agriculture story in marathi, jagannath tayde, progressive farmer from auranpur, has done water management experimentsr mana | Agrowon

पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही फुलवल्या फळबागा 
संतोष मुंढे
शुक्रवार, 5 जुलै 2019

साधनांअभावी पाणी भूगर्भात असूनही दुष्काळाचा सामना करावा लागण्याची स्थिती पाहिली. आता साधने उपलब्ध झाली. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढला. भूगर्भात खालावलेल्या पातळीमुळे दुष्काळाच्या झळा सहन करावा लागणारा काळ अनुभवतो आहे. दुष्काळ पाचवीला पुजला आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी पर्यायांचा वापर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 
-जगन्नाथ तायडे 
कृषिभूषण शेतकरी

कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी उपलब्ध करता येऊ शकते. दुष्काळाच्या सततच्या वणव्यानं शहाणं केलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगपूर येथील जगन्नाथ गंगाराम तायडे यांनी नेमकं तेच केलं. शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी शेतालगतच्या नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी आपल्या विहिरीच्या दिशेने वळविले. विहीर पुनर्भरणाचा प्रयोग करत वाहून जाणारे पाणी विहिरीत पाझरण्याची व्यवस्था केली. दीड एकर शेततळ्यात ते साठविले. विहिरीत पाणी उपलब्ध असेपर्यंत त्याचा वापर आणि मार्चनंतर पाऊस पडेपर्यंत शेततळ्यातील पाण्याचा वापर होतो. त्यातूनच यंदाच्या प्रचंड दुष्काळातही शेडनेटमध्ये भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन व डाळिंबाच्या ८०० झाडे तायडे यांनी बहरविली आहेत. शिवाय सीताफळाची १५०० नवी झाडे टिकविण्याचा प्रयत्न केला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगपूर येथील जगन्नाथ गंगाराम तायडे यांची ओळख प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी म्हणून आहे. वडिलोपार्जित शेतीतून वाट्याला आलेल्या साडेतेरा एकर शेतीला तायडे यांनी २२ एकरापर्यंत पोचविले. खरं तर त्यांच्या वडिलांनी कष्टाने २५ एकर शेती कमावली होती. ती दोन भावात विभागून जगन्नाथ यांच्या हिश्‍यावर साडेतेरा एकर जमीन आली होती. तायडे यांच्या कुटुंबात एकूण अकरा व्यक्ती. मुलगा ज्ञानेश्‍वर व सोपान तसेच सुना सौ. रेखा व सौ. अर्चना यांच्यासह जगन्नाथ हे पत्नी कडूबाई यांच्यासह शेतात राबतात. सर्वजण आपापल्या जबाबदारीला आनंदाने व प्रामाणिकतेने न्याय देतात. 

शेतीसाठी पाण्याची सोय 
तायडे यांनी तीन विहिरी घेतल्या आहेत. पैकी दोन विहिरींना पुनर्भरणाची जोड दिली आहे. छतावरचे पाणी घरालगतच्या शेततळ्यात सोडण्याचा प्रयोग त्यांनी केला. ते तळे छोटे होते. मग ते मोडून त्या ठिकाणी विहीर घेतली. गेल्या पावसाळ्यात दोन तीन वेळा नाल्याचे पाणी या विहिरीभोवती साठले. या विहिरीतून पावसाळाभर दुसऱ्या शेतातील दीड कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात नेले. काळाची पावले ओळखणाऱ्या तायडे यांनी ५६ गुंठ्यांतील शेततळे २००७ मध्येच शेततळ्याचा पाण्याचा स्रोत निर्माण केला होता. पाऊसकाळ व त्यानंतर विहिरीत पाण्याची आवक सुरू असते तोपर्यंत त्यातील पाण्याचा वापर केला जातो. त्यानंतर गरजेनुसारच शेततळ्यातील पाण्याचा वापर ठिबकच्या साह्याने केला जातो. 

तायडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
पाच एकरांत शेडनेट तर आठ एकर फळबाग आहे. डाळिंबाची १६०० झाडे आहेत. 
सन २०१८ मध्ये सीताफळाची ७०० झाडे लावली आहेत. अन्य नऊ एकरांत तीन एकर कपाशी, तीन एकर बाजरी व आंतरपीक म्हणून जवळपास तीन एकर तूर असते. शेडनेटमध्ये बीजोत्पादनांतर्गत २५ गुंठे ढोबळी मिरची, ३० गुंठे कारले तसेच टोमॅटो असतो. 

शेतीची वैशिष्ट्ये  

 • जून ते सप्टेंबर दरम्यान कारले. 
 • मिरची- जुलै ते डिसेंबर मध्ये, टोमॅटो फेब्रुवारी ते एप्रिल तर ढोबळी मिरची एप्रिल ते ऑक्‍टोबर 
 • उपलब्ध पाणी किती, ते कोणत्या पिकाला किती काळ पुरू शकते याचा विचार करूनच पुढील पिकाचे नियोजन 
 • पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी फळबागेत सेंद्रीय आच्छादन 
 • संपूर्ण शेती ठिबकखाली 
 • कपाशी लागवडीपूर्वी सरी पाडून शेणखत देण्याची पद्धत 
 • पीकहंगामानुसार गोबरगॅस स्लरीचा पिकांसाठी वापर 
 • यांत्रिकीकरणाची जोड, दोन ट्रॅक्‍टर्स, पॉवर टीलर 
 • वालाची शेंग, कपाशी, भेंडी, सूर्यफूल, मका, झेंडू, ढोबळी, तिखट मिरची, टोमॅटो, काकडी, कारले, टरबूज यांचे शेडनेटमध्ये बीजोत्पादन. 
 • बियाणे काढण्यासाठीचे यंत्र 
 • सन २००५ मध्ये बांधलेला गोबरगॅस अविरत सुरू आहे. त्याद्वारे इंधनाची बचत होण्यासोबतच वर्षाला चांगली आर्थिक बचतही होत आहे. 
 • पीक फेरपालटाला प्राधान्य दिले आहे. शेडनेटमध्ये हिरवळीची खते घेण्यावरही भर 

ग्रंथासोबत ॲग्रोवनचे वाचन 

धार्मिक प्रवृत्तीचे तायडे दररोज दोन तास भागवत गाथा दासबोध ग्रंथाचे पारायण करतात. वडिलांकडून त्यांना हा वसा मिळाला. ॲग्रोवनच्या वाचनालाही त्यांनी प्राधान्य दिले आहे. गावात थेट न मिळणाऱ्या ॲग्रोवनचा अंक ते स्वतः जवळच्या लाडसावंगी गावी जाऊन घेऊन येतात. 
यडे यांनी भारतातील अनेक राज्यांत अभ्यास दौरा केला आहे. तसेच नेपाळ, जर्मनी, फ्रान्स, नेदरलॅंड व स्पेन या पाच देशातंही ते जाऊन आले आहेत. 

संपर्क- जगन्नाथ तायडे-९४०५९६०८७८ 
 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...
सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...
काटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...
दहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
दुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...
परिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...
कष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...
सुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...
मुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...
पुसद वन विभागाचा हायटेक  दर्जेदार...कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक...
अडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा...परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर...
पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही...कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी...
आदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची...संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या...