पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही फुलवल्या फळबागा 

साधनांअभावी पाणी भूगर्भात असूनही दुष्काळाचा सामना करावा लागण्याची स्थिती पाहिली. आता साधने उपलब्ध झाली. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढला. भूगर्भात खालावलेल्या पातळीमुळे दुष्काळाच्या झळा सहन करावा लागणारा काळ अनुभवतो आहे. दुष्काळ पाचवीला पुजला आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी पर्यायांचा वापर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. -जगन्नाथ तायडे कृषिभूषण शेतकरी
पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही फुलवल्या फळबागा 
पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही फुलवल्या फळबागा 

कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी उपलब्ध करता येऊ शकते. दुष्काळाच्या सततच्या वणव्यानं शहाणं केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगपूर येथील जगन्नाथ गंगाराम तायडे यांनी नेमकं तेच केलं. शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी शेतालगतच्या नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी आपल्या विहिरीच्या दिशेने वळविले. विहीर पुनर्भरणाचा प्रयोग करत वाहून जाणारे पाणी विहिरीत पाझरण्याची व्यवस्था केली. दीड एकर शेततळ्यात ते साठविले. विहिरीत पाणी उपलब्ध असेपर्यंत त्याचा वापर आणि मार्चनंतर पाऊस पडेपर्यंत शेततळ्यातील पाण्याचा वापर होतो. त्यातूनच यंदाच्या प्रचंड दुष्काळातही शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन व डाळिंबाच्या ८०० झाडे तायडे यांनी बहरविली आहेत. शिवाय सीताफळाची १५०० नवी झाडे टिकविण्याचा प्रयत्न केला आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगपूर येथील जगन्नाथ गंगाराम तायडे यांची ओळख प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी म्हणून आहे. वडिलोपार्जित शेतीतून वाट्याला आलेल्या साडेतेरा एकर शेतीला तायडे यांनी २२ एकरापर्यंत पोचविले. खरं तर त्यांच्या वडिलांनी कष्टाने २५ एकर शेती कमावली होती. ती दोन भावात विभागून जगन्नाथ यांच्या हिश्‍यावर साडेतेरा एकर जमीन आली होती. तायडे यांच्या कुटुंबात एकूण अकरा व्यक्ती. मुलगा ज्ञानेश्‍वर व सोपान तसेच सुना सौ. रेखा व सौ. अर्चना यांच्यासह जगन्नाथ हे पत्नी कडूबाई यांच्यासह शेतात राबतात. सर्वजण आपापल्या जबाबदारीला आनंदाने व प्रामाणिकतेने न्याय देतात.  शेतीसाठी पाण्याची सोय  तायडे यांनी तीन विहिरी घेतल्या आहेत. पैकी दोन विहिरींना पुनर्भरणाची जोड दिली आहे. छतावरचे पाणी घरालगतच्या शेततळ्यात सोडण्याचा प्रयोग त्यांनी केला. ते तळे छोटे होते. मग ते मोडून त्या ठिकाणी विहीर घेतली. गेल्या पावसाळ्यात दोन तीन वेळा नाल्याचे पाणी या विहिरीभोवती साठले. या विहिरीतून पावसाळाभर दुसऱ्या शेतातील दीड कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात नेले. काळाची पावले ओळखणाऱ्या तायडे यांनी ५६ गुंठ्यांतील शेततळे २००७ मध्येच शेततळ्याचा पाण्याचा स्रोत निर्माण केला होता. पाऊसकाळ व त्यानंतर विहिरीत पाण्याची आवक सुरू असते तोपर्यंत त्यातील पाण्याचा वापर केला जातो. त्यानंतर गरजेनुसारच शेततळ्यातील पाण्याचा वापर ठिबकच्या साह्याने केला जातो.  तायडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये  पाच एकरांत शेडनेट तर आठ एकर फळबाग आहे. डाळिंबाची १६०० झाडे आहेत.  सन २०१८ मध्ये सीताफळाची ७०० झाडे लावली आहेत. अन्य नऊ एकरांत तीन एकर कपाशी, तीन एकर बाजरी व आंतरपीक म्हणून जवळपास तीन एकर तूर असते. शेडनेटमध्ये बीजोत्पादनांतर्गत २५ गुंठे ढोबळी मिरची, ३० गुंठे कारले तसेच टोमॅटो असतो.  शेतीची वैशिष्ट्ये  

  • जून ते सप्टेंबर दरम्यान कारले. 
  • मिरची- जुलै ते डिसेंबर मध्ये, टोमॅटो फेब्रुवारी ते एप्रिल तर ढोबळी मिरची एप्रिल ते ऑक्‍टोबर 
  • उपलब्ध पाणी किती, ते कोणत्या पिकाला किती काळ पुरू शकते याचा विचार करूनच पुढील पिकाचे नियोजन 
  • पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी फळबागेत सेंद्रीय आच्छादन 
  • संपूर्ण शेती ठिबकखाली 
  • कपाशी लागवडीपूर्वी सरी पाडून शेणखत देण्याची पद्धत 
  • पीकहंगामानुसार गोबरगॅस स्लरीचा पिकांसाठी वापर 
  • यांत्रिकीकरणाची जोड, दोन ट्रॅक्‍टर्स, पॉवर टीलर 
  • वालाची शेंग, कपाशी, भेंडी, सूर्यफूल, मका, झेंडू, ढोबळी, तिखट मिरची, टोमॅटो, काकडी, कारले, टरबूज यांचे शेडनेटमध्ये बीजोत्पादन. 
  • बियाणे काढण्यासाठीचे यंत्र 
  • सन २००५ मध्ये बांधलेला गोबरगॅस अविरत सुरू आहे. त्याद्वारे इंधनाची बचत होण्यासोबतच वर्षाला चांगली आर्थिक बचतही होत आहे. 
  • पीक फेरपालटाला प्राधान्य दिले आहे. शेडनेटमध्ये हिरवळीची खते घेण्यावरही भर 
  • ग्रंथासोबत ॲग्रोवनचे वाचन  धार्मिक प्रवृत्तीचे तायडे दररोज दोन तास भागवत गाथा दासबोध ग्रंथाचे पारायण करतात. वडिलांकडून त्यांना हा वसा मिळाला. ॲग्रोवनच्या वाचनालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. गावात थेट न मिळणाऱ्या ॲग्रोवनचा अंक ते स्वतः जवळच्या लाडसावंगी गावी जाऊन घेऊन येतात.  यडे यांनी भारतातील अनेक राज्यांत अभ्यास दौरा केला आहे. तसेच नेपाळ, जर्मनी, फ्रान्स, नेदरलॅंड व स्पेन या पाच देशातंही ते जाऊन आले आहेत.  संपर्क- जगन्नाथ तायडे-९४०५९६०८७८   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com