दिवसांची रोपे तयार झाल्यानंतर सपाट वाफ्यात सरीचे अंतर ६ इंच ठेवून पुनर्लागवड.
 • पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रात १२, तर जाड काळ्या जमिनीत ८ प्रवाही पद्धतीने पाणी.
 • १० एकरांत इनलाइन ठिबकवर चार फूट रुंद गादीवाफ्यावर लागवड
 • जमीन क्षारयुक्त होऊ नये यासाठी मर्यादित खते व तणनाशकांचा वापर. घरगुती बियाणे, त्यात स्वयंपूर्णता, एकत्रित मनुष्यबळ वापर. यातून खर्च कमी करण्याचा प्रयत्न.
 • सेंद्रिय कर्ब टिकण्यासाठी नत्राचे गुणोत्तर टिकविण्यावर भर
 • जमिनीतील बुरशी नियंत्रित करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर
 • हवामान, दव व पाऊस निरीक्षणे नोंदवून तातडीच्या फवारण्या

एकरी उत्पादन (टन)

 • २०१९...२०
 • २०२०...१६
 • २०२१...१२ (अवकाळी पाऊस व हवामानामुळे घट)

एकरी उत्पादन खर्च- किमान ३५ ते ४० हजार रु.

विक्री व्यवस्था
मागणीप्रमाणे १०, २० व ५० किलो पॅकिंग करून राजस्थान, तेलंगणा, गुजरात येथे जाऊन विक्री केल्याने दरात फायदा होतो. उर्वरित विक्री पिंपळगाव बसवंत येथे विक्री होते चांगली टिकवणक्षमता असल्याने प्रतवारीनुसार बाहेर थेट पुरवठा केल्यास दर चांगले मिळतात. रंग, आकार व टिकवणक्षमता, प्रतवारी हे महत्त्वाचे निकष असतात. मार्च ते जूनपर्यंत दर कमी तर जून ते ऑगस्टदरम्यान चांगले दर मिळतात. साठवलेल्या मालाची बाजारभाव स्थिती अभ्यासून विक्री होते.

मिळालेले दर  (रू.) (प्रति क्विंटल) 

वर्ष...किमान...कमाल...सरासरी
२०१९...२०००...५०००...८०००
२०२०...१५००...३०००....२५००
२०२१...१५००...२५००...२०००

जोखीम केली कमी
४० एकरांत कांदा असल्याने दर किंवा हवामानामुळे होणारे नुकसान मोठे असते. त्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी अन्य पिकांचे नियोजन केले. यात ऊस २५ एकर, पपई व मिरची व कांदा बिजोत्पादन प्रत्येकी चार एकरांत असते. चालू वर्षी पपईत ढेमशाचे आंतरपीक घेतले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये विक्री व्यवस्था अडचणीत सापडली.

कुटुंबाची उत्तर महाराष्ट्रात ओळख
नानाजींचा ४५ वर्षांपासून कोथिंबीर खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मार्च- ऑक्टोबर दरम्यान सरासरी ३० टन मालाची खरेदी विक्री ते करतात. रोहिदास बीई मेकॅनिकल आहेत. काही वर्षे नावाजलेल्या कंपन्यांत नोकरी करून ते पूर्णवेळ हा व्यवसाय व शेती सांभाळतात. नानाजी यांचा धाकटा मुलगा विकास, पत्नी शीलाबाई, सुना देवयानी व रुपाली, भाचे राजेंद्र गवळी, सुनील घरटे हे देखील शेती नियोजनात भाग घेतात. वर्षभर २०० मजुरांना रोजगार दिला आहे. रोहिदास यांना सकाळ माध्यम समूहातर्फे ‘भूमिपुत्र गौरव’, भारत विकास प्रबोधिनीचा ‘समाज गौरव’ तर नानाजी यांना गिरणा गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. कष्ट, जिद्द व नियोजनातून ओसाड जमिनीवर वैभव उभारल्याचा कुटुंबाला अभिमान आहे.

संपर्क : रोहिदास जाधव, ९६८९४६५६३१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
आंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...
श्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...
‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...
मोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...
‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...
शास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...
कांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...
नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...
कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...
पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळखदेवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील...
खारपाणपट्ट्यात फुलवली प्रयोगशील...सांगवी मोहाडी (ता.. जि.. अकोला) येथील मनोहर...
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...